आरोग्य

Guava Leaves benefits |पेरूच्या पानांचे आरोग्यदायी फायदे…

मित्रांनो,
हिवाळा सुरू होताच, हंगामी फळे आणि भाज्यांचे आगमन सुरू होते जे आपले आरोग्य सुधारण्यास आणि आपले अन्न अधिक पौष्टिक बनविण्यास मदत करतात. पेरू(Guava Leaves benefits) हे या हंगामी फळांपैकी एक आहे. पेरूची गोड आणि रसाळ चव प्रत्येकाला ते खाण्यास भाग पाडते. मात्र, चवीसोबतच पेरूचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. याच्या सेवनाने तुमचे आरोग्य सुधारण्यास आणि फिट राहण्यास मदत होते. पेरू हे आरोग्यासाठी एक फायदेशीर फळ मानले जाते…

जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेल्या या फळाचे सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्यांपासून तुमचे रक्षण होते आणि अनेक समस्या दूर होण्यासही मदत होते…

अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान

पेरूसोबतच त्याची पानेही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पेरूच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात. त्याचा अर्क आरोग्याच्या अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. येथे आम्ही तुम्हाला पेरू आणि त्याची पाने खाण्याचे फायदे सांगणार आहोत, जे वाचल्यानंतर तुम्ही आजपासून पेरू खाण्यास सुरुवात कराल…

पेरूच्या पानांचा उपयोग: पेरूचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्याचप्रमाणे पेरूची पानंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पेरू म्हणजे सर्वांच्याच आवडीचं फळं. तिखट मीठ लावून खाल्लेल्या पेरूची बात काही औरच…

पेरूची पानं त्वचेसाठीही अत्यंत लाभदायक ठरतात. वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासोबतच पोटाच्या समस्या दूर राहण्यासाठीही मदत करतात. तसेच शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी झालं असेल तर ती दूर करण्याचेही काम पेरूची पानं करतात…

दातांसाठी: पेरूच्या पानांची पेस्ट तयार करून दातांवर लावल्याने दात मजबूत होण्यास मदत होते…

Guava Leaves benefits
Guava Leaves benefits

Hair fall control

केसांसाठी: पेरूची पानं(Guava Leaves benefits) अत्यंत फायदेशीर ठरतात. या पानांमध्ये केसांसाठी आवश्यक असणारी अनेक पोषक तत्व आणि ॲन्टीऑक्सिडंट असतात. जे केसांच्या वाढिसाठी उपयोगी ठरतात. पेरूमध्ये व्हिटॅमिन-सी अधिक असतं. तसेच पेरूच्या पानांमध्ये आयर्नही असतं. जे केसांच्या वाढिसाठी उपयोगी ठरतं… तसेच तुमचे केस गळत असतील तर त्यावर उपाय म्हणून या पानांचा वापर करू शकता. या पानांच्या मदतीने एक काढा तयार करून त्याने केसांच्या मुळाजवळ मालिश करावे…

चरबीच्या गाठीसाठी:अनेकदा विविध कारणांनी शरीराच्या अनेक भागांमध्ये गाठी तयार होतात. यातील अनेक गाठी वेदनादायी असतात तर काही न दुखणाऱ्या. असा गाठींवर जर पेरूच्या पानांची पेस्ट तयार करून लावली तर त्याचा फायदा होतो…

Mahatma Phule Shetkari Karjmukti Yojna महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना विषयी माहिती

*अंगावरुन पांढरे जाणे: काही महिलांना अंगावरून पांढरे जाण्याची समस्या होते. अनेकदा शरीरात होणाऱ्या हार्मोन चेंजेमुळेही हा त्रास होत असतो. परंतु हे प्रमाण वाढू लागल्यास त्यावर वेळीच उपचार करणं फायदेशीर ठरतं. पेरूची पानं या समस्येवर उपयोगी ठरतात. दररोज संध्याकाळी या पानांचा रस घेतल्याने या समस्या कमी होण्यास मदत होते… *

पिंपल्स: पिंपल्स दूर करण्यासाठी पेरूची पानंही उपयोगी ठरतात. या पानांमध्ये ॲन्टीबॅक्टेरिअल आणि जलनरोधी गुणधर्म असतात. ज्याच्या मदतीने त्वचेच्या समस्या म्हणजेच, ॲक्ने, पूरळ, ॲलर्जी यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात…

पोटाच्या तक्रारसाठी: पेरूच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म आढळतात, जे शरीराला गॅस्ट्रिक अल्सरपासून संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे जर कोणाला गॅस्ट्रिक अल्सरचा त्रास होत असेल तर पेरूच्या पानांचे सेवन अवश्य करावे…

पेरूच्या पानांमध्ये (Guava Leaves benefits)अनेक घटक असतात जे अतिसार किंवा जुलाबात फायदेशीर ठरतात. डायरियाच्या आजारांवर पेरूची पानं उपयुक्त ठरतात. लहान मुलांना डायरिया झाल्यास या पांनाचा रस गुणकारी ठरतो. पोटाच्या इतर समस्यांवर याचा उपयोग होतो. एक कप पाण्यामध्ये ही पानं टाकून पाणी उकळवून घ्यावं. तसेच हे पाणी प्यायल्याने पचनसंस्था सुधारण्यास मदत होते…

पोट आणि आतड्यांसंबंधी स्थिती, वेदना, मधुमेह आणि जखमेच्या उपचारांसाठी पेरूच्या पानांचा वापर करतात.

पेरूमध्ये भरपूर फोलेट आणि इतर पोषक तत्व असतात जे गर्भधारणेला मदत करू शकतात…

Weight loss medicine

लठ्ठपणा: वजन कमी करण्यासाठी पेरूची पानं उपयुक्त ठरतात. शरीरातील फॅट नियंत्रणात ठेवण्यासाठी या पानांमध्ये असणारे गुणधर्म मदत करतात. पेरूची पानं सुकवून त्याची पावडर करून ठेवा. पाण्यामध्ये एकत्र करून घेतल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button