उद्योजकतापैशाविषयी

लोणचे बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा?

लोणचे बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा? (PICKLE MANUFACTURING BUSINESS INFORMATION IN MARATHI)

लोणचे बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा? (PICKLE MANUFACTURING BUSINESS INFORMATION IN MARATHI)

नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला एक घरगुती व्यवसायाची कल्पना सादर करणार आहोत ज्याद्वारे अगदी कमी खर्चामध्ये तुम्ही खूप चांगले पैसे कमावू शकता. आज तुम्हाला लोणचे बनवण्याचा व्यवसाय याबद्दल संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये आम्ही देणार आहोत. लोणच्याचे नाव काढताच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. अशी खूप कमी लोक असतील ज्यांना लोणचे खायला आवडत नाही. उन्हाळा चालू झाला की वाढत्या मागणीमुळे लोणचे बनवण्याचा व्यवसायाचे महत्त्व देखील अधिकच वाढते. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये लोणचे हे नेहमीच उपलब्ध असते. बऱ्याचश्या घरांमध्ये लोणचे स्वतः बनवत नाही तर ते बाहेरून विकत घेतात याचमुळे जर तुम्ही लोणच्याचा व्यवसाय सुरू केला तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी असेल.

लोणच्याचा व्ययसाय म्हणजे काय ?(What is pickle manufacturing business?)

लोणचे एक असे खाद्यपदार्थ आहे जे स्वतः तर स्वादिष्ट असतेच मात्र त्यामुळे आपली जेवण अधिक स्वादिष्ट होते. आत्ताच्या या दिवसांमध्ये जवळपास सर्व घरांमध्ये तुम्हाला लोणचे  नक्कीच पाहायला मिळेल. आताची परिस्थिती अशी आहे की काही लोक स्वतःच घरी लोणची बनवतात, मात्र या उलट अनेक लोक आहेत ज्यांना लोणची खायला खूप आवडतात मात्र लोणची बनवत नाहीत तर ते बाजारात विकत घेतात. यात संधीचा फायदा घेऊन जर तुम्ही लोणची बनवून बाजारात विकली तर तुमच्यासाठी ही एक खूप चांगली व्यवसायाची संधी ठरू शकेल. स्वतः घरी लोणची बनवून बाजारात विकणे याला लोणच्याचा व्यवसाय असे म्हणतात.

लोणच्याचा व्यवसाय हा कसा सुरू करायचा ?( How to start the pickle manufacturing business?)

जसे की आपल्या सर्वांनाच माहित आहे की मसालेदार पदार्थ हे सर्वांनाच आवडतात आणि जेव्हाही आपण मसालेदार पदार्थांचे नाव घेतो त्या यादीमध्ये लोणच्याचे नावे सर्वात वरती येते. गावाकडील लोक हे लोणची अगदी सहजपणे बनवतात त्यामुळे लोणचे बनवण्याची प्रक्रिया ही फारशी अवघड नाही हे यावरून आपल्याला कळते. म्हणूनच तुम्हाला जर लोणचे बनवण्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर अगदी सहजपणे तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. फक्त या व्यवसायाची नीट माहिती असणे महत्त्वाचे आहे. तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये घरातून लोणच्याच्या व्यवसायाला सुरू करू शकता. जर त्या व्यक्तीने घरातूनच लोणची बनवण्याचा व्यवसाय हा सुरू केला तर अगदी सहजपणे आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने देखील लोणच्याचा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो. लोणच्याचा व्यवसाय हा कसा सुरू करायचा हे जाणून घेऊया.

लोणचे बनव्यासाठी लागणारी सामग्री? (Ingredients required for pickle making)-

लोणचे बनवण्यासाठी लागणारी सामग्री ही तुम्ही सहजपणे कोणत्याही दुकानातून खरेदी करू शकता. मार्केट मधील होलसेल भावात मसाले विकणाऱ्या दुकानामधून तुम्ही सर्व मसाले खरेदी करू शकता. लोणचे बनवण्यासाठी लागणाऱ्या कैऱ्या तुम्ही भाजी मंडई किंवा भाजी मार्केट मधून विकत घेऊ शकता. लोणचे बनवण्यासाठी लागणारी सामग्री यामध्ये खडा मसाला , मीठ, मिरची, तसेच तिखट हे देखील महत्वाचे आहे. तसेच तुम्ही कोणत्या प्रकारचे लोणचे बनवणार आहात ह्यावर तुम्हाला कोणते फळ लागेल हे अवलंबून आहे जसे की कैरी, मिरची, लिंबू, किंवा आवळा ह्या फळांचे लोणचे तुम्ही तैयार करू शकता.

गरजेच्या वस्तूंची यादी करून घेतल्यानंतर. चांगले आणि स्वस्त समान खरेदी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तीन ते चार होलसेल दुकानांमध्ये चौकशी करावी लागेल. यामुळे तुमचा  होणार अनावश्यक खर्च कमी होईल.

लोणचे तैयार करण्यासाठी आवश्यक ठिकाण आणि वातावरण ( Suitable place and atmosphere for pickle manufacturing)

लोणचयचे उत्पादन सुरू करण्याआधी तुम्हाला उत्पादनाच्या पायाभूत सुविधणंबद्दल माहीत असणे फार महत्वाचे आहे. मोठ्या प्रमानमध्ये व्यवसाय सुरू करण्याआधी तुम्हाला भांडवल आणि उपकरण देखील लागतील. तुम्ही तुमच्या घरी देखील लोणचे बनवू शकता किंवा तुम्ही एक समर्पित मॅन्युफॅक्चरिंग यूनिट ची देखील स्थापना करू शकता.

जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे उत्पादन लहान ठेवायचे असल्यास तुम्ही लोणचे घरी देखील बनवू शकता. मात्र जर तुम्हाला तुमचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करायचे असेल तर तुम्हाला स्वतंत्र उत्पादन यूनिट किंवा कारखाना सुरू करावा लागेल.

तुम्ही घरी लोणचे बनव्याचा व्यवसाय सुरू करणार असाल तर तुम्हाला फक्त साहित्य मिसळण्यासाठी आणि लोणचे मॅरीनेट करण्यासाठी तुम्हाला कंटेनर किंवा मोठ्या भांड्यांची गरज पडेल.

लोणचे तैयार करण्यासाठी लागणारी मशीनरी (Machinery required for pickle production on large scale)-

तुम्ही जर घरच्या घरी लोणचे तैयार करणार असाल तर तुम्हाला मशीन विकत घेण्याची गरज नाही तुम्ही स्वतः हाताने लोणचे बनवू शकता. तुम्ही जर मोठ्या प्रमाणात लोणचे बनवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या मशीन विकत घ्याव्या लागतात. व ह्या सगळ्या मशीन च्या मदतीने तुम्ही तुमचा व्यवसाय मोठ्या प्रमानात चालवू शकता.

प्रथमतः तुम्हाला क्लीनर मशीन विकत घ्यावी लागेल. ह्या मशीन च्या मदतीने तुम्ही तुमचे सर्व मटेरियल स्वछ धुन घेऊ शकता. व ह्या नंतर ड्रायर मशीन च्या मदतीने सर्व ड्राय  करून घेऊ शकता. ह्यानंतर सर्व मसाले आणि पदार्थ मिक्सर मधून मिक्स करून घेतले जातात.व हे लोणचे तैयार झाल्यानंतर तुम्हाला यासाठी पॅकिंग मशीन घ्यावी लागेल. ह्या मशीन च्या मदतीने तुम्ही लोणचे नीट पॅक करून पुढे मार्केट मध्ये विकण्यासाठी तैयार करू शकता. ह्या सर्व मशीन्स नंतर तुम्हाला वजन काटा देखील घ्यावा लागेल. ह्या सर्व मशीन विकत घेऊन तुमहल एका ठराविक जागेवर ह्या सर्व मशीन ठेवाव्या लागतील.

लोणचयचे स्टोरेज आणि जतन करणे-( Storage and Preservation of pickle)-

उत्पादन झाल्यानंतर योग्य स्टोरेज आणि जतन करण्याची सुविधा असणे देखील महत्वाचे आहे. लोणचे बनवण्यासाठी लागणार भाजीपाला हा एकत्र टाकला जातो . ब्राईनिंग ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये भाज्या आणि इतर कच्चे समान हे अंबण्यासाठी खारट पाण्यामध्ये ठेवले जातात. ज्यामुळे बुरशी लागण्यापासून ते संरक्षित ठेवले जातात आणि जास्त वेळासाठी ते संरक्षित करण्यास मदत होते. जर तुम्ही घरगुती व्यवसाय चालू करणार आल तर तुम्हाला कमीत कमी स्टोरेजची गरज पडेल, तसेच जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कच्चा माल तसेच अंतिम उत्पादन ह्या साठी स्टोरेज ची सोय करावी लागेल.

नोंदणी आणि परवाने ह्याची व्यवसाथा (Arrangements for Licencing and Registration)-

लोणच्याचा व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला जर ते मार्केट मध्ये विकायचे असेल तर तुम्हाला नोंदणी आणि परवाने घ्यावे लागतात. ह्याशिवाय तुम्ही माध्यम किंवा मोठ्या प्रमानवर ते तयार करून विकू शकत नाही. काही महत्वाचे नोंदणी आणि परवाने-

  • एफ.एस.एस.ए.आय (FSSAI)
  • शॉप अॅक्ट (Shop act)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button