उद्योजकता

पापड व्यवसायाबद्दल माहिती

नमस्कार मित्रांनो,

हल्ली बऱ्याचशा स्त्रिया नोकरी करताना आढळून येतात. मात्र ग्रामीण भागात अजूनही स्त्रिया या गृहिणी म्हणूनच वावरताना दिसतात.  दिवसभर घरात बसून महिलांना देखील कंटाळा येतो. अशावेळी महिलांना काहीतरी काम आणि सोबत पैसा मिळणार असेल तर महिला एका पायावर तयार होतात. आज आपण महिलांसाठी खास असणाऱ्या पापड व्यवसायाबद्दल माहिती बघणार आहोत…

मित्रांनो आज काल घरी वाळवणं बनवायला प्रत्येकालाच कंटाळा येतो. मात्र वर्षभर लागणारी वाळवण बनवणे गरजेचेच असते. अशावेळी नोकरी करणाऱ्या महिलांना सहाय्य करण्यासाठी विकत पापड घेणे पसंत केले जाते. त्यामुळे पापड व्यवसाय अतिशय भरभराटीला आलेला आहे. आपण प्रत्येक जण लिज्जत पापड ओळखतच असाल. अगदी काहीशा रुपयांच्या कर्जातून उभा राहिलेला हा  व्यवसाय आज विस्तीर्ण झालेला असून, लाखो रुपये नफा मिळवत आहे. चला तर मग आपणही पापड व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेऊया…

मित्रांनो भारतातील लोकांना पापड उद्योगाबद्दल माहिती असो किंवा नसो, मात्र पापड प्रत्येकालाच माहित आहे. पापड म्हणजे दुसरे तिसरे काही नसून विविध डाळींच्या मिश्रणापासून आणि मसाल्याच्या खमंग चवीने लाटलेल्या वेफर्स इतक्या पातळ अशा लाट्या असतात. भारतातील प्रत्येक सण-उत्सव आणि कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध असणारे पापड घरगुती जेवणातही रोज खाल्ले जातात. पापडाचे सर्व्ह करण्याच्या पद्धतीनुसार विविध प्रकार पडतात. यामध्ये भाजलेला पापड, तळलेला पापड, कच्चा पापड, मसाला पापड इत्यादी विविध प्रकार बघावयास मिळतात. हॉटेल्स मध्ये देखील स्टार्टर्स च्या रूपात मसाला पापडला प्रचंड पसंती दिली जाते.

पापड व्यवसायाबद्दल माहिती (Information about Papad Business)

मित्रांनो आपल्या सर्वांनाच पापड म्हणजे काय हे वेगळे सांगायची गरज नाही. विविध डाळीच्या मिश्रणापासून बनवलेल्या पिठाला चांगले मळले आणि त्यात चवदार असे मसाले मिसळले की पापडाचे कणिक तयार होते. या कनिकापासून अतिशय पातळ अशा लाट्या बनवल्या जातात. आणि वाळवून त्याची विक्री केली जाते.

 आजकाल प्रत्येकच हॉटेलमध्ये मसाला पापडाला मागणी वाढत आहे. तसेच तळलेल्या पापडाचा देखील वापर वाढला आहे. या वाढत्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी पापड व्यवसाय फायदेशीर ठरतो. पापड शक्यतो घरगुती स्वरूपात तयार केले जातात. मात्र जेव्हा एखाद्या व्यवसायकाकडून पापडाची निर्मिती केली जाते तेव्हा त्यास उद्योगाचे स्वरूप येते.

     पापड व्यवसाय आणि महिला यांचे एक अतूट नाते आहे. या व्यवसायात बहुतांश रित्या महिलाच आढळून येतात. मात्र काही पुरुष देखील हे कार्य करू शकतात. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाकरिता पापड व्यवसाय मोलाची भूमिका बजावत आहे. अगदी भारतातच नव्हे तर विदेशामध्ये देखील पापडांना प्रचंड मागणी आहे.

अत्यल्प भांडवल, थोडासा कच्चा माल आणि मनुष्यबळाच्या आधारे हा व्यवसाय अगदी घरगुती स्वरूपातही सुरू करता येऊ शकतो.

पापड उद्योग सुरू करताना (Starting of Papad Business)

मित्रांनो कुठलाही उद्योग निवडताना सुरुवात ही फारच महत्त्वपूर्ण आणि संघर्षात्मक असते. कुठलाही उद्योग व्यवसाय सुरू करताना नेहमी टप्प्याटप्प्याने व्यवसायामध्ये वाढ करावी. जेणेकरून मोठ्या तोट्यास सामोरे जावे लागणार नाही. सुरुवातीला आपल्या आसपासच्या क्षेत्रातील ग्राहकांचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे कच्चामाल आणावा. आणि पापड तयार करावेत. आणि आकर्षक अशा पॅकिंग मध्ये पॅक करून विक्री करावेत.

पापड उद्योग हा अन्न व्यवसायामध्ये मोडत असल्याकारणाने अन्नसुरक्षा अधिकाऱ्याकडून विविध परवानगी देखील मिळवाव्या लागतात.

सर्वप्रथम आपल्या व्यवसायाची नोंदणी करून लायसन्स मिळवावे लागते.  FSSAI ( फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया) द्वारे अन्न उद्योगांना लायसन्स दिले जाते. एकदा लायसन्स मिळाल्यानंतर उद्योगासाठी जागा निश्चिती करावी, आणि व्यवसाय सुरू करावा.

आपण छोट्या स्वरूपात व्यवसाय करत असल्यास शक्यतो मनुष्यबळाच्या साह्याने हाताने पापड बनवण्यास प्राधान्य द्यावे. मात्र आपल्याकडे ग्राहक वर्ग आधीच तयार असल्यास आणि पापड उत्पादनाची क्षमता जास्त हवी असेल तर आपण मशिनरीजच्या साह्याने देखील पापड बनवू शकता.

पापड उद्योगासाठी लागणारा कच्चामाल (Raw material required to papad business)

मित्रांनो प्रत्येक व्यवसायात कच्चामाल हा एक महत्त्वाचा घटक ठरत असतो. पापड उद्योगासाठी फार मोठ्या कच्च्या मालाची आवश्यकता नसली, तरीही निवडक स्वरूपाचा कच्चा माल आवश्यक असतो. जेणेकरून तयार मालाची गुणवत्ता चांगली  मिळते.

पापड निर्मितीसाठी विविध प्रकारच्या डाळी जसे की हरभरा, उडीद, मुग इ. तसेच विविध प्रकारचे मसाले जसे की खाद्य तेल, मीठ, तांदळाची पावडर, सोडा, तयार मसाले आणि जिरेपूड इत्यादी गोष्टी पापडाचे निर्मितीसाठी आवश्यक असतात. तर प्लास्टिक पिशव्या, बॉक्सेस इत्यादी गोष्टी पापडाच्या पॅकेजिंग साठी आवश्यक असतात.

पापड उद्योगासाठी ची गुंतवणूक अथवा भांडवल (Investment or capital for papad business)

मित्रांनो प्रत्येक व्यवसायाची गुंतवणूक ही आपण उद्योग किती स्केल वर करत आहात यावर अवलंबून असते. पापड उद्योगासाठी साधारणपणे दहा हजारापासून दहा लाखापर्यंत भांडवल आवश्यक असते.

 पापड उद्योग घरगुती स्वरूपात करत असाल तर सुरुवातीला पापड लाटणाऱ्या महिलांचा पगार, कच्चामाल, पॅकेजिंग, आणि मार्केटिंग यावरील खर्च विचारात घेतला तर साधारणपणे एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र मशीनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर उद्योग करताना आपल्याकडे दहा ते बारा लाख रुपये असणे आवश्यक ठरते. आपल्याकडील उपलब्ध पैसा आणि आपल्या क्षेत्रात असणारी पापडाची मागणी यानुसार आपण गुंतवणूक करू शकता.

पापड उद्योगातील यशासाठी काही गुपिते (Secrets for Success in papad business)

मित्रांनो कुठलाही व्यवसाय करताना अनुभवातून काही गुपिते व्यावसायिकास उमगत असतात. त्यातील काही गुपिते आम्ही आपल्यासाठी इथे देत आहोत.

1.पापड व्यवसायात गुणवत्ता आणि चव हेच मोठे भांडवल असते. कारण पापड व्यवसायात अनेक ब्रँड्स ने उडी घेतल्यामुळे स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे. यात आपल्याला टिकायचे असेल तर आपली एक स्वतंत्र अशी चव आणि ओळख निर्माण करावयास हवी.

2. पापड व्यवसाय हा अन्न व्यवसायात मोडल्यामुळे पापडाला काही मर्यादेपर्यंतच साठवले जाऊ शकते. त्यामुळे पापड व्यवसाय सुरू करण्यापूर्वीच पापडासाठी बाजारपेठ निर्माण करणे फायदेशीर ठरते. यासाठी आधी आपण इतर पापड व्यवसायिकांसाठी मार्केटिंगचे काम करून या व्यवसायातील मार्केटिंग चेन समजून घेऊ शकता.

3.पापड व्यवसाय खाद्यपदार्थांचा व्यवसाय असल्याने यास परवानगी घेणे बंधनकारक असते. आपण कुठलीही कुचराई न करता व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सर्व प्रकारच्या परवानग्या घेतल्या पाहिजेत. अन्यथा होणाऱ्या नफ्यापेक्षा दंडाची रक्कम अधिक झाल्यास पापड व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो.

4. आपण मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करत असाल तर आधीपासूनच व्यवसायाचे व्यवस्थापन करण्यासाठी एका व्यवस्थापकाची नेमणूक करायला हवी. जेणेकरून व्यवसाय वाढल्यानंतर आपल्याला त्रास होणार नाही.

मित्रांनो, आजची ही पापड व्यवसायाबद्दलची माहिती आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट च्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच आपल्या व्यवसाय इच्छुक मित्र-मैत्रिणींना आणि आपल्या परिचयातील गरजू महिलांना ही माहिती नक्कीच शेअर करा.

 धन्यवाद…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button