Rohit-Jadeja hits century for England | रोहित जडेजाचा इंग्लंडला शतकी तडाखा
कर्णधार रोहित शर्मा ची बॅट अखेर तळपली त्याने नेतृत्वाला साजेशी खेळी करीत 131 धावा ठोकल्या. अष्टपैलू रवींद्र जडेजा ने घरच्या मैदानावर स्थानिक चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी देत नाबाद 110 धावा केल्याने भारताने इंग्लंड विरुद्ध(Rohit-Jadeja hits century for England ) गुरुवारी येथे सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी सुरुवातीच्या धक्क्यातून सावरताना पाच बाद 326 अशी भक्कम वाटचाल केली.
रोहित-जडेजा यांनी चौथ्या गड्यासाठी 204 धावांची भागीदारी करीत दिवस गाजवला इंग्लंडविरुद्ध भारताची ही चौथ्या गड्यासाठी सर्वात मोठी भागीदारी ठरली. पदार्पण करणारा सर्फराज खान याने (66 चेंडूत 62 धावा) अर्धशतकी खेळी केली. खेळ थांबला त्यावेळी नाईट वॉचमन कुलदीप यादव एक धाव काढून खेळत होता नाणेफेक जिंकून फलंदाजी घेत भारताने तीन युवा फलंदाज 33 धावात गमावले होते यशस्वी जयस्वाल (10) शुभमन गिल (0) आणि रणजीत पाटीदार (5) हे माघारी परतल्यानंतर रोहित-जडेजा यांनी सूत्रे सांभाळली. या दोघांनी निरंजन शहा स्टेडियमच्या पाटा खेळपट्टीवर सहजपणे दावा काढल्या. एकाग्रता आणि आक्रमतेचा परिचय देत खराब चेंडूवर मोठे फटके मारले.
Miss Japan (Karolina) 2024 | मिस जपानला परत करावा लागला किताब !
रोहितने लेग स्पिनर रेहान अहमदचा चेंडूवर दोन धावा घेत अकरावे कसोटी शतक गाठले. सलामीवीर म्हणून इंग्लंड विरुद्ध त्याचे हे तिसरे शतक आहे. पुढच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित विकेटवर स्टोकसकडे झेल दिला त्याने 196 चेंडूत 14 चौकार आणि तीन षटकार मारले.
मागच्या दोन सामन्यात अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या रोहितला(Rohit-Jadeja hits century for England ) भाग्याची साथ लागली. जेम्स अँडरसन च्या चेंडूवर त्याच्या विरुद्ध पायचीचे अपील डी आर एस मध्ये इंग्लंडच्या विरोधात गेले काही षटका नंतर फाटलीच्या चेंडूवर स्लीप मध्ये त्याचा जेल सोडला त्यावेळी रोहित 27 धावांवर होता.
सरफराजचा खेळ पाहून तो पहिली कसोटी खेळत असल्याचे वाटत नव्हते. चौफेर आक्रमक फटके मारताना त्याने फलंदाजीतील कौशल्य दाखवून दिली. टॉमला षटकार खेचून त्याने 48 चेंडूत अर्धशतक गाठले. सरफराज मोठी केळी करेल असे वाटत असताना जडेजाच्या चुकीमुळे तो धावबाद होऊन परतला त्याने नऊ चौकार आणि एक षटकारसह 62 धावांचे योगदान दिले.
एल आयसी सरल पेंशन योजनेविषयी माहिती Lic Saral Pension Plan Scheme Information in Marathi
पदार्पण वीर सरफराज मैदानावर आला आणि त्याचे वडील कोच नौशाद खान व पत्नीने टाळ्यांच्या कडकडात त्याचे स्वागत केले. पवेलियनच्या दिशेने जाणाऱ्या रोहितनेही त्याची पाठ थोपटली सुरुवातीला सावध खेळ करून सेट झालेल्या सरफराज ने हात मोकळे केले अर्धशतक पूर्ण केले. चांगली फलंदाजी करत असताना तो दुर्दैवीरीत्या बाद झाला. 99 धावांवर खेळणारे जडेजाने आधी एक धाव घेण्यासाठी त्याला कॉल दिला परंतु लगेचच त्याला माघारी पाठवले तोपर्यंत मार्क उडणे चेंडू उचलून यष्टींवर अचूक थ्रो केला सरफराज काही काळासाठी स्तब्ध झाला ड्रेसिंग रूम मध्ये बसलेल्या कर्णाला रोहित शर्मा देखील या विकेटमुळे प्रचंड संतापला होता आणि त्याने रागाच्या भरात डोक्यावरची कॅप खाली आपटली. रोहित शर्माची ही प्रतिज्ञा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली.