नवीन पोस्ट्सशासकीयसामाजिक

टक्केवारी वाले अधिकारी – corrupt officials

आमची अशीच नेहमी प्रमाणे चर्चा चालू होती की आपली सिस्टीम कशी चालते. आपल्या सिस्टीम मध्ये भ्रष्ट अधिकारी – corrupt officials आहेत का ?

आपल्या सिस्टीम मध्ये सामान्य माणसांचे काम पैसे न देता होते का ?

प्रत्येक विभागामध्ये पैसा दयावाच लागतो का, का सगळे चांगले आहेत..कोणी भ्रष्ट नाहीत, अशे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले..

मग एक एक आपल्या आवतीभोवती घडलेल्या प्रसंग रंगवून सांगू लागला..की अधिकारी एवढे भ्रष्ट झाले आहेत की तूमचे कोणतेच काम पैशाशिवाय होउ शकत नाही..

आता आपले कास्ट कोणती आहे याचे प्रमाणपत्र काढण्यासाठी जवळपास ४० ते ५० रूपये खर्च असतो सरकारचा..हे सरळ १०० ते २०० रूपये घेतात.. हे झाले स्माल स्केल ला…

समजा तूमचे शेत आहे आणि त्यामध्ये तूम्हाला आता प्लॉटींग सूरू करायची आहे, तर ते सूरू करण्यासाठी ज्या अधिकाऱ्यामार्फंत तूमचे काम होणार असते.

त्यापासून ते शिपाई पर्यंत तूम्हाला हातामध्ये पैसे ठेवावे लागतात नाहीतर तूमची फाईल पूढे जात नाही..हा अनुभव माझ्या मित्राने मला त्याच्या बरोबर झाला असे सांगितले आहे..

तसेच तूम्ही नौंदणी विभागात जावा त्या विभागामध्ये सुध्दा चार पैसे घेतल्या शिवाय तूमचे काम होणारच नाही..

तलाठी पासून ते कलेक्टर पर्यंत सर्व अधिकारी टक्केवारीवर काम करताना दिसत आहेत..फक्त यांच्या वर कारवाई होताना दिसत नाही..

कारण सामान्य माणूस विचार करतो की अरे आपण कशाला याच्यामध्ये पडायचे…

आणि चार पैशे देतो आणि निघून जातो..पण कृषी विभागामध्ये सुध्दा टक्केवारीशिवाय कामे होत नाहीत..

तेथेसुध्दा टक्केवारी आहेच.असा कोणताच विभाग नाही की त्या विभागामध्ये पैशाची देवाण घेवाण होत नसेल…

वेटर ते मालक आणि १० शाखेचा प्रवास विडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा

सिस्टीम चालवणारेच भ्रष्ट आहेत,अधिकारी असो आमदार असो  किंवा खासदार असो.

यांची टक्केवारी प्रत्येक कामामध्ये ठरलेली असते असे मी एकलेले आहे.

एखादा नगरसेवक एकदाच होतो पण तूम्ही कधी विचार केला की याच्याकडे एवढा पैसा लगेच कसा येतो.

अशे काही मी नगरसेवक बघितले आहेत की त्यांच्या कडे पहिले कार वगैरे काहीच नव्हते पण नगरसेवक झाले की सर्व गोष्टी येतात..

याचा आपण कधी विचार करणार आहेत का..पूढच्या वेळेस पण अशाच लोकांना निवडून देणार आहात..

कायदयाची भिती राहिली नाही की भ्रष्टाचार वाढतो, कायदयाला पलवाटा असतील की भ्रष्टाचार वाढतो.

अशा सर्व गोष्टी असताना भ्रष्टाचार, टक्केवारी कशी कमी होणार, तर कायदा कडक करणे, कायदयाची अमलबजावणी कडक करणे,आणि प्रत्येक शहरात गुरूकूल स्थापन करणे..म्हणजे चांगल्या शाळा स्थापन करणे..

मूलांच्या लहान वयातच संस्कार केले तर तो कोणालाही फसवण्याचा, पैसे वाईट मार्गाने कमवण्याचा प्रयत्न करणार नाही..

सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे आपली शाळा

आणि आपण शिक्षणावर काहीच खर्च करत नाहीत.. मग वाईट वृत्ती कशी नाहीशी होणार..

शिक्षकांना वेळेवर पगार, चांगले शिक्षक नेमणे, चांगल्या सुविधा मूलांना उपलब्ध करून देणे.

शाळामध्ये नैतिक कर्तव्यांची जाणीव करून देणे, देशा विषयी त्या मूलांच्या मनात प्रेम निर्माण करणे.

कोणत्या गोष्टी वाईट आणि कोणत्या चांगल्या या गोष्टी त्याच्या वर सतत सतत बिंबवणे..

मग अशे अधिकारी ,अशे टक्केवारी कमी होतील आणि भारताला कोणी लूटणार नाही…

पैसे घेउ नये म्हणून याच्यावर वचक राहावी म्हणून अशे काही विभाग काम करत आहेत पण तेच यांना पकडता आणि तेच पून्हा स्वत:च काही रक्कम घेतात.

आणि यांना सोडून देतात..मग सिस्टीम मध्ये बसणारेच जर टक्केवारी घेणारे निघाले तर आपल्या भारताला कोण वाचवणार..

यांच्यावर कायदयाची भिती नाही,यांच्या काही विभागांची भिती नाही मग आपल्या भारताला कोण वाचवणार ..

त्यासाठीच लहानपणीच अशा वृत्ती नष्ट करणे ,प्रत्येक युवकांवर अशा प्रकारे संस्कार करणे की तो वाईट मार्गाने जाताना हजार वेळेस विचार करेल..

त्यांच्या मनात पैसा मोठा आहे हे कळण्याच्या अगोदर त्याला प्रेम,दया ,माणूसकी या गोष्टी त्याच्या मनावर बिंबवणे..

याचाही परिणाम होत नसेल तर मग काय कायदयाच्या पळवाटा बंद करून ,कडक कायदा करणे..

भारताला लागलेली किड लवकरात लवकर नष्ट होणे गरजेची आहे.कारण भारताला ही आतून नासकी बनवत आहे..

खरच आपल्या न्यायदेवतेने पट्टी बांधली आहे का ? पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लेखक : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button