पैशाविषयीमनोरंजनव्यवसायशेअर मार्केटसामाजिक

आठवडयातून फक्त चार दिवस कामाचे ,तीन दिवस सुट्टीचे

आपल्या साठी एक आनंदाची बातमी भविष्यात आपल्या कानावर पडणार आहे,

सरकारी आणि मोठ मोठया कंपनी मध्ये काही दिवसांनी आपल्याला ही बातमी कानावर ऐकायला मिळेल की आठवडयातून फक्त चार दिवसच काम बाकी चार दिवस सुट्टीचे, पण या चार दिवसांमध्ये आपल्या कामाची वेळ मात्र वाढवणार आहेत, सकाळचा वेळ आणि रात्री काही तास वाढवला जाउ शकतो. पण यामूळे सरकारला काय साध्य करायचे आहे हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.. आपण तोपर्यंत याचा आपल्या परीने खूलासा करण्याचा प्रयत्न करू. हा निर्णय का घेण्यात येईल याचा आपण विचार करुया.

पहिली बाजू अशी असू शकते की मानावाचा जन्म काय फक्त काम करण्यासाठी नाही झाला, गाढवासारखे सतत काम करत राहणे हे चूकीचे आहे, आपल्या जीवनात आपण काम करत असताना आपले जीवन आपल्याला जगता यावे, आपल्या माणसांना, आपल्या परिवारांना वेळ देता यावा, तसेच सतत काम करत राहिल्यामुळे माणसाची कार्यक्षमता जास्त टिकत नाही, किंवा काम करत असताना माणसांना विश्रांतीच नसेल तर  दिलेले काम माणूस करताना जी उर्जा त्या मध्ये असणे आवश्यक आहे त्या उर्जेने तो काम करताना दिसत नसेल, म्हणून हा निर्णय घेतील असे माझे वैयक्तिक मत आहे.

दुसरी बाजू अशी असू शकते की आपली अर्थव्यवस्थेला जर चालना दयायची असेल, तर माणसांना खर्च करण्याची सवय लावावी लागेल, मग व्यक्ती खर्च कधी करणार त्याच्याकडे वेळ असेल तेव्हा, आयुष्य जगायला जीवनांतील इतर गोष्टीचा स्वाद घेण्यासाठी त्याला वेळ देणे गरजेचे आहे, जसा वेळ त्याच्याकडे शिल्लक राहील तो एका ठिकाणी बसणार नाही.. तो पर्यटन स्थळांना भेटी देईल, बाहेर हॉटेल मध्ये जेवायला जाईल, किंवा बाहेरचे घरी खायला आणेल, किंवा घरीच काहींना काही खरेदी करून काहींना काही तो करण्याचा प्रयत्न करत राहील.. शेवटी पैशाची देवाण घेवाण जेवढी जास्त होईल तेवढा फायदा देशाला आणि इतर व्यवसांना होईल, म्हणजे व्यक्तींचे मन पण आनंदी राहील आणि देशाला पण त्याचा फायदा करून घेता येईल.

एक दिवस सुट्टी असली की व्यक्ती फक्त अजूबाजूच्या पर्यटन स्थळांना भेटी देतो.. एखादे पर्यटन स्थळ झाले की वापस कामावर जावे लागते, मग पूर्णपणे त्या पर्यटन सथळांचा आनंद पण घेउ शकत नाही.. या कमी वेळे मध्ये मग तो पैसा पण कमी खर्च करतो आणि परत आपली अर्थव्यवस्था जेवढया गतीने फिरायला पाहिजे होती तेवढी फिरणार नाही…

एका दिवसामध्ये व्यक्ती जास्त दुर जाउ शकणार नाही, तसेच वेगवेगळया क्रिया करणे एका दिवसामध्ये शक्य नाही, आपल्या जवळच्या माणसांना वेळ देणे सुध्दा आपली नैतिक जबाबदारी आहे तो पार करताना सुध्दा एक दिवसामुळे अडथळा येतो.. म्हणून एक दिवसांची सुट्टी मध्ये बदल करून आता फक्त चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी आपल्याला मिळेल किंवा असा निर्णय सरकार घेईलच लवकरात लवकर..

समजा काही जणांना अजूबाजूच्या राज्यांमधील पर्यटन स्थळांना भेटी दयायचया असतील तर जाण्यासाठीच एक दिवस लागत असेल तर त्यांना एक दिवसात परत येणे शक्य नाही.. काही जणांना जास्त दूर परदेशी फिरायला जायचे असेल त्यांना सुध्दा शक्य नाही..

काही जणांना आसपास च्या देशाला फिरायला  जायचे असेल त्यांना पण शक्य नाही.. काही जण आपला परिवार सोडुन कामानिमित्त बाहेरच्या शहरात राहतात,काही जण बाहेरच्या राज्यांत राहतात अशा लोकांना तिन दिवस सुट्टी जर मिळाली जर ते आपल्या परिवारांकडे जास्त लक्ष देतील..

शेवटी या निर्णयांने सरकारला पण फायदा होणार आहे आणि सामान्य माणसांना जीवनातील वेगवेगळया गोष्टीचा आनंद घेता येईल आणि आपल्या परिवाराकडे लक्ष देता येईल..तसेच यामुळे खूप जणांच्या हाताला काम भेटेल आणि आपल्या खिशातील पैसा बाजारात फिरल्या मुळे देशाची स्थिती सुधारण्यात मदत होईल..त्या पैशांचा वापर विकास कामामध्ये सरकार करेल..

लेखक : राम ढेकणे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button