गड किल्ले

प्रतापगड किल्ल्याचा इतिहास (History of Fort Pratapgad)

नमस्कार मित्रांनो, संघर्ष हा महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. अगदी प्राचीन काळापासून मध्ययुगीन आणि आधुनिक काळातही महाराष्ट्र नेहमी संघर्षमय वाटेवरून चालत आला आहे.

शिवकालीन संघर्षाची साक्ष देणाऱ्या गडकिल्याबद्दल आपण माहिती बघत आहोत, आजच्या भागामध्ये आपण प्रतापगड या अजिंक्य असणाऱ्या किल्ल्याबद्दल माहिती बघणार आहोत…

मित्रांनो प्रतापगड हा महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक अभेद्य किल्ला. शिवरायांच्या इतिहासाने पावन झालेल्या या किल्ल्यास साहसी किल्ला म्हणूनही ओळखले जाते.

हा किल्ला अखिल महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवराय यांनी इसवीसन 1656 मध्ये बांधलेला असून, जेव्हा जावळी प्रांताचे खोरे छत्रपतींच्या मराठा साम्राज्यामध्ये विलीन झाले त्यानंतर शिवरायांनी मोरो त्रंबक पिंगळे यांना गडबांधणीसाठी निर्देश दिले.

किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ 7545 चौरस मीटर असून, 3600 चौरस मीटर बालेकिल्ला, आणि 3885 चौरस मीटर मुख्य किल्ला आहे. प्रतापगड च्या पायथ्याशी झालेल्या अफजलखानासोबतच्या लढाईचा हा किल्ला साक्ष आहे.

हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे एक हजार मीटर उंचीवर बांधलेला असून, या किल्ल्याची एकूण उंची 3556 फूट  आहे. हा किल्ला साताऱ्याच्या आंबेनळी या घाटाजवळ महाबळेश्वर नजीक आहे. अभेद्य असा हा किल्ला अखेरपर्यंत कोणीही जिंकू शकले नाही. म्हणूनच या किल्ल्यास अजिंक्य किल्ला म्हणले जाते.

या किल्ल्याचे मुख्य किल्ला आणि बालेकिल्ला असे दोन प्रमुख भाग पडतात. गडावर माता तुळजाभवानी यांचे सुबक मंदिर आहे. सोबतच शिवरायांच्या आई मासाहेब जिजाऊ यांचा वाडा, भगवान शिवांचे मंदिर, नगारखाना, बुरुज इत्यादी प्रेक्षणीय स्थळे देखील या किल्ल्यावर आहेत. किल्ल्याच्या पायथ्याला अफजलखान याची कबर असून संपूर्ण किल्ला डोंगरात बांधण्यात आलेला आहे.

प्रतापगड किल्ल्याचा इतिहास (History of fort Pratapgad)

मित्रांनो, हा किल्ला स्वराज्य काळातील म्हणजेच साताराव्या शतकातील असून अखंड हिंदुस्थानाचे दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी इसवी सन १६५६ मध्ये मोरो त्रंबक पिंगळे यांच्या करवी या गडाची उभारणी केली. हा किल्ला महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीत अभेद्य आणि अजिंक्यच राहिला.

     शेवटपर्यंत महाराष्ट्राच्या स्वराज्याची सेवा करणारा हा किल्ला अफजलखानाच्या वधाचा साक्षीदार आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी 10 नोव्हेंबर 1659 मध्ये झालेल्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता. त्यावेळी झालेल्या युद्धात मराठा फौजींनी अफजलखानाच्या फौजेला संपूर्णतः नेस्तनाबूत केले होते. मात्र 1818 मध्ये इंग्रजांच्या राजवटीत इंग्रज मराठा तिसरे युद्ध झाले. या युद्धामध्ये इंग्रजांनी मराठा साम्राज्याचे खूपच नुकसान केले होते. यातच मराठ्यांचा जीव का प्राण असलेला अजिंक्य असा प्रतापगड देखील मराठ्यांनी गमावला होता.

प्रतापगडावरील प्रेक्षणीय ठिकाणे (Popular spots on fort Pratapgad)

मित्रांनो, प्रतापगड हा किल्ला निसर्गाच्या सानिध्यात असल्याने येथील वातावरण अतिशय प्रसन्न आहे. गडावर बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या नजीकच छत्रपती शिवराय यांच्याद्वारे बांधलेले शिवमंदिर आहे. अशी आख्यायिका सांगितली जाते की, किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी खोदकाम चालू असताना  शिवलिंग सापडले ते हेच शिवलिंग आहे.

किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचे यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुळजाभवानी यांचे मंदिर आहे. दगडी गाभाऱ्यात बांधलेले हे मंदिर इसवी सन 1661 मध्ये बांधले असल्याचे सांगितले जाते. मंदिरासमोरच दगडी बांधकामाच्या उंच अशा दोन दीपमाळा आहेत.

किल्ल्यावर शत्रूवर खडा पहारा ठेवण्यासाठी अफजल, रोडका, यशवंत, सूर्य, आणि राजपहारा या नावांचे बुरुज आहेत. त्यांची उंची साधारणतः दहा ते पंधरा मीटर आहे.

मित्रांनो मासाहेब जिजाऊ जेव्हा प्रतापगडावर राहत असत तेव्हा त्या शिव मंदिराच्या बाजूला असलेल्या वाड्यात राहत. त्या वाड्याला जिजामाता चा वाडा म्हणून ओळखले जाते.

प्रतापगडावर नगरखाना नावाची एक इमारत असून, इसवी सन 1935 मध्ये तिचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. किल्ल्याच्या पायथ्याशी अफजल खानाची कबर देखील बघावयास मिळते.

प्रतापगड विषयीची रोचक माहिती (Interesting facts about fort Pratapgad)

1. मित्रांनो शिवकाळात सर्वच किल्ल्यांवर अशी व्यवस्था होती की, सूर्यास्तापूर्वी बंद होणारे दरवाजे दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या अगोदर उघडले जात, हे आपण सर्वच जाणतो. अगदी आजही याच रिवाजा नुसार प्रतापगडावर सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत गडाची दरवाजे बंद ठेवले जातात.

2. आख्यायिका नुसार अफजलखानाच्या वधानंतर संभाजी कावजी या मावळ्यांनी अफजलखानाची शीर प्रतापगडाच्या बुरुजामध्ये गाडले होते असे सांगितले जाते.

3. सखाराम बापू यांना इसवी सन 1778 मध्ये नाना फडवणीस यांनी प्रतापगडावर नजर कैदेत ठेवले होते.

4. विमानातून किंवा ड्रोन मध्ये बघितल्यास प्रतापगड हा एखाद्या सुंदर फुलपाखरासारखा दिसतो.

5. मोरो त्र्यंबक  पिंगळे यांनी प्रतापगड हा अवघ्या दोन वर्षांमध्ये बांधून पूर्ण केला होता.

6. चढण्यासाठी अतिशय सोपा असणारा हा अजिंक्य किल्ला मात्र मुघलांच्या केव्हाही ताब्यात जाऊ शकला नाही.

7. प्रतापगडाच्या दोन्ही बाजूंनी सुमारे 200 ते 250 मीटर खोल दऱ्या असून, सर्व बाजूंनी जंगलांनी वेढलेला असल्यामुळे या किल्ल्यावर आक्रमण करणे सोयीचे नव्हते.

प्रतापगडावर कसे पोहोचावे (How to reach fort Pratapgad)

मित्रांनो, वर पाहिल्याप्रमाणेच प्रतापगड हा सातारा जिल्ह्यातील किल्ला आहे. आपण या किल्ल्याला भेट देण्यासाठी रेल्वे, विमान, बस, टॅक्सी किंवा स्वतःच्या वैयक्तिक वाहनातूनही येऊ शकता. रेल्वेने येण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सातारा रेल्वे स्टेशनवर उतरून तिथून 75 किलोमीटरचा प्रवास बस अथवा टॅक्स ने करावा लागेल. तसेच विमानाने येण्यासाठी आपल्याला सर्वात जवळ असणाऱ्या पुणे विमानतळावर उतरून तेथून टॅक्सी अथवा बसद्वारे साताऱ्यात येऊन किल्ल्याला भेट द्यावी लागेल. आपण स्वतःची कार घेऊन जात असाल तर तेथे पार्किंगची ही व्यवस्था आहे.

मित्रांनो, आजच्या या प्रतापगड विषयीच्या लेखाबद्दल आपली मते आम्हास आवर्जून कळवा. तसेच आपल्याला प्रतापगडाविषयी अन्य काही माहिती असल्यास आपण आम्हास कळवू शकता. ज्ञानपूर्ण माहितीचे नेहमीच स्वागत असेल, तसेच त्या माहितीला आमच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीही दिली जाईल. तसेच ही माहिती आपल्या प्रियजनांना शेअर करण्यासही विसरू नका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button