सामाजिकशेअर मार्केट

अजित पवार यांनी 2024 चे महाराष्ट्र बजेट केले सादर .

145 शहरातील प्रकल्पांना 28315 कोटी मंजूर

नगरांच्या विकासासाठी अमृत अभियानांतर्गत 145 शहरांमधील 28 हजार 315 कोटींचे 312 प्रकल्प (2024 चे महाराष्ट्र बजेट) मंजूर करण्यात आले आहे यात पाणीपुरवठा , मलनिस्सारण, सरोवर पुनरुज्जीवन आणि हरित क्षेत्र विकास प्रकल्पांचा समावेश आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान सन 2030 पर्यंत राबविणार आहे यातून पाणीपुरवठा मल निसारण याचबरोबर रेल्वे ओवर ब्रिज प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाचे कामे करणार आहोत.

महा अभिनात सर्व नागरी संस्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असून त्यांच्या वर्गीकरणानुसार शासनाकडून प्रकल्प किमतीच्या 50 ते 95 टक्के निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली.

पाणीपुरवठा

सन 2024 25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला तीन हजार 875 कोटी रुपयांची तरतूद दरवर्षी सुमारे 25 हजार किलोमीटर राज्य मार्गाव व प्रमुख जिल्हा मार्गांच्या दोन्ही बाजूंना वृक्ष लागवड करणार जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत पाच हजार सातशे गावांमधील एक लाख 59 हजार 886 कामांना मंजुरी.

पर्यावरण

सन 2024-25 या वर्षासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाला 225 कोटी रुपये वन विभागास 2507 कोटी रुपये मृद व जलसंधारण विभागास 4.247 कोटी रुपयांची तरतूद

वृक्ष लागवड

दरवर्षी सुमारे पंचवीस हजार किलोमीटर राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गाच्या दोन्ही बाजूंना वृक्ष लागवड करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असून त्यासाठी तरतूद केली आहे

बांबूंची लागवड

अटल बांबू समृद्धी योजना अंतर्गत दहा हजार एक्टर क्षेत्रावर बांबूंची लागवड करण्याची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानही दिले जाणार आहे.

महिला व बाल विकासाला प्राधान्य

बिजली चमकती है तो आकाश बदल देती है. आंधी उठती है तो दिन रात बदल देती है जब गरजती है नारी शक्ती तो इतिहास बदल देती है अशी कविता वाचत अजित पवार यांनी महिला आणि मुलींसाठीच्या योजना जाहीर केल्या.
मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात किमान एक लाख महिलांना विविध शासकीय योजनांचे थेट लाभ देण्यात येणार आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांची रिक्त पदे भरणार कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्र उभारणार दहा मोठ्या शहरातील 5000 महिलांना पीक रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार.

18 लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन होणार

अर्थसंकल्पात(2024 चे महाराष्ट्र बजेट) उद्योगांना चालना देण्यासाठी उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी सुधारित औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स अवकाश व संरक्षण उत्पादनाचे सुधारित धोरण तसेच नवीन सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम तोरण तयार करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे निर्यात वाढ तसेच गुंतवणुकीसाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहे.

उद्योग


राज्यात 18 लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करण्यात येणार असून यातून सुमारे 36000 रोग रोजागार निर्मिती
एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 जाहीर करण्यात आले असून या धोरणांतर्गत प्रथमच अत्योदय शिधापत्रिकेवर एका कुटुंबास एका साडीचे मोफत वाटप करण्यात येईल यासाठी सन 2024 ते 25 या वर्षासाठी एक हजार एकवीस कोटींची तरतूद केली आहे.

(Tadpatri) ताडपत्री अनुदान योजना २०२४ विषयी माहिती

निर्यातीला चालना

निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमात 450 कोटी
निर्यातक्षम घटकांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी चारशे कोटी रुपये
निर्यात वाढीसाठी पाच इंडस्ट्रियल पार्क
सामूहिक प्रोत्साहन योजनेतून आगामी वर्षात सुमारे सात हजार कोटी रकमेचा प्रोत्साहन निधी
उद्योग विभागास 1021 कोटी आणि सहकार पणन साठी 1952 कोटी रुपये नियतवय प्रस्तावित आहे

अंतराळात जाणार हे चौघे भारतीय

गुंतवणूक ,रोजगार

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 25000 उद्योग घटक तयार करणार यात 30 टक्के महिला उद्योजकांचा समावेश तर सुमारे 50 हजार नवीन रोजगार निर्माण होणार.

रोजगार निर्मिती

दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेमध्ये 19 कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाले असून त्यातून दोन लाख रोजगार निर्मिती होणार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button