गड किल्ले

सिंहगड किल्ल्याचा इतिहास ( History of Fort Sinhagad )

नमस्कार मित्रांनो,

गडदुर्ग हे प्रत्येक मराठी माणसाच्या नसानसात भिनलेले जणू एक रसायनच आहे. गडदुर्ग म्हटले की प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या मनामध्ये एक स्फूर्ती जागृत होते, आणि याला कारण आहे महाराष्ट्राचा स्वराज्य स्थापनेचा जाज्वल्य इतिहास… आजच्या भागामध्ये आपण अशाच एका स्फूर्तीवान किल्ल्याबद्दल अर्थातच सिंहगड या पुण्यनगरीतील किल्ल्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत…

मित्रांनो पुण्यनगरीतील भुलेश्वर या सह्याद्री डोंगर रांगेतील सिंहगड या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 4400 फूट आहे. आपण सर्वच जाणतो की या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा होते, मात्र छत्रपती शिवरायांनी आपल्या सैन्यातील एक वीर जवान तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ या किल्ल्याला सिंहगड असे नाव दिले. कोंढाण्याच्या स्वारी मध्ये तानाजी मालुसरे हे धारातीर्थी पडल्यानंतर आपोआपच छत्रपती शिवरायांच्या तोंडून “गड आला पण सिंह गेला” हे शब्द उमटले होते. अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेला किल्ल्याबद्दल प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अभिमानच आहे.

सिंहगड किल्ल्याचा इतिहास ( History of Fort Sinhagad )

सिंहगड या किल्ल्याच्या निर्मितीबाबत ठोस माहिती उपलब्ध नसली तरीही महाराष्ट्रातील यादव आणि शिलाहार यांनी हा किल्ला बांधला असावा असे इतिहासकार सांगतात. नागनाथ या महादेव कोळी राजाच्या ताब्यात हा किल्ला होता. पुढे दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलक याने दख्खनमध्ये स्वारी केली, आणि या नागनाथ राजावर आक्रमण केले. या दोघांमध्ये मोठे युद्ध झाले. पुढे नागनाथ या राज्याने कोंढाण्यामध्ये अर्थात आजच्या सिंहगड मध्ये आश्रय घेतला. आणि तब्बल नऊ महिने हा किल्ला लढविला. शेवटी या परक्रमाला कंटाळून सुलतान पुन्हा दिल्लीला निघून गेला.

शिवकाळात आदिलशाहीमध्ये असणारा हा किल्ला छत्रपती शिवरायांनी जिंकून घेतला. मात्र पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला पुन्हा एकदा आदिलशाहीला द्यावा लागला. या किल्ल्यावर उदयभान घराण्याच्या सरदाराची नेमणूक करण्यात आली होती. छत्रपती शिवराय यांच्या अतिशय प्रिय अशा कोंढाण्याला आदिलशाही मध्ये बघून महाराज व्यतित होत असत. महाराजांनी आपले विश्वासू सरदार आणि बालमित्र असणारे तानाजी मालुसरे यांच्यावर कोंढाणा जिंकून आणण्याची जबाबदारी सोपवली. या मोहिमेमध्ये तानाजी मालुसरे यांना वीरगती प्राप्त झाली. मात्र त्यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी जीवाची बाजी लावून हा किल्ला जिंकून आणला. मात्र तानाजींच्या जाण्याने महाराज फारच हळहळले, आणि त्यांनी “गड आला पण सिंह गेला” हे उद्गार काढले.

सिंहगड किल्ल्यावरील महत्त्वपूर्ण प्रेक्षणीय स्थळे (Popular view spot at fort Sinhagad)

मित्रांनो पुरंदर किल्ल्यावर महत्वपूर्ण प्रेक्षणीय स्थळांमध्ये कल्याण दरवाजा, दारूचे कोठार, कोंढाणेश्वर मंदिर, देवटाके, तानाजी मालुसरे स्मारक,  उदयभान चे स्मारक, तानाजी कडा, राजाराम स्मारक, आणि टिळक बंगला इत्यादी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत.

सिंहगडच्या पश्चिम पायथ्याला कल्याण दरवाजा आहे. कोंढानपूर या गावातून येताना कल्याण दरवाजा मार्गे किल्ल्यात प्रवेश करता येतो. खरे तर कल्याण दरवाजा हे दोन दरवाजे असून यातील दगडांवर “श्रीमंत बाळाची बाजीराव पंडित प्रधान” अशा आशयाचा लेख आढळतो. तर दरवाजाच्या दोन्ही बुरुजांना अर्धवट बाहेर आलेले हत्तीचे शिल्प घडविण्यात आलेले आहे.

किल्ल्यावरील महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणजे दारूचे कोठार. दरवाजा मधून आत प्रवेश करताच उजव्या बाजूला दारूच्या कोठाराची दगडी इमारत दिसते. ऐतिहासिक दस्ताऐवजांनुसार 1751 मध्ये या दारू कोठारावर विज पडल्याने तेथील फडणीस यांचे घर जळून खाक झाले होते, आणि सर्व माणसे मृत्यूमुखी पडली होती.

सिंहगड वर यादवांचे कुलदैवत असणाऱ्या शंकर भगवान यांचे मंदिर असून मंदिरामध्ये पिंड आणि भगवान शिव यांची सुबक अशी मूर्ती  आहे. हे मंदिर यादवकालीन असल्याचे मानले जाते.

सरदार तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाच्या मागील बाजूस छोट्या तलावाच्या डाव्या बाजूस देवटाके दिसते. देवटाके हे कोळी बांधवांचे मंदिर असून, त्या मंदिरात भैरव व भैरवी यांच्या दोन सुबक मुर्ती आढळून येतात. यातील भैरव या देवाच्या मूर्तीच्या हातात राक्षसाचे शिर आहे.

मित्रांनो आपल्याला तानाजी मालुसरे यांचा इतिहास ठाऊकच आहे. तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थ या गडावर अमृतेश्वर च्या मागे तानाजी मालुसरे यांचे स्मारक आहे.

झुंजार माचीच्या पाठीमागील बाजूस गडाच्या तटबंदीच्या भिंतीस पायवाटेने जाताना तानाजी कडा लागतो. याच कड्यावरून तानाजी मालुसरे व त्यांचे मावळे गडावर चढले होते.

मुघल सत्तेला तब्बल 11 वर्षांपर्यंत टक्कर देणाऱ्या राजाराम महाराज यांनी, वयाच्या फक्त तिसाव्या वर्षी सिंहगडावर आपला देह त्यागला. त्यांच्या स्मृतीसाठी राजस्थानी पद्धतीचे रंगीत घुमट असणारे एक स्मारक उभारण्यात आले. पेशवे या स्मारकाची चांगली बडदास्त ठेवत असत.

किल्ल्यावर टिळक बंगला म्हणून एक वास्तू असून, ही टिळकांनी रामलाल नाईक यांच्याकडून खरेदी केलेली होती. या ठिकाणी टिळक नेहमी येत असत. महात्मा गांधी व बाळ गंगाधर टिळक यांची 1995 साली याच बंगल्यामध्ये भेट झाली होती.

सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी चे मार्ग (Routs to reach fort Sinhagad )

मित्रांनो सिंहगड हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असणारा किल्ला आहे. खास किल्ल्यावर जाण्यासाठी स्वारगेटहुन सिंहगड बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे. तसेच आपण आपल्या खाजगी वाहनाने देखील सिंहगडावर जाऊ शकता.

तर मित्रांनो सिंहगड या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या किल्ल्याबद्दल माहिती आपल्याला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट च्या माध्यमातून नक्कीच कळवा. तसेच आपल्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती नक्कीच शेअर करा.

 धन्यवाद…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button