नवीन पोस्ट्समनोरंजन

Miss Japan (Karolina) 2024 | मिस जपानला परत करावा लागला किताब !

देशाची सौंदर्यवती म्हणून मान मिळवणं कोणत्याही तरुणीसाठी अति अभिमानाची बाब! कारण या पदापर्यंत ( Miss Japan (Karolina) 2024)पोहोचनं ही खरंच खूप मोठी मेहनतीची आणि सन्मानाची बाब समजली जाते. त्यासाठी त्या सौंदर्यवतीला सर्वार्थाने खूप मेहनत घ्यावी लागते.

कारण या पदापर्यंत पोहोचल्यानंतर अनेकीचा आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू होतो आणि तो मिस युनिव्हर्स मिस वर्ल्ड सारख्या आणखी मोठ्या सन्मानांपर्यंतही पोहोचू शकतो.
अगदी त्या पदापर्यंत त्या पोचू शकल्या नाहीत तरी करिअरचे इतरही मार्ग त्यांच्यासाठी देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खुले होतात.

India’s batting lineup | रोहितच्या फलंदाजीसह मधल्या फळीची चिंता कायम

सौंदर्यवती कॅरोलिना शीनो. मीस जपान 2024 म्हणून एक मताने ज्युरीनी तिची निवड केली. तिच्या आसपासही कोणी नव्हतं अत्यंत मेहनतीन या पदापर्यंत ती पोहोचली पण नुकताच तीन आपला हा किताब परत केला कारण? त्याची कहाणी तशी मोठी आहे. कोणाही साठी त्यातही अशा सन्मानाच्या पदापर्यंत पोहोचणाऱ्या व्यक्तींसाठी त्यांचं चारित्र्य ही सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट मानली जाते मात्र याच कारणावरून कॅरोलीनाला आपला मिस जपानचा किताब परत करावा लागला आहे.

जपान हा एक असा देश आहे जिथे चारित्र्याला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. आपलं सामाजिक चारित्र्य निष्कलंक असावं अशी समाजाची ही अपेक्षा असते मग कॅरोलिनान असं काय केलं यावरून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडावेत आणि त्यामुळे तिला आपल्याला मिळालेला सर्वोच्च सन्मान पर्यंत परत करण्याची वेळ यावी?

कॅरोलिना ही तशी मूळची युक्रेनची तिचा जन्म युक्रेनमध्ये झाला आहे पण तिच्या आईच्या दुसऱ्या लग्नात नंतर ती जपानमध्ये आली जपानमध्ये आली तेव्हा ती केवळ पाच वर्षांची होती पण तेव्हापासून ती स्वतःला जपानची समजते इतकी ती जपानी संस्कृतीशी एकरूप झाली होती. आपण युक्रेणी आहोत असं कधी तिला वाटलंच नाही कारण शिक्षणातून ते चालीरी तीन पर्यंत सर्वार्थानती जापानी झाली होती जपान मधील आघाडीची मॉडेल म्हणून ती प्रसिद्ध आहे.

पण एक चूक मात्र तिच्याकडून झाली ती म्हणजे एका विवाहित जापानी पुरुषावर तिचा प्रेम बसलं आणि तीन ते लपवून ठेवलं याबाबत सौंदर्य स्पर्धेच्या संयोजकांनाही तिनं काही सांगितलं नाही. हेच कारण आहे ज्यामुळे तिला आपला बहुमान परत करावा लागला.

कॅरोलीनानं मिस जपानचा किताब जिंकल्यानंतर सगळ्यांनी तिचं अमाप कौतुक केलं मूळ युक्रेनचे असूनही जापानी संस्कृती ती कशी विरघळून गेली आहे याबद्दल तिचे गोडवे ही गायले गेले. पण त्यानंतर काही दिवसांपूर्वीच जपानच्या एका मॅगझिनने तिच्याविषयी एक स्टोरी प्रसिद्ध केली. त्यात तिच्या खासगी आयुष्याचा ही उल्लेख होता. त्यात म्हटलं होतं की कॅरोलीनाचे जपानच्या एका विवाहित पुरुषाशी मैत्रीचे संबंध आहेत यानंतर मात्र जपानमध्ये वादळ उठलं आणि त्याबद्दल कॅरोलीनावर चहोबाजूने टीकेचा भडीमार सुरू झाला. अनेकांनी तर सवाल केला कॅरोलिना जर मूळची युक्रेनची आहे. तिचा जन्म जर जपान मधला नाही तर तिला मी जपान हा किताब दिलाच कसा जाऊ शकतो या किताबासाठी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुळातच ती पात्र नसताना तिला हा किताब दिला जाणं म्हणजे एका प्रकारचा भ्रष्टाचार आहे तिच्याकडून हा किताब परत घेण्यात यावा.

पीएम श्री योजना सरकारी शाळा़ंचा विकास Pm Shree School Scheme Information in Marathi

जपानी मॅगझीन मध्ये छापून आलेल्या लेखानुसार कॅरोलिना जपान मधील सोशल मीडिया इन्फ्लोअंसर असलेल्या ताकुमा मायदा या विवाहित डॉक्टर सोबत विवाहबाह्य नात्यात आहे. हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर कॅरोलिनाशी संबंधित जवळपास सगळ्यांनी त्याचा इन्कार केला. सौंदर्य स्पर्धेच्या आयोजकांनी तिचा बचाव करण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं कॅरोलिना ज्या डॉक्टरशी डेट करत आहे त्याचं आधीच लग्न झालेला आहे हे तिला माहित नव्हतं पण हे तिला माहीत होतं हे उघड झाल्यानंतर मात्र लोकांची दिशाभूल केल्याबद्दल कॅरोलिनाला लोकांची माफी मागावी लागली.
जपान टाइम्सनही याबाबत म्हणला आहे फ्री वे या कॅरोलीनाच्या मॉडेल एजन्सीने सांगितलं सुरुवातीला डॉक्टर यांनी कॅरोलिनाला सांगितलं होतं की ते सिंगल आहेत पण ते विवाहित असल्याचा समजल्यावरही कॅरोलिना त्यांच्यासोबतचे संबंध संपुष्टात आणले नाहीत.

मला माफ करा !

कॅरोलीनाला हीच बाब महागात पडली आणि शेवटी तिने आपला किताब (Miss Japan (Karolina) 2024) स्वतःहून परत केला !आता हा किताब वर्षभर इतर कोणालाही दिला जाणार नाही. किताब परत केल्यानंतर माफी मागताना कॅरोलीने म्हणाली माझ्यामुळे अनेकांना त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी आहे. ज्यांनी माझा समर्थन केलं त्यांनाही मी दुखावला आहे माझ्या खासगी आयुष्यातील गोष्ट बाहेर आल्यानंतर खरं बोलण्याची हिंमत मी दाखवू शकले नाही, मला माफ करा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button