नवीन पोस्ट्सव्यवसाय

स्टेशनरी व्यवसाय कसा सुरू करायचा how to start stationery business

नमस्कार मित्रांनो, आजकाल भारताने शैक्षणिक क्षेत्रात चांगलीच प्रगती केली आहे. आज देशातल्या विविध भागांमध्ये मोठमोठ्या शाळा कॉलेजेस यांनी आपल्या संस्था निर्माण केल्या आहेत. तसेच वाढत्या लोकसंख्येबरोबर आपोआपच विद्यार्थी संख्या देखील भरमसाठ वाढत आहे, आणि शाळेत विद्यार्थ्यांना लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टेशनरी होय. स्टेशनरी व्यवसाय हा सुट्ट्यांचे दोन महिने सोडले तर वर्षभर चालणारा व्यवसाय आहे. आणि यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. तेव्हा आपण देखील अगदी कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करू शकता आणि चांगला नफा मिळवू शकता.… how to start stationery business

आजच्या आपल्या लेखामध्ये तुम्हाला स्टेशनरी व्यवसायाबद्दल सर्व माहिती, जसे की गुंतवणूक किती करावी लागेल?, नफा किती मिळेल?, नोंदणी कुठे करावी लागेल?, आणि परवाने घेण्याची प्रक्रिया काय आहे? या सर्व विषयांबाबत तुम्हाला सखोल माहिती मिळेल. तेव्हा हा लेख नक्कीच पूर्ण वाचा…

स्टेशनरी व्यवसाय सुरू करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे Points to be consider while starting stationary business

मित्रहो, कुठलाही व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की योग्य जागा निवडणे हे सर्वात महत्त्वाचे ठरते. स्टेशनरी व्यवसायामध्ये मुख्य ग्राहक विद्यार्थी वर्ग असल्यामुळे स्टेशनरी व्यवसाय करिता शाळेजवळची जागा निवडणे अतिशय उत्कृष्ट ठरते. सोबतच विविध प्रकारच्या ऑफिसेस चे केंद्रीकरण असलेले ठिकाण देखील स्टेशनरी व्यवसायास अनुकूल ठरेल. मात्र अशा क्षेत्रात व्यवसाय करताना तुम्हाला भरघोस सूट देणे क्रमप्राप्तच असेल.

स्टेशनरी व्यवसायात साधारणपणे शंभर ते दोनशे चौरस फूट जागा पुरेशी असते. मात्र तुम्हाला मध्यम ते मोठ्या आकाराची अथवा होलसेल स्वरूपातही दुकान सुरू करायची असेल तर तुम्ही पाचशे ते सातशे पन्नास चौरस फूट जागा गुंतवू शकता. तुमच्याकडे भांडवलाची उपलब्धता चांगली असेल तर सुरुवातीसच मोठी जागा निवडणे श्रेयस्कर ठरते. कारण भविष्यात दुकानाचा विस्तार करताना किंवा जोडीला नवीन उत्पादनांचे प्रकार जोडताना फार अडचणी येत नाहीत.

तुम्ही छोट्या प्रमाणात व्यवसाय करणार असाल तर तुम्ही स्वतःच हे दुकान चालवू शकता, मात्र मध्यम ते मोठ्या प्रमाणातील दुकानासाठी तुम्हाला कमीत कमी दोन ते तीन व्यक्तींना मदतीसाठी ठेवावे लागेल.
मित्रांनो प्रत्येकच व्यवसायास जोडून असा एखादा तरी व्यवसाय असतोच. तुम्ही स्टेशनरीच्या दुकानांमध्ये झेरॉक्स प्रिंटिंग बाइंडिंग इत्यादी सुविधा उपलब्ध करून देऊन अधिकचा नफा मिळवू शकता.

विद्यार्थी वर्ग हा ग्राहक असल्याने तुम्हाला नेहमीच नवनवीन कल्पना राबवाव्या लागतील. विद्यार्थी मन हे चंचल असल्या कारणाने नवीन ट्रेंड च्या वस्तू त्यांना नेहमीच आकर्षित करत असतात. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या डिझाइन्सची स्टेशनरी किंवा नवीन ट्रेंडच्या आयटम्स मागवून आपल्या विक्रीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवू शकता. नवनवीन ट्रेंड च्या वस्तू मिळवण्यासाठी तुम्ही जवळील होलसेल मार्केटला भेट देऊ शकता किंवा मुंबईसारख्या मोठ्या मार्केटमधूनही घाऊक वस्तूंचा साठा उचलू शकता.

मित्रहो, दिवाळी आणि उन्हाळा या दोन वेळेस शाळा या किमान एक महिना तरी बंदच असतात. यावेळी आपल्या दुकानाला चालू ठेवण्याकरिता आपण खेळणी आणि भेटवस्तू यासारख्या वस्तूंची जोड देऊ शकता. या वस्तू ऑफ सिझन बरोबरच शाळेतील विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणावर पसंत करत असतात. त्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढच होईल.
कुठलाही व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर सुरुवातीच्या वेळेत ग्राहक वळवण्यासाठी नवनवीन तंत्राचा अवलंब करावा लागतो, त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला कमी मार्जिन ठेवून स्वस्त वस्तूंची विक्री करू शकता. तसेच विद्यार्थी वर्ग आकर्षित करण्यासाठी नवनवीन ट्रेंड च्या वस्तू विक्रीस ठेवू शकता. तसेच आसपासच्या कुठल्याही दुकानात न मिळणाऱ्या थोड्याशा हटके वस्तू देखील विक्रीसाठी ठेवू शकता, जेणेकरून तुमच्या व्यवसायास भरभराट येईल.

मित्रहो, एकदा व्यवसाय सुरू झाला की मग मात्र तुम्ही तो टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे ठरते. हे साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांची मने जपून त्यांच्याशी एक जवळचे नाते निर्माण करणे तुमच्या व्यवसायाला हातभार लावेल. तसेच विद्यार्थ्यांना हव्या त्या वस्तू नेहमीच उपलब्ध ठेवाव्या लागतील. विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊन त्यांना काय हवे नको त्यानुसार आपण दुकानात वस्तूंचा भरणा करावयास हवा.

स्टेशनरी व्यवसायासाठी नोंदणी आणि आवश्यक परवाने Registration and Licences required to start stationary business

मित्रांनो, भारतामध्ये स्टेशनरी व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्या दुकानाची नोंदणी “दुकाने आणि आस्थापना नोंदणी” अंतर्गत करणे गरजेचे असते. मात्र स्टेशनरी व्यवसाय कुठल्याही घातक व्यवसायात मोडत नसल्याने त्यास परवाना अर्थात लायसन्स घेणे गरजेचे नसते. नोंदणी करण्याकरिता तुमच्याकडे आधार, पॅन, बँक पासबुकची झेरॉक्स, आणि दुकानाची जागा जर भाड्याने घेतली असेल तर भाडे कराराचा कागद इत्यादी जुजबी कागदपत्रे असेल तर अगदी सहजगत्या तुम्ही नोंदणी करून घेऊ शकता. तुम्हाला नोंदणी प्रक्रियेची कटकट नको असेल तर एखाद्या सीए किंवा अशा सेवा पुरवणाऱ्या कुठल्याही संस्थेची मदत तुम्ही घेऊ शकता.

तुमचे व्यवसाय लहान प्रमाणात असेल तरी तर कुठल्याही कागदपत्रे पूर्ततेची तुम्हास आवश्यकता नसेल. मात्र तुमची वार्षिक उलाढाल 40 लाखांच्या वर गेल्यास तुम्हाला जीएसटी नंबर घेऊन जीएसटी प्रमाणपत्र घेणे गरजेचे असेल.

स्टेशनरी व्यवसाय सुरू करण्यासाठी येणारा खर्च Investment to start a new stationary business

मित्रांनो, कुठलाही व्यवसाय सुरू करताना येणारा खर्च हा तुम्ही व्यवसाय किती मोठ्या प्रमाणावर सुरू करत आहात यावर अवलंबून असतो. तसेच इतरही लहान-सहान गोष्टी यामध्ये कारणीभूत असतात.

स्टेशनरी दुकान सुरू करताना तुम्ही लहान प्रमाणावर करत आहात की मोठ्या दुकानाचा विचार करत आहात तसेच दुकानाची जागा तुमच्या स्वतःच्या मालकीची आहे की तुम्ही ती भाड्याने घेणार आहात सुरुवातीला तुम्ही किती प्रकारच्या वस्तू विक्री ठेवणार आहात इत्यादी बाबी महत्त्वाच्या ठरतात. how to start stationery business

तरीही ढोबळ मनाने सांगायचे झाल्यास छोट्या स्टेशनरी दुकानासाठी साधारणपणे दोन ते तीन लाख रुपये गुंतवावे लागतात. यामध्ये दुकानाचे फर्निचर, वस्तू ठेवण्यासाठी लागणाऱ्या रॅक आणि दुकानाची इंटेरियर यासाठी साधारणपणे एक ते दीड लाख रुपयांपर्यंत, तर सुरुवातीस माल भरण्यासाठी एक ते दीड लाख एवढा खर्च येतो. पुढे तुम्ही जसं-जसे दुकान वाढवाल तस-तसे खर्चही वाढत जातो. मध्यम आणि मोठ्या दुकानासाठी इंटेरियर च्या खर्चात फारसा काही फरक पडत नाही. मात्र सुरुवातीला भरण्याच्या वस्तूंच्या प्रमाणात किमतीमध्ये फरक पडत जातो. यामध्ये मध्यम दुकानासाठी सहा ते आठ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. तर मोठ्या प्रमाणावर दुकान सुरू करण्यासाठी तुम्ही या खर्चाव्यतिरिक्त झेरॉक्स मशीन, प्रिंटिंग यंत्रणा, बाइंडिंग यासाठी ची मशीनरी व संगणक प्रणाली इत्यादी गोष्टींवर अधिकचा खर्च करू शकता. या खर्चात तुमच्या दुकानाच्या जागेचा खर्च गृहीत धरलेला नाही.

स्टेशनरी व्यवसायात नफ्याचे प्रमाण किती असते Profit Margin ratio of stationary business

स्टेशनरी व्यवसाय हा अतिशय व्होलाटाईल प्रकारचा व्यवसाय आहे. यामध्ये बाजारात अनेक ब्रँडच्या वस्तू आहेत, त्यामुळे तुम्ही कोणत्या ब्रँडच्या वस्तू विकता यावर तुमच्या मार्जिनचे प्रमाण कमी जास्त होत असते. मात्र सरासरी लक्षात घेतली तर स्टेशनरी व्यवसायातून साधारणपणे खरेदी मूल्याच्या 20% नफा, अर्थात शंभर रुपयांवर वीस रुपये या प्रमाणात तुम्ही मार्जिन मिळवू शकता. मात्र तुम्ही लोकल दर्जाच्या वस्तू विकल्यास त्यातून सुमारे 25 टक्क्यांपर्यंत देखील नफा मिळवता येऊ शकतो. या बरोबरीनेच तुम्ही झेरॉक्स काढून देने, प्रिंटिंग करणे, बुक-बाईंडिंग करणे आणि ट्रेडिंग मध्ये असणाऱ्या वस्तूंच्या विक्रीतून तब्बल 50 टक्क्यांपर्यंत नफा प्राप्त करू शकता. हे उत्पन्न तुमच्या इतर वस्तूंच्या नुकसानीतील तूट भरून काढण्यात मदत करू शकतो.

मित्रांनो, आज आपण स्टेशनरी व्यवसायाबद्दल बघितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली?, ते आम्हाला कमेंट च्या माध्यमातून कळवण्यास विसरू नका. तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील हा लेख पाठवा.
धन्यवाद…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button