नवीन पोस्ट्स

कॅन्टीन व्यवसाय सुरुवात कशी करावी: How to start a new canteen business

How to start a new canteen business: मित्रांनो नमस्कार, आजकाल प्रत्येकालाच घाईचे आयुष्य जगावे लागत आहे, आणि अशा वेळेस आपल्या कामाच्या अथवा शिक्षणाच्या ठिकाणी जाताना घरून खाद्यपदार्थ घेऊन जाणे प्रत्येकच वेळी शक्य होईल असे नाही. अशावेळी मदत मिळते ती तिथे असणाऱ्या कॅन्टीन ची. कार्यालये, शाळा, महाविद्यालय इत्यादी ठिकाणी कॅन्टीन चालवण्याचे काम हे उत्पन्नाचे एक उत्तम साधन आहे. कॅन्टीन चालवण्यासोबतच तुम्ही टिफिन सेवाही सुरू करून उत्पन्नात अधिकची भर घालू शकता.   मात्र हा व्यवसाय सुरू करताना याविषयीची संपूर्ण माहिती प्रत्येकालाच असते असे नाही, म्हणूनच आजच्या या लेख प्रपंचात आम्ही तुम्हाला कॅन्टीन व्यवसाय सुरू करण्याबाबत इत्यंभूत माहिती देणार आहोत. यामध्ये सुरुवात कशी करावी?, ठिकाण कुठले निवडावे?, परवानगी, खर्च, आणि उत्पन्न इत्यादी सर्वच बाबींबद्दल सखोल माहिती देणार आहोत…

कॅन्टीन सेवा चालवण्यासाठी कोणतेही प्रशिक्षण घेणे गरजेचे असत नाही. या कामासाठी फक्त चांगल्या आणि प्रामाणिक व्यवस्थापकाची गरज आहे. पुढे जाऊन हळूहळू कॅन्टीन चांगल्या पद्धतीने चालवण्याची कला शिकता येते.

कॅन्टीन व्यवसाय सुरुवात कशी करावी माहिती

पहाण्यासाठी येथे क्लिक करा

उत्पन्नाचे साधन म्हणून कॅन्टीन कडे बघताना Canteen as a Income Source

कॅन्टीन व्यवसायातून किती उत्पन्न मिळू शकते हे कॅन्टीनच्या आकारावर, किती साधने किंवा सामग्री आवश्यक आहेत आणि किती ग्राहकांना सेवा द्यायची यावर अवलंबून असते. कँटीन व्यवसाय 10,000 रुपयांपासून सुरू केले जाऊ शकते. पदार्थ विकून मिळालेला पैसा पुन्हा पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्या मालावर खर्च केला पाहिजे, जेणेकरून दिवसेंदिवस व्यवसायात वाढ होण्यास मदत होईल. 

कॅन्टीन चालवण्यासाठी सुरुवात कशी करावी? How to start a new canteen business?

मित्रहो, तुम्हाला यासाठी शाळा, महाविद्यालये, कंपन्या किंवा संस्थांच्या कार्यालयात जाऊन निविदा अर्थात टेंडर काढल्या आहेत का याबद्दल चौकशी करावी लागेल. जर निविदा काढलेल्या असतील तर योग्य नमुन्यात निविदा भरून संबंधित कार्यालयामध्ये जमा कराव्या लागतात. जर संबंधित अधिकारी तुमच्या निश्चित केलेल्या रकमेवर आणि कामावर खुश असतील तर तुम्हाला टेंडर मिळण्याचे चान्सेस वाढतात, आणखी परिणामकारकपणे प्रभाव टाकण्यासाठी निविदा सादर केल्यानंतर एकदा तरी त्या अधिकाऱ्यांना समक्ष भेटा.

मित्रहो, शाळांपासून महाविद्यालयांपर्यंत सरकारी किंवा खाजगी संस्थांपर्यंत कुठेही कॅन्टीन आधीच अस्तित्वात असलेल्या ठिकाणी निविदा केव्हा मागवल्या जातात ते शोधा. जेव्हा तुम्हाला कॅन्टीनचे कंत्राट मिळेल तेव्हा तुम्ही ज्या ग्राहकांना सेवा देणार आहात त्यांच्या आवडीनिवडी जाणून घ्या. कॅन्टीन चालवण्याकरिता कुटुंबातील सदस्यांकडून मदत मागितली तर कर्मचारी वर्गाच्या पगारावरील खर्च वाचवला जाऊ शकतो. 

कॅन्टीनसाठी कच्चा माल Raw material to canteen business

मित्रानो, तुम्ही स्वतः सकाळी सकाळी नाश्ता पदार्थ बनवू शकता किंवा तुम्हाला शक्य नसेल तर बाहेरूनही बनवून घेऊ शकता.  तुम्ही सकाळी छोले-कुल्चे, समोसे आणि काळा हरभरा इ. गोष्टी विक्रीस ठेऊ शकता. तुम्ही क्रिम रोल्स, पॅटीज, बिस्किटे, चिप्स इ.च्या निर्मात्याशी किंवा विक्रेत्याशी संपर्क साधू शकता. ते दर महिन्याला/आठवड्याला/दिवसाला गरजेनुसार कॅन्टीनमध्ये वस्तू पोहोचवण्याचे काम चोख करतात. मात्र विश्वासार्हता जपण्यासाठी तुम्ही त्यांना नेहमी वेळेवर पेमेंट करा. आणि वस्तू क्रेडिटवर घ्या. मग तुमची कॅन्टीनरुपी गाडी सुरळीतपणे चालण्यास मदत होईल. मासिक आधारावर तुम्ही किराणा, ज्यामध्ये मैदा, तूप, साखर, चहा, कॉफी इत्यादी खरेदी करू शकता.

टिफिन सेवा Tiffin Service

मित्रहो,टिफिन हे खाद्य व्यवसायातील सर्वात जास्त नफ्याचे आणि मागणीचे काम आहे.  ज्या मुलांना आणि मुलींना वसतिगृहात खाण्याची सोय नाही किंवा ज्यांना बाहेर भाड्याने खोल्या घ्याव्या लागल्या अश्या विद्यार्थी आणि घरापासून लांब राहणाऱ्या नोकरदार वर्गासाठी टिफिन गरजेचा असतो. अश्या वेळेस त्यांना दिवसातून दोन वेळा टिफिन आणि सकाळचा नाश्ता सुद्धा पुरवून आपण चांगला नफा मिळवू शकता, ज्यासाठी आपण एक-दोन नोकर आणि एक-दोन सायकली किंवा गाड्या ठेऊ शकता.

टिफिन व्यवसाय कसे सुरू करायचे? How to start tiffin business


ऑफिस, शाळा आणि दुकानात भेटी देऊन तुमचं मेन्यू कार्ड त्यांना दाखवा. तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना आणि नातेवाईकांना सांगा की तुम्ही टिफिनचा व्यवसाय सुरू करणार आहात. यामध्ये तुमची माऊथ पब्लिसिटी देखील होईल. मोजक्या टिफिनपासून सुरुवात करून, तुम्ही हळूहळू वाढवत नंतर मोठ्या प्रमाणावर मोठमोठ्या कंपन्या आणि होस्टेल साठी टिफिन पुरवू शकता शकता.

टिफिन व्यवसायातून उत्पन्न किती मिळते? How much income gets generated from tiffin service

मित्रहो, कँटीन आणि टिफिन व्यवसाय नक्कीच फायदेशीर आहेत यात काही वादच नाही. यातून तुम्ही कमीत कमी प्रति महिना रुपये 15000 ते 20000 मिळवू शकता मात्र हे प्रमाण तुम्ही सेवा देत असलेल्या तुमच्या ग्राहकांच्या आकारावर अवलंबून असते.
तर मित्रांनो आजची ही कॅन्टीन आणि टिफिन व्यवसाय बद्दलची माहिती आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट च्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच आपल्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती नक्की शेअर करा. तसेच पुढील लेख कोणत्या विषयावर असावा याबद्दल देखील आपली मते कळवा.

कॅन्टीन व्यवसाय सुरुवात कशी करावी माहिती

पहाण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button