आरोग्य

तिला व्यसनाने मारलं पण मशरूमन तारलं

तुमच्या लेखी मशरूमला किती महत्त्व असेल? एक पौष्टिक भाजी इतकच बरोबर ना? पण कॅनडातील न्यूब्रूनस्वीक शहरात राहणाऱ्या 34 वर्षांच्या जेसीकाची मात्र गोष्टच वेगळी. ती स्वतःला क्वीन ऑफ मशरूम(तिला व्यसनाने मारलं पण मशरूमन तारलं) म्हणते या मशरूम मुळेच आपला जीव वाचला असे ती म्हणते. जेसिका सोळा वर्षे एक व्यसनाधीन आयुष्य जगली दारू ,ड्रग घेतल्याशिवाय तिला चैनच पडायचा नाही आपण हे घेतो म्हणूनच जगतो आहे असा तिचा समज झाला होता.

नोव्हेंबर 2012 मध्ये जेसिकाला दुसरा मुलगा झाला वर्षभरापूर्वीच तिच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला होता पहिल्या मुलानंतरच मानसिक दृष्ट्या थोडी हल्लेली जेसीका दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर तर तिला पोस्टनेटल डिप्रेशन म्हणजे बाळांतपणानंतरच्या नैराश्याने गाठले होते. सहा वर्षे ती नैराश्यात परिणामी व्यसनाच्या विळख्यात अडकून पडलेली होती पण एप्रिल 2018 मध्ये जेसिका कॅनडातील येथील एका जंगलात गेली होती त्या जंगलात हिंडताना तिला जगण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला या जंगलात नैराश्य आणि व्यसनानं सैरभर झालेली जेसिका शांत झाली.

ई श्रम कार्ड योजनेविषयी माहीती E Shram Card Scheme Information In Marathi

आपल्याला आलेला नैराश्य घालवण्याचा नैसर्गिक मार्ग ती शोधू लागली ते शोधण्यासाठी तिला मदत केली ती मशरूम ने गेल्या सहा वर्षापासून जेसीका सतत चांगल्या उपयुक्त मशरूम चा शोध घेत असते मशरूम हाच तिच्या आहाराचा प्रमुख घटक आहे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये ती ब्लॅक ट्रंपेट मशरूम चा मसाला सारखा उपयोग करते सतत निरीक्षण अभ्यासा द्वारे जेसीका आता मशरूम विषयातील तज्ञ झाली आहे ती लहान मुलांना, तरुणांना, प्रौढांना अपेक्षित फायदे मिळवण्यासाठी चांगले मशरूम कसे ओळखावे कसे निवडावे याचे प्रशिक्षणही देते.

नवीन आयुष्य देणाऱ्या मशरूमच्या आधारानेच जेसिकाच्या डोक्यावरील कर्ज फिटलं. मशरूम जेसीकासाठी आहारही आहे आणि औषधही या मशरूमच्या मदतीने जेसीका मानसिक आजारातून पूर्ण बरी झाली. तिच्या मित्र-मैत्रिणींमुळे दारू पिण्याचे व्यसन होतं पण जोडीदार मिळाला मुलं झाली जेसिकाच्या कुटुंबाने आकार घेतला तसं जेसिकाचे मानसिक संतुलन बिघडलं दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर मात्र जेसिकाला खूपच थकवा आणि एकटेपणा जाणवायला लागला एकीकडे ती मुलांना वाढवत होती आणि दुसरीकडे घरातल्या जबाबदाऱ्या मुलांना वाढवण्याचा ताण यातून सुटका मिळवण्यासाठी ती व्यसनांमध्ये जास्तच अडकत गेली. दिवसभरातील मुलांसाठीची जास्तीची काम करून झाल्यावर तिचा पूर्ण वेळ दारू पिण्यात जायचा दर आठवड्याला मित्र-मैत्रिणींकडून ती ड्रग साठी पैसे उधार घ्यायची व्यसनासाठी अशी उसनवारी करता करता तिच्या डोक्यावरच कर्ज वाढलं दारू ड्रग शिवाय आपल्याला उपाय नाही हे जाणवल्यावर मात्र नैराश्याचा चिंतेचा फास अधिकच घट्ट झाला.

चला तर आज बघूया आपण कसा आहे वनतारा

जेसिकाच्या आयुष्यात जंगल फेरीच्या निमित्ताने मशरूम आले आणि जे शिकवायचं आयुष्यच बदललं ,व्यसनाचा मानसिक भावनिक ताण यातून सुटण्याचा मार्ग तिला निसर्गाच्या सानिध्यात सापडला. मनातील भीती टप्प्याटप्प्याने कमी होत गेली एकीकडे जेसिकाचे मशरूम प्रेम वाढत होतं तशी ती दिवस-रात्र मानवाला उपयुक्त मशरूम कोणते ते कसे ओळखावे कसे मिळवावे याचा अभ्यास जेसी का करू लागली हा तिचा अभ्यास आज सहा वर्षानंतरही सुरूच आहे.

जेसिका दररोज तीन तास जंगलात फिरते स्थानिक पारंपारिक औषध उपचार वनस्पतींचे औषधी उपयोग आणि मशरूमची ओळख या विषयांचे जेसीका शिकवणी वर्ग घेते. स्वतःच्या दोन मुलांनाही ती जंगलात घेऊन जाते जेसिकाच्या या शिकवणीमुळे तिची दोन्ही मुलं शंभर पेक्षा जास्त प्रकारचे मशरूम एका नजरेत ओळखू शकतात जेसीका म्हणते मी जर व्यसनामध्येच बुडून राहिले असते तर नक्कीच मेले असते, मशरूम मुळेच निसर्गाच्या चमत्काराची अनुभूती घेता आली. निसर्गाच्या जवळ राहिलो निसर्ग मुळे आयुष्य सोपं होतं जेसीका म्हणते त्यात न पटण्यासारखं काय ?.

मानसिक आराज आजारांवर निसर्गाचा उपचार

जेसीका निसर्गाच्या मदतीने स्वतःला होणारा त्रासातून बाहेर आली(तिला व्यसनाने मारलं पण मशरूमन तारलं) अर्थात ही कल्पना नवीन नाही जपानी लोकांचा फॉरेस्ट बाथिंग वर विश्वास आहे भीती नैराश्य दूर करण्यासाठी रुग्णाला प्रिस्क्रिप्शन मधून निसर्गाचा उपचार लिहून देणारे डॉक्टर जगभरात आहेत कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा धोका कमी करणारे मशरूम त्यातील विशिष्ट घटकांमुळे मानसिक आरोग्यासाठी उपकारक असतात हे वेगवेगळ्या संशोधनातून आणि अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button