ज्या भूमीने जन्म दिला त्या भूमीत परत या
ज्या भूमीने जन्म दिला त्या भूमीत परत या
नौकरी निमित्त प्रत्येक युवक अविकसित जिल्हयातून विकसनशील किंवा विकसित जिल्हयात जात आहे.आपल्या जन्मभूमी चा त्याग करून करिअर घडविण्यासाठी दुसऱ्या जिल्हयात जात आहे.आपल्या जन्म देणाऱ्या भूमीमध्ये काम भेटत नाही मी येथे राहून मोठा होउ शकत नाही म्हणून युवक आपली जन्मभूमी सोडुन जात आहेत.
शिक्षणासाठी गेलेला युवक आपल्या मुळ गावी यायला तयार नाही.त्याला ते शहर आवडू लागले आहे. लहान पनापासून ज्या शहरात राहिला आता ते शहर त्याला नकोसे वाटते ,कारण त्याला त्याला हवा तशी नौकरी ,हवी तशी संधी जन्मभूमी मध्ये नसल्यामुळे आणि हवा तसा पगार येथे भेटत नसल्यामुळे आजचा युवक आपली जन्मभुमी ला विसरुन तो दुसऱ्या शहरात आपला छोटासा परिवार निर्माण करत आहे.
आपल्या गावी परत या ,आपल्या जन्मभूमीत परत या मी अशी बेंबीच्या देटापासून मी तूम्हाला हाक देत आहे. तूम्ही थोडा विचार करा,तूम्ही ज्या विकसनशील भागात राहता त्या भागात तूम्ही पैसा खर्च करता .जेवणापासून ते तूमच्या ज्या गरजा असतील त्या सर्व गरजा त्या बाजारातून खरेदी करता ,अप्रत्यक्षपणे तूम्ही त्या शहराला अजून मोठे बनवत असता. तेथील व्यापारी तूमच्यामुळे श्रीमंत होत असतो. तेथील प्रत्येक क्षेत्रामध्ये तूमच्या मुळे प्रगती दिसून येते.
जरी तूम्हाला खूप मोठा पगार देत असतील तेथील कंपन्या पण अर्धी पगार तर तेथेच खर्च करावी लागते म्हणजे तूमच्या मुळे त्या शहराच्या अर्थव्यवस्था मजबूत होत असते.
आज प्रत्येक युवक जर आपली जन्मभूमी सोडून जात असेल तर आपली जन्मभूमी मध्ये कोण राहणार ,आपल्या जन्मभूमीला मोठे कोण करणार ,आपल्या जन्मभूमीच्या अर्थव्यवस्थेचा विचार कोण करणार,
जर तूम्ही आपल्या जन्मभूमीमध्ये राहून एखादा व्यवसाय चालू केला तर येथील लोकांना अप्रत्यक्षपणे फायदा होईल ,आणि आपल्या कमी शिकलेल्या लोकांना ,किंवा हातावर पोट असलेल्या लोकांना तूमच्या मुळे रोजगार उपलब्ध् होईल.
माझे तर असे मत आहे जे जे व्यक्ती चांगले शिक्षण घेउन चांगल्या पदावर आहेत,त्यांनी एकत्र येउन आपल्या जन्मभूमीत परत येउन येथे शिक्षण संस्था निर्माण करून,येथे प्रत्येक्ष क्षेत्रातील शिक्षण संस्था निर्माण करून ,प्रत्येक व्यवसाय येथेच निर्माण करून ,आपल्या जन्मभूमीचा विकास करण्याचा प्रयत्न करावा.
जर शिक्षण संस्था जर आपल्या येथील चांगल्या असतील तर आपले विद्यार्थी बाहेर शिकायला जाणार नाहीत.म्हणजे त्यांच्या शिक्षणावर होणार खर्च आपल्याच जिलहयात होईल आणि त्या शिक्षण संस्थेमुळे इतर व्यवसांना सुध्दा चांगले दिवस येथील..मग काय हळू हळू आपली जन्मभूमी पण विकसित होण्याच्या मार्गावर दिसेल.
त्यासाठी प्रत्येकांने आजूबाजूच्या शहरातील ज्ञान घेउन ,काही गोष्टी चा अभ्यास करून ,व्यवसांचा अभ्यास करून आपल्या जन्मभूमीत जर परत आले तर येणाऱ्या पिढीला बाहेर शिक्षण घ्यायला ,नौकरीला बाहेर जायची गरज पडणार नाही..जर प्रत्येक क्षेत्राची संधी आपल्या जिल्हयात उपलब्ध झाली तर आपला पैसा येथेच खर्च होईल आणि आपल्या जन्मभूमीचा कायापालट होईल.
यासाठी आपण सर्वांनी आपल्या एकत्र येउन ,आपणच आपले शहर उभा केले पाहिजे,दुसऱ्या शहराचा का विकास करता ,स्वत:च्या शहराचा विकास करायला रात्र दिवस एक करा.
काही दिवस तूम्हाल चार पैशे कमी येतील पण काही वर्षांनी नक्कीच तूम्ही चार पैस आपल्या शहरात राहून कमवू शकता..थोडाशा सोविधा सुरुवातील तुम्हाला नाही भेटणार पण काही दिवसांनी तूम्हांला नक्की सुविधा उपलब्ध होतील जर तूम्ही आपल्या जन्मभूमीमध्ये राहिला तर.
अनेक अडचणी तूम्हाला सुरुवातीला येतील पण आपल्या पूढच्या पिढीसाठी तूम्हाला काही गोष्टीचा त्याग करावाच लागेल.
तूम्ही जर म्हणत बसलात की आपल्या शहराच काय होउ शकत नाही,राजकारणी येथील चांगले नाहीत,उदयोग चालू करताना टक्केवारी मागतात,यांची इच्छाच नाही आपले शहरांचा विकास करण्याची,अशा अनेक अडचणी आहेत पण यातून आपल्याला मार्ग काढून आपल्या जन्मभूमीचा विकास करावा लागेल..
आपल्याला सर्वांना मिळून एक दिवस असा आणायचा आहे की बाहेरचे व्यक्ती आपल्या शहरात पर्यटनांसाठी यायला पाहिजे,किती दिवस आपणच दुसऱ्या शहरात पर्यटनांसाठी जाणार ,आपले शहर आपण अशा प्रकारे विकसित केले पाहिजे की बाकीच्या शहरातील नागरिक आपल्या शहरात आले पाहिजे..
आपल्या जन्मभूमीसाठी मी सर्वांना आव्हान करत आहे की परत आपल्या जन्मभूमी मध्ये या आपल्या जन्मभूमीला मोठे करा..तूमच्या शिवाय जनमभूमी मोठी होणार नाही .या परत या परत या परत या परत आपल्या जनमभूमीत.
लेखक : राम ढेकणे