जागतिकनवीन पोस्ट्स

75 years of independence: स्वातंत्र्याचे ७५ वर्ष.

75 years of independence: आज आपल्याला स्वातंत्र्य भेटून ७५ वर्ष पूर्ण झाले.सर्व जण हर घर तिरंगा या योजनेची अमल करताना दिसत आहेत.मी पण आमच्या घरावर झेंडा लावून सर्वांसोबत ७५ वर्ष साजरे केले.


सर्व ठिकाणी देशाबद्दल असणारे प्रेम व्यक्त होताना दिसत आहे,काही जण आपल्या सोशल मिडीयावर आपला झेंडाबरोबरचा फोटो शेअर करत आहेत.

स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या भारत भूमीसाठी बलिदान दिले त्यांची आठवण काढणे आणि त्यांच्या कार्याची जनजागृती करून ,त्यांच्या विचारातून आपण शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे..
त्याचे शौर्य,त्यांच्याकडे असलेला संय्यमीपणा,त्याग करण्याची वृत्ती ,अशा अनेक गोष्टी आपल्याला त्यांच्या कडून शिकण्यासारख्या आहेत.

आपल्याला जे आज स्वातंत्र्य मिळाले आहे ते त्यांनी त्यांचा वर्तमान त्याग करून मिळालेले हे स्वातंत्र्य आहे,

काही जणांनी तर आपल्या साठी जीवाची सुध्दा चिंता केली नाही,काही जणांनी आपले निम्मे आयुष् तुरुगांत घालवले,
काही जणांनी तर आपल्या प्राणांची आहुती दिली.

काही जणांनी जनजागृती करण्यात आपले आयुष्य घालवले,काही जणांनी आपल्या मनात आत्मविश्वास निर्माण केला,काही जणांनी देशासाठी प्राण दयायला मागेपुढे न बघणारे वीर निर्माण केले,काही जणांनी आधुनिक शिक्षण घेउन लोकांमध्ये जनजागृती केली.काही जणांनी धन पुरवले,काही जणांनी अन्न पुरवले,अशा अनेक लोकांनी मिळून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले..

मग या स्वातंत्र्याचा उपयोग करुन आपल्या लोकांनी आपल्या देशातील गरीबी दूर करण्याचा प्रयत्न केला,प्रत्येकाला अन्नाचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला..प्रत्येकाला काम देण्याचा प्रयत्न केला,भारताला पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेला,नविन नविन शोध लागलेल्या यंत्राचा वापर करून उदयोगाला चालना देण्याचा प्रयत्न केला,रोजगार निर्माण करण्यासाठी वेगवेगळया योजना राबवण्यात आल्या,शेती मध्ये नवीन नवीन प्रयोग करण्यात आले,शिक्षणात सुध्दा आपण खूप बदल करण्याचा प्रयत्न केला,सगळया क्षेत्रात प्रगती करण्याचा भारताने प्रयत्न करण्यात आला..काही क्षेत्रामध्ये भारताला यश आले,तर काही क्षेत्रामध्ये भारत आजही खूप मागे आहे..काही क्षेत्रामध्ये भारत अग्रेसर देशात गणला जातो,तर काही क्षेत्रामध्ये भारत हा खालून पहिल्या ,दुसऱ्या क्रमाकांवर आहे, 75 years of independence

पण आपल्याच लोकांच्या मानसिकतेमुळे आणि भ्रष्टाचारामुळे आपण अपेक्षित अशी उंची या ७५ वर्षामध्ये गाठू शकलो नाही..आपल्या भारताचा विकास होत आहे,भारत पुढे जात आहे,भारत नविन गोष्टीचा स्वीकार करत आहे,पण गतीचा विचार केला तर भारत खूप संथ गतीने पूढे सरकत आहे..प्रगती खूप संथ गतीने होत आहे.

त्याला कारण की आपण ज्यांना निवडून देतो,आणि ज्यांच्या वर देश चालवण्याची आणि प्रगती करण्याची जबाबदारी आहे अशा व्यक्ती स्वत:च्या फायदासाठी भ्रष्ट झाली आहेत.प्रत्येक कामामध्ये टक्के वारी घेतल्याशिवाय काम पुढे सरकत नाही. ही सवय भारताला प्रगती करण्यापासून थांबवत आहे..75 years of independence
जो पर्यंत अशा माणसांची मानसिकता बदलत नाही..त्यांचे देशावरील प्रेम जागृत होत नाही तोपर्यंत आपला देश संथ गतीनेच प्रगती करेल..
जो सत्तेवर बसला आहे तो जर चांगल्या विचाराचा निघाला तर नक्कीच आपल्या देशाला चांगले दिवस येतील..आणि आपली प्रगती नक्कीच होईल.
आजही ७५ वर्ष पूर्ण होउन सुध्दा २ वेळेचे जेवण काही जणांना भेटत नाही..आज ही काही जणांच्या हाताला काम नाही,आज ही काही भागामध्ये शिक्षणाची व्यवस्था नाही..आज ही उच्च शिक्षण काही जण घेउ शकत नाहीत..75 years of independence

७५ वर्षामध्ये आपण लोकांना साध्या मूलभूत गोष्टी देण्यात कमी पडलो आहोत..
अजूनही काही जणांना राहण्यासाठी घर नाही,पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही,आज ही काही घरामध्ये वीज नाही,आज ही काही जणांच्या घरी टॉयलेट ची सोय नाही..आज ही काही गावामध्ये रस्ते नाहीत..आज ही काही गाव शहरांना जोडली गेली नाहीत..
येणाऱ्या २५ वर्षांत कमीत कमीत या मूलभूत गोष्टी प्रत्येकाकडे असायला पाहिजे..हातात मोबाईल आला पण त्यामध्ये लागणारा रिचार्ज साठी पैसे कमवण्यासाठी काम जर भेटत नसेल तर त्या आधुनिक जगात सामान्य माणसांनी कशे जगायचे ..येणाऱ्या २५ वर्षांत प्रत्येकाच्या हाताला काम आणि मूलभूत गोष्टी भेटल्या तर येणारे १०० वे भारताचे स्वातंत्र्य वर्ष संपूर्ण भारत आनदांने साजरा करेल..75 years of independence

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button