अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार गुरुवारी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुरगंटीवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर अभिनेत्री निवेदिता सराफ आमदार मनीषा कायंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्या महाराष्ट्रात मी जन्मलो त्या भूमीचा पुरस्कार मिळण्यापेक्षा मोठा आनंदाचा क्षण नाही. महाराष्ट्राचा प्रेक्षक अतिशय बुद्धिमान आहे. त्यांना आवडले तर ते डोक्यावर घेतात त्यामुळे आपण जे करतो ते समोर बसलेल्या लोकांना आवडले पाहिजे प्रेक्षकांचे हे उपकार कधीच फेडू शकणार नाही. तुमचे हे प्रेम कायम मनात राहील असे उद्गार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी काढले. महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.
अष्टपैलू व्यक्तिमत्व :मुख्यमंत्री शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले अष्टपैलू हा शब्द खऱ्या अर्थाने अशोक सराफ यांना लागू होतो. सलग ५० वर्षे असंख्य भूमिका करून आजही नवे काहीतरी करण्याची त्यांना भूक कायम आहे. मराठी मातीतील ते अस्सल हिरा आहेत त्यांच्या पंचाहत्तरीत त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणे हा अमृताहुनही गोड क्षण आहे .अशोक यांचे आडनाव सराफ असले तरी त्यांची सोन्याची पेढी नाही पण त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे हिरे मोत्यांची उधळण केली आहे. मागील तीन वर्षांचे पुरस्कार देण्यासाठी आम्हाला सरकार स्थापन करावे लागले हे भाग्य आम्हाला लाभले उरलेली कामही आम्हालाच करावी लागणार असल्याचेही ते म्हणाले.
जीवनाला समृद्ध करणाऱ्या कलाकारांना पुरस्कार
देवेंद्र फडणवीस म्हणाले की चित्रपट सृष्टी आणि आपल्या जीवनाला समृद्ध करणाऱ्या कलाकारांना पुरस्कार देत आहोत. अशोक सराफ यांनी साकारलेल्या नायक स्वप्नातील नसून वासू जीवनात असल्याने त्यांनी मराठी रसिकांच्या मनावर राज्य केले सुरेश वाडकर हे आमचे आवडते गायक आहेत. त्यांच्या आवाजाची सुरेलता आजही कायम आहे असेही ते म्हणाले.
गटई स्टाॅल योजनेविषयी माहीती Gatai Stall Scheme Information in Marathi
वरळी येथील दोन एन एस सी आय येथे 57 वा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 2023 वर्षातील महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सुरेश वाडकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. याखेरीज चीत्रपती व्ही शांताराम आणि राज कपूर जीवन गौरव व विशेष योगदान पुरस्कारही देण्यात आला.
गुलजार की शायरी जिंदगी | गुलजार यांचे कवितेचे जीवन
या सोहळ्याला केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसकर आमदार मनीषा कायंदे सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खर्गे सांस्कृतिक संचालक बिबीशन चौरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. शाल ,पुष्प, गुच्छ सन्मानपत्र सन्मानचिन्ह व 25 लाख रुपये असे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे स्वरूप आहे.
मा स्वर सरस्वती लता मंगेशकर पुरस्कार
ये जिंदगी गले लगा ले या गाण्याच्या सुरक्षेत सुरेश वाडकर म्हणाले की माझी मा स्वर सरस्वती लता मंगेशकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे यापेक्षा मोठे काय असू शकते? हा पुरस्कार स्वीकारताना खूप भावुक झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.