नवीन पोस्ट्स

Telegram : टेलिग्रॅम ॲप ला नियंत्रणात ठेवण्याची गरज

काही वर्षापूर्वी मी माझा वेळ आनंदाने कुठे खर्च करत असेल तर तो मित्राबरोबर गप्पा गोष्टीमध्ये ..दोन ते  तीन तास आम्ही बोलत बसायचो,वेगवेगळया विषयाला हात घालायचो. एकमेकांचे दु:खात सहभागी होत असे..कॉल करून एकमेकांबदृल जाणून घेत असे.म्हणजे वर्तमानामध्ये रमायला आवडत असे..

डाटा फ्रि देण्याचे भरपूर फायदे झाले यात काय वाद नाही पण याचे दुष्परिणाम पण आपल्याला पाहावे लागतील..आज प्रत्येक जण ३०० रूपये खर्च करून दररोज १ जीबी डाटा वापरत आहे..आपले तरूण पिढी याचा वापर कशा प्रकारे करत आहे ते जाणून घेउया .
टेलिग्र्रॅम/टेलिग्राम नावाचे एक ॲप आहे ,त्या आप वर वेगवेगळे ग्रुप आहेत..कोणीही ग्रुप तयार करू शकते,त्यामध्ये देशातील कोणीही त्या ग्रुप मध्ये जॉइन होउ शकते. मग त्या ग्रुप वर वेगवेगळया लिंक आपल्या समोर येतात त्या लिंक चा वापर करून आपण कोणताही चित्रपट पाहू शकतो किंवा डाउनलोड करू शकतो..

आज चित्रपटग्रहात आलेला चित्रपट २४ तासाच्या आत टेलिग्राम चॅनल वर येतो..मग काय जिओच्या उपकारामुळे आणि महिन्याला ३०० रूपयाचा केलेल्या रिचार्ज वर आणि दररोज मिळालेल्या १ जीबी च्या बळावर ,तरूण पिढी दररोज एक चित्रपट बघत आहे..फुकट चांगल्या दर्जेदार चित्रपट बघायला मिळत आहे…
यामुळे जो व्यक्ती चित्रपट एवढी मेहनत घेउन बनवतो,काही जण तर कर्ज काढून चित्रपट बनवतात,काही जण आयुष्याची सगळी कमाई चित्रपट बनवायला लावतात..अशा टेलिग्राम ग्रुप मुळे त्यांचे प्रचंड नुकसान होत आहे..

यामुळे जो व्यक्ती चित्रपट एवढी मेहनत घेउन बनवतो,

काही जण तर कर्ज काढून चित्रपट बनवतात,काही जण आयुष्याची सगळी कमाई चित्रपट बनवायला लावतात..अशा टेलिग्राम ग्रुप मुळे त्यांचे प्रचंड नुकसान होत आहे..

पण याच्या पेक्षा जास्त कोणावर परिणाम होत असेल तर ती आपली तरूण पिढी ,आज मित्राला भेटल्यावर ते तू कसा आहेस मित्रा हे नाहीत विचारत,सरळ अरे तूझ्याकडे कोणता चित्रपट आहे का रे,असेल तर दे मला माझा आज डाटा संपला आहे,मग काय मित्र पण लगेच ३ ते ४ चित्रपट पाठवतो.,आयूष्यातील प्रत्येक दिवस तरूण पिढी ३ ते ४ घंटे चित्रपट पाहण्यात घालवत आहेत..त्यामधून त्यांच्या करिअर विषयी काय शिकायला मिळते ते त्यांनाच माहित असणार..काही जण तर अभ्यासिकेमध्ये येतात ,घरच्यांना वाटते की हा अभ्यास करायला गेला आहे पण हा अभ्यासिके मध्ये येतो आणि ३ ते ४ चार घंटे एक पूर्ण चित्रपट संपल्यावरच घरी जातो..घरच्यांना वाटते की आपल लेकरू अभ्यास करून आले आहे.

दुसरा समूह चित्रपट न बधता वेगवेगळे गेम खेळण्यात आपल्या जीवनातली मौल्यवान वेळ वाया घालवत आहे..फ्रि फायर नावची गेम असो ,किंवा पब्जी असो किंवा अन्य गेम असो त्यांना एक प्रकारचे वेसन लागलेले आहे,आमच्या अभ्यासिकेमध्ये पण दोघे तिघेजण आहेत .त्यांचे वय साधारण १७ वर्षे आहे. घरची परिस्थिती हालाखी ची आहे याची त्याला जाणीव आहे का ते माहीत नाही पण  तो गेम आणि चित्रपट पाहण्याच्या आहारी गेल्यामुळे अभ्यासिके मध्ये येतो आणि या दोन्ही गोष्टी चा स्वाद घेतो.

तिसरा समूह असा आहे की  फक्त रिल्स बधण्यात आपला वेळ वाया घालवत आहेत..रिल्स म्हणजे छोटे  छोटे ‍ व्हिडियो ..चित्रपट बघण्यात काहीही वाईट नाही पण दिवसाला एक चित्रपट बधणे म्हणजे तो तरूण पूर्ण पणे त्या टेलिग्राम ग्रुप आणि त्या वरील चित्रपट याच्या आहारी गेलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button