आयुष्याची दोरी आपल्या हातात नाही

नेहमी प्रमाणे सकाळी क्लासला जाउन आलो. मोबाईल डवचत असताना सोशल मिडियातून एक बातमी आली. भावपूर्ण श्रध्दाजंली, एक लहानपणीचा सहवासी आम्हाला सोडून गेला.
म्हतार पणी एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्यावर दु:ख होईल पण जास्त त्रास होतो जेव्हा एखादी व्यक्ती तरूणपणीच आपल्याला सोडून जाते. या आयूष्यात आपले ध्येय काय आहे हे माहीत नाही. पण जे आपल्याला आयुष्य दिले आहे त्या आयुष्यातील प्रत्येक टप्याचा आनंद प्रत्येकाने घेउन जर आयुष्यातून निघून गेला एखादा व्यक्ती तर मनाला समाधान तरी वाटते की माणूस चांगला जगून गेला. पण तरूण वयात एखादा व्यक्ती या आयुष्याला सोडून जातो हे खूप वेदनादायी आहे..
या जीवनात आलात तर प्रत्येकाने लहानपण, तरूणपण आणि म्हातारपण या अवस्थे मधून जावून जीवनाचा स्वाद घेतलाच पाहिजे. का देव एवढा कठोर होतो की एखादा जीवन जगत असताना अर्ध्यातून त्याला घेउन जातो.
देवाचा हा भेदभाव मला पटत नाही… एकाला ऐवढे आयुष्य देतो की तो माणूस पूतण्याच्या पोरांचे लग्न सुध्दा बघून नंतर त्याचे जीवन समाप्त होते आणि एकीकडे साधे तरूणपण सुध्दा जगू देत नाही. का करतो देव असा भेदभाव..एकाला १०० आयुष्य आणि काही जणांना २० वर्षे, काही जणांना ५० वर्षे. असा देव का करतो भेदभाव.
काही जण म्हणतात आदल्या जन्माच्या कर्मानुसार तुमचे जीवन ठरत असते. ज्या जन्माबद्दल आपल्याला काहीच आठवत नाही, त्या जन्मात आपण कोणते कर्म केले याची आपल्याला माहीती नसते, त्याची शिक्षा या जन्मात मिळणे हे न पटण्यासारख आहे.
आमच्या शेजारी एक चार जणांचे कुटुंब होते, त्यात कर्ता धर्ता एकच, त्याचा ३५ व्या वर्षी मृत्यू झाला. आनंदात असणारे कुटुंब दु:खाचा सागरात फेकले गेले..आज त्यांच्या आयुष्यात त्यांना कोणी सहारा देणारा नाही. अवस्था नाजूक आहे. काय चूक होती त्या माणसांची, आदल्या जन्मांचे कर्म का ?
आयुष्यातील दोरी आपल्या हातात नाही, हे अशा घटनेतून आपल्याला समजते.
जन्म पण आपल्या हातात नाही, आणि मृत्यू पण आपल्या हातात नाहीत. कोणते संकंट आपल्या जीवनात येतील ते पण आपल्या हातात नाहीत, कधी आपल्या सुख मिळेल, आणि कधी आपल्याला दु:ख मिळेल हे सुध्दा आपल्या हातात नाही. श्वास आपण घेतो असे आपल्याला वाटते,पण तो चालूच ठेवायचा की बंद ठेवायचा हे आपल्या हातात नाही. आपल्या हातात फक्त एवढेच आहे की आपण या सर्व गोष्टीला हिंमतीने सामोरे जायचे हे आपल्या हातात आहे.
जे होत आहे, जे होणार आहे त्याच्याशी लढाई करायला, त्याच्याशी सामना करायला नेहमी तयार राहणे, विश्वासाने, धाडसाने सामोरे जाणे हेच आपल्या हातात आहे.
तूमच्या कडे किती ही धन असु द्या, शेवटी संकंट आयुष्यात येतच राहणार. आपल्याला आयुष्यात दु:ख, वेदना होतच राहणार, आपले एकच काम ते म्हणजे या सर्व गोष्टी साठी आपण सामना करायला तयार असणे .
माझ्या आयुष्यात हे कसे झाल, माझ्याबरोबरच असे का होते, मी काय चूक केली, माझ्या आयुष्यातील संकंट कमी कधी होणार, माझे चांगले दिवस कधी येणार…
याचा विचार न करता, जसे आयुष्य आहे तसे आयुष्य जगत जाणे, प्रामाणिक पणे काम करत राहणे, कारण जे व्हायचे ते होणारच आहे.
जेवढे सुख तूम्हाला मिळायचे ते तूम्हाला मिळणारच आहे… ना नशीबापेक्षा जास्त, ना नशीबापेक्षा कमी..
कारण आपल्या हातात काहीच नाही..आलेला क्षण जगणे हेच आपल्या हातात आहे. तूम्ही चार पैशे कमवण्यासाठी काही गोष्टी करू शकता, चार पैशे पण तूमच्या कडे येतील. पण जे व्हायचे ते होणारच. तूम्ही फक्त चार पैसे अधिक कमवू शकता. पण भरपूर गोष्टी आपल्या हातात नाहीत, हे आपल्याला मान्य करावेच लागेल.
थोडेसा हा लेख नकारात्मक वाटेल पण मी माझे मत मांडण्याचा प्रयत्न केला आहे..असेच असेल हे मी तूम्हाला नाही सांगू शकत. मला जे वाटले की जीवन असेच आहे. ते मी तूमच्या समोर मांडले आहे. यात खूप वाक्य चूकीचे पण असू शकतात तूमच्या नुसार. पण शेवटी हे आपल्याला मान्यच करावे लागेल की आयुष्याची दोरी आपल्या हातात नाहीच..
लेखक : राम ढेकणे