व्यवसायउद्योजकतानोकरीपैशाविषयी

महिलांना घरबसल्या करता येतील असे 12 व्यवसाय | Home Business Ideas for Women in Marathi

आज आपण अशा व्यवसायांविषयी माहीती जाणुन घेणार आहोत जे व्यवसाय महिला घरबसल्या करू शकतात.

अणि हे व्यवसाय करण्यासाठी महिलांना जास्त भांडवलाची गुंतवणूक देखील करावी लागणार नाही.

१) बेकरी प्रोडक्ट तयार करणे :

महिला घरीच केक बनवून तो विकुन चांगली कमाई करू शकतात. हा व्यवसाय घरबसल्या सुरू केल्यानंतर आपण सुरूवातीला आपल्या आजुबाजुच्या परिसरातील लोकांना केक बनवून विकु शकतो.

आपल्या व्यवसायात अधिक वाढ व्हावी म्हणून सोशल मिडिया पेजेस वरून ह्या व्यवसायाची मार्केटिंग करून आणखी व्यवसाय वाढवू शकतो.

हा व्यवसाय सुरू केल्यानंतर प्रारंभी आपणास कमी ऑर्डर्स मिळु शकतात. जसजशी आपल्या व्यवसायाची ख्याती वाढेल आपल्या ऑर्डर्स मध्ये देखील वाढ होईल.

आपण वेगवेगळ्या ठिकाणी वाढदिवसासाठी, सत्कार समारंभासाठी केक बनवायच्या ऑर्डर्स घेऊ शकता.

आजकाल मदर्स डे,फादर डे,ब्रदर डे,सिस्टर डे इत्यादी दिवस साजरा करायला केकच्या ऑर्डर्स ह्या येत असतात अणि आज कुठल्याही वाढदिवस तसेच सत्कार समारंभात देखील आनंद साजरा करण्यासाठी केक कापण्याची प्रथा वाढतच आहे. प्रत्येक समारंभात केक आणि पेस्ट्री सारख्या बेकरी पदार्थ हा खुप मह्त्वाचे असे झाले आहेत.

याचसोबत बेकरी प्रोडक्ट मध्ये आपण केक व्यतिरिक्त चाॅकलेट, नानखटाई, बिस्कीट, चिप्स इत्यादी पदार्थ घरी बनवून त्याची विक्री करू शकतो.

आजकाल लहानमुलांनाच नव्हे तर मोठ्या माणसांना देखील चाॅकलेट खायला आवडते.

घरबसल्या कोणता पदार्थ कसा बनवायचा? हे शिकण्यासाठी महिला युटयुब चॅनलची मदत घेऊ शकतात.

२) युटयुब चॅनल :

आज प्रत्येक महिलेच्या अंगी कोणते ना कोणते कलागुण असलेले आपणास पाहावयास मिळते. कोणाला उत्तम स्वयंपाक येतो. कोणाला शिवणकाम, नृत्य इत्यादी पैकी कुठलीही एक कला उत्तमरीत्या जमते.

ज्या महिलांच्या अंगी एखादे कलागुण आहे त्यांना कुठल्याही एका विषयात उत्तम ज्ञान आहे अशा महिला आपले कला कौशल्य इतरांना युटयुब वर शिकवून ऍड द्वारे चांगली कमाई करू शकतात.

आजच्या ह्या डिजीटल युगात तरूणांपासुन ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वच जण युटयुब चॅनल चालवून महिन्याला लाखोची कमाई करत आहेत .

युटयुब वरून इन्कम सुरू व्हायला थोडा सुरुवातीला थोडा वेळ लागु शकतो पण एकदा आपले सबस्क्राईबर आणि व्युव्हज वाढायला लागल्यावर आपोआप चांगली कमाई सुरू होऊ शकते.

युटयुब चॅनल सुरू करण्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे इथे आपल्याला खिशातुन एक रूपया देखील खर्च करण्याची आवश्यकता नसते. एक रूपया देखील न गुंतवता आपण इथुन कमाई करू शकतात.

३) टिफिन सर्विसेस :

टिफिन सर्विस हा देखील महिलांना घरबसल्या करता येईल असा एक उत्तम व्यवसाय आहे.

यात आपल्याला फक्त टिफिन सर्विस सुरू करायची आहे अणि आपल्या आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांना आपण टिफिन सर्विस देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे असे सांगावे लागेल.

याचसोबत सोशल मिडिया द्यारे देखील आपल्या ह्या नवीन व्यवसायाची मार्केटिंग करावी लागेल. यानंतर आपोआप आपल्या ऑर्डर मध्ये देखील वाढ होण्यास सुरुवात होईल.

ज्या महिलांना उत्तम स्वयंपाक जमतो वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस बनवायला आवडते. अशा महिला आपल्या पाककले द्वारे आपल्या आजुबाजुच्या परिसरातील लोकांना घरबसल्या टिफिन सर्विस देऊन चांगली कमाई करू शकतात.

जे विद्यार्थी बाहेर गावी शिक्षणासाठी, काही तरुण मुले मुली नोकरीसाठी दुसरी गावी आले आहेत अशा आपल्या घराजवळील परिसरात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना आणि व्यक्तींना आपण टिफिन सर्विस देऊ शकता. यात आपण आपल्या टिफिन सर्विस मध्ये वेगवेगळे मेनूही ठेवू शकता.

४) शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक :

शेअर मार्केट हा देखील महिलांसाठी घरबसल्या करता येईल असा एक उत्तम व्यवसाय आहे. आज ट्रेडिंग तसेच इन्व्हेस्टमेंट करून पुरूषांसमवेत महिला देखील महिन्याला लाखोची कमाई करू शकतात.

फक्त यासाठी आपल्याला शेअर मार्केटचा सखोलपणे अभ्यास करावा लागेल अणि शेअर मार्केटचे उत्तम ज्ञान प्राप्त करावे लागेल. कोणकोणत्या कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करायची हे समजुन घ्यावे लागेल.

जे व्यक्ती शेअर मार्केट मध्ये नवीन आहेत ते कमी इन्व्हेस्टमेंट पासुन सुरूवात करू शकतात अणि जे व्यक्ती शेअर मार्केट मध्ये जुने आहेत त्यांना शेअर मार्केटचे उत्तम ज्ञान आहे ते ट्रेडिंग करू शकतात.

५) कंटेट रायटिंग सर्विसेस :

ज्या महिलांचे लिखाण उत्तम आहे ज्यांना लिखाणाची आवड आहे ज्यांना लिखाणातुन आपले करिअर घडवायचे आहे अशा महिला घरबसल्या ऑनलाईन कंटेट रायटिंगचे काम करू शकतात.

यात फक्त आपल्याला कंटेट रायटिंगची सर्विस हवी आहे असा एक क्लाईंट शोधावा लागतो अणि क्लाईंटला त्याच्या मागणीनुसार सर्विस द्यावी लागते ज्या बदल्यात तो आपल्याला पर वर्ड प्रमाणे पे करत असतो.

६) ब्लाॅगिग :

ज्या महिलांना घरबसल्या पाहीजे तेव्हा आपणास करता येईल असा एक स्वताचा व्यवसाय सुरू करायचा आहे. अशा महिला ब्लाॅगिग कडे वळु शकतात.

यात आपल्याला आपल्या ब्लाँगवर रोज युनिक कंटेट पब्लिश करावा लागतो ज्यावर गुगल आपल्या एड्स दाखवते ह्या ऍड्स क्लिक केल्यावर त्याचे काही पैसे गुगलला अणि काही आपल्याला मिळत असतात.

ब्लाॅगिग सुरू करण्यासाठी फक्त डोमेन आणि होस्टिंगचा खर्च करावा लागतो.

७) ऑनलाईन बिझनेस :

सध्याचे जग हे डिजीटल आहे त्यामुळे आपण देखील डिजीटल पदधतीने व्यवसाय करणे, व्यवसाय करायला शिकणे आवश्यक आहे.

आज आपण साडी, मेक अपचे सामान, ड्रेस मटेरिअल, इत्यादी कुठल्याही प्रोडक्टची ऑनलाईन विक्री करण्याचा व्यवसाय महिला इंटरनेटच्या माध्यमातून करू शकतात.

८) खड्या मसाल्याचा व्यवसाय :

खड्या मसाल्याचा व्यवसाय करण्यासाठी आपण उत्तम प्रतीचे खडामसाला जास्त प्रमाणात घ्यायचा आहे. सुरूवातीला आपण तीन किलोपासुन सुरूवात करू शकता.

ह्या खड्या मसाल्याचे छोटे छोटे पॅकेट बनवून ते आपल्या घराजवळील किराणा दुकानात विकुन आपण चांगली कमाई करू शकतात.

९) बडीशेपचा व्यवसाय :

मार्केट मध्ये शूगर कोटेड बडीशेप उपलब्ध होते. आपण त्याचाही व्यवसाय करू शकतो. होलसेल मधुन आपण ही शुगर कोटेड बडीशेप खरेदी करायची अणि ही बडीशेप छोट्या मुलांसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या खेळणी मध्ये भरून जवळपासच्या दुकानात ही खेळणी द्यायची आहे.

१०) अगरबत्तीचा व्यवसाय :

ह्या व्यवसायात फक्त आपल्याला मशीन विकत घेण्यासाठी खर्च करावा लागतो. एकदा आपण अगरबत्ती बनवायला शिकलो की मार्केट मध्ये वेगवेगळ्या सुगंधाचा, सेंटसचा वापर करून आपण अगरबत्ती विकु शकतो.

११) घरगुती मसाल्याचा व्यवसाय :

ज्या महिलांना वेगवेगळे मसाले बनवता येत असतील अशा महिला घरबसल्या स्वताचा मसाल्यांचा व्यवसाय करू शकतात.

यात महिला वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बनवून तसेच त्याचे छोटेछोटे पॅकेट बनवुन आपल्या घराजवळील लोकांना सॅपलच्या स्वरूपात २० रुपयांपासून देऊन स्वताचा व्यवसाय सुरू करू शकता.

एकदा लोकांना तुमचा मसाला आवडला तर ते नेहमी तुमच्याकडे मसाले खरेदी करण्यासाठी येतील अणि इतरांजवळ देखील तुमच्या मसाल्याची पब्लिसिटी करतील.

१२) ऑनलाईन रिसेलिंग :

साडया,कपडे,ज्वेलरी, लहान मुलांच्या खेळणी इत्यादी प्रोडक्टची ऑनलाईन पदधतीने रिसेलिंग करून महिला आज इंटरनेट च्या जगात चांगली कमाई करू शकतात.

रिसेलिंगचा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक विश्वासू उत्पादक शोधावा लागेल. एका प्रोडक्ट मागे आपल्याला जितका नफा प्राप्त करायचा आहे तेवढा आपण यात ऍड करू शकतो.

सुरूवातीच्या काळात कस्टमर कमी असल्याने आपणास कमी इन्कम प्राप्त होईल. पण जशजशा आपल्याला दिवसाला जास्त ऑर्डर मिळतील अणि त्यामागे जास्त नफा प्राप्त होईल तसतशी आपली चांगली कमाई होऊ शकते .

यात आपण एकाऑर्डर माघे ३०० रूपये नफा प्राप्त केला अणि दिवसभरात पाच ऑर्डर केल्या तरी महिन्याला ४५ हजारांपर्यंत कमाई करू शकतो.

तुम्हाला कोणता व्यवसाय करायला आवडेल हे नक्की कंमेंट मध्ये सांगा आणि नेहमी उपडेट साठी मी मराठी च्या जिल्हा निहाय WhatsApp ग्रुप्स ला जॉईन करा !!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button