नवीन पोस्ट्ससामाजिक
उस्मानाबादची भयानक अवस्था शहाजी बापू पाटील यांच्या अंदाजामध्ये Osmanabad
- काय ते उस्मानाबाद
- काय ते उघडया नाल्या
- काय ते रस्त्यावरील खडडे
- काय ते मुद्दामून सोडून दिलेली डुकरं
- काय ते कुणाच्या मालकीचे नसलेले जनावरे
- काय ते इंदिरा नगर
- काय ते इंदिरा नगर समोरील घानीचे साम्राज्य
- काय ते बस स्टॅन्ड वरील घान
- काय ते बस स्टॅन्ड वरील स्वच्छता
- काय ते बॅनरबाजी
- काय ते बसस्टॅन्डच्या शेजारील दारू चे दुकान
- काय ते नगरसेवक
- काय ते नगरपालिकेचे कर्मचारी
- काय ते गायब असलेले नगरपालिकेचे कर्मचारी
- काय तो आठवडी बाजार
- काय ते श्री चित्रपटगृह
- काय ते रस्त्यावर बसेलेले भिकारी
- काय ते तूळजाभवानी स्टेडियम
- काय ते नाटक न होणारे नाटयगृह
- काय ती भोगावती नदी
- काय तो सरकारी दवाखाना
- काय ते सरकारी कर्मचारी
- काय ते युवकांना कर्ज न देणारी मुद्रा योजना
- काय ते वेसन करणारे बेरोजगार तरूण
- काय ते वाढलेल्या टपऱ्यांची संख्या
- काय ती आडत
- काय ते पुडया खाउन शिकवणारे मास्तर
- काय त्या शाळेतील सुविधा
- काय ते उच्च शिक्षण
- काय त्या डायरेक्ट परीक्षेला ये म्हंटणाऱ्या संस्था
- काय ती शिक्षणाची पातळी
- काय ती शहराची स्वच्छता
- काय ते सुन्न पडलेली बाजारपेठ
- काय ते साखर कारखाने
- काय ती युवंकाची दुसऱ्या शहरात रोजगारासाठी होणारी भटकंती
- काय तो गणेश नगर च्या पाठीमागील बाजूचा कचऱ्याचा ढीग
- काय ती चार दिवसातून एकदा येणारी कचऱ्याची गाडी
- काय ती बँकेतील वयस्कर लोकांच्या रांगा
- काय तो रेल्वे स्टेशनचा दिवे नसणारा रस्ता
- काय ते रात्री ९च्या आत बंद होणारं मार्केट
- काय ते सेंट्रल बिल्डींग मधील पानाने ,तंबाखू खाउन लोकांनी रंगवलेली भिंत
- काय ती मुतारीची अवस्था
- काय ते बसमधील स्वच्छता
- काय ते बोटावर मोजता येतील एवढे उदयोग
- काय त्या लेण्यांची अवस्था
- काय तो शहरातून गेलेला हाय वे बिना सर्विस रोड चा
- काय ते प्रायव्हेट शाळेवरील शिक्षकांची अवस्था
- काय त्या आउटलेट नसल्याला नाल्या
- काय त्या कागदावरच्या योजना
- काय तो लपून बसलेला भूहारी गटारीचा प्रकल्प
- काय तो वापस जाणारा निधी
- काय ते नौकरी साठी आई वडीलांना सोडून जाणारे पोरं
- काय ते आमदारांच,खासदाराच जिल्हयाकडे असलेले लक्ष
- काय ती गरिबी
- काय ते जिल्हयाचे ठिकाण
- काय ते उस्मानाबाद
- काय ते धाराशिव
सर्व कसं कसं कसं कसं एकदम ओके…
धाराशिव चा पुत्र – राम ढेकणे ( हा लेख धाराशिवच्या काळजी पोटी लिहिलेला आहे… माझे धाराशिव वर तितकेच प्रेम आहे जेवढे तुमचे.. कोणी वाईट वाटू न घेता याच्यावर विचार करावा. )