आजचा भारत आणि भारतीय संस्कृती
जर वेळेप्रमाणे या वेळीसुध्दा प्रवचन सुरू झाल , प्रवचनामध्ये महाराजांनी भारतीय संस्कृती महान संस्कृती आहे असे ते त्यांनी सांगितले. यात काय दुमत नाही. पण थोडा विचार करून बघा खरच भारतीय संस्कृती महान असेल तर आजबाजूला जे घडत आहे त्यावरून मी कसा विश्वास ठेवू की आपली संस्कृती महान आहे. भुतकाळातील घटनेचा आधार घेउन आपण काही वेळा पूरते छाती ठोक पणे म्हणू शकतो की आपली संस्कृती महान आहे. पण खरच आज ते महान पण ज्या गोष्टी मुळे किंवा ज्या संस्कारामुळे आपल्याला प्राप्त झालते त्याचे खरच अस्तित्व राहिले आहे का…..
महाराजांनी थोडया वेगळया पदधतीने उत्तर दिले ते म्हणाले की तुमच्या सारख्या युवकामधील नकारात्म्क विचाराने तुम्हाला आपली संस्कृती महान कशी वाटेल..
पण महाराजांना कमी वेळेत मी प्रश्न नीट सांगण्यात कमी पडलो.. हा प्रश्न खूप गंभीर आहे. हा प्रश्न एकटया माझ्या मनातील नाही. हा प्रश्न असंख्य भारतीय लोकांच्या मनातील आहे.
आजही बलात्काराच्या घटना घडत आहेत ,आजही कमी वयामध्ये मुलीचे लग्न होत आहे,आज ही हुंडा घेणे बंद झालेले नाही, चोरीचे प्रमाण वाढलेले आहे, युवा पिढी नशा करत आहे,आई वडीलपाशी मुलं मोठी झाली लग्न केल की नौकरीच्या निमित्ताने आई वडीलापासून लांब राहत आहेत. भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले आहे, मोठयांचा आदर कमी झाला आहे, स्वार्थीपणा वाढलेला आहे, सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय बाबीमध्ये विकास करण्यात भारत बाकी देशाच्या तुलनेत खूप खालच्या पाय-यावर आहे. भारत आनंदी देशात सुध्दा खालच्या स्थरावर आहे…
शिक्षणाच्या बाबतीत सुध्दा भारत ब्रिटिश कालीन अभ्यासक्रम वापरत आहे.
मला कशी वाटेल भारतीय संस्कृती महान … आणि महाराज म्हणता की मी नकारत्मक विचार करत आहे. मी सत्य परिस्थीवर समोर ठेवून हे विधान केले होते…. संस्कार आणि संस्कृती या दोन्ही महान असेल तर आपला विकास, भारताचा विकास, समाजाचा विकास होयला पाहिजे असे मला वाटते.. मला असा विकास झालेला दिसत नाही.
कुणाचं मन दुखवलं असेल मी तर मला माफ करा…..मी माझे विचार माडण्याचा प्रयत्न केला आहे…
लेखक : राम ढेकणे