केंजळगड किल्ला माहीती
केंजळगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक महत्वाचा किल्ला आहे.
केंजळगड ह्या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून १३०० मीटर इतकी आहे.
सह्याद्री मधील शंभु महादेव ह्या डोंगररांगेची एक शाखा मांडरदे ह्या नावाने ओळखली जाते.हयात शाखेतील एका सुळक्यावर केंजळगड हा किल्ला बांधण्यात आला आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वर मंदीरात स्वराज्याची शपथ घेतली होती.
ह्या रायरेश्वराचे पर्वत असलेल्या ठिकाणाहून दहा ते बारा किलोमीटर इतक्या अंतरावर हा केंजळगड किल्ला आहे.
केंजळगड हा किल्ला पुणे शहरापासून ९० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.सातारा जिल्ह्यातील वाई अणि पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या सीमेवर हा केंजळगड किल्ला वसलेला आहे.
भोर शहरातुन ह्या केंजळगड किल्याकडे जाण्याचा रस्ता आहे.
रायरेश्वर केंजळगड मार्गावर आपल्याला छत्रपती संभाजी महाराज यांचा एक पुतळा देखील पाहावयास मिळतो.जे व्यक्ती रायरेश्वर किंवा केंजळगडाला जातील त्यांना संभाजी महाराज यांच्या ह्या पुतळ्याचे दर्शन घेता येईल.
किल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावातुन असलेल्या चढण मधून आपले वाहन घेऊन वर आल्यावर दोन किलोमीटर इतक्या अंतरावर दोन रस्ते फुटतात.
एक रस्ता किल्ले रायरेश्वर कडे जातो अणि दुसरा रस्ता केंजळगड ह्या गावाकडे जातो.
किल्ल्यावर पोहोचल्यावर किल्याच्या वर जाण्यासाठी एक कच्चा मार्ग दिसुन येतो ह्या कच्चा मार्गावरून आपणास पायी चालत किल्यावर जावे लागते.
किल्ल्यावर जाण्याच्या ह्या कच्चा मार्गावरून जाताना दोन्ही बाजूला घनदाट झाडी दिसुन येते.म्हणुन ह्या किल्ल्यावर उन्हाळ्यात गेले तरी आपल्याला उन्हाचा कुठलाही त्रास जाणवत नाही.
पण दोन्ही बाजूला घनदाट झाडी असल्याने आपल्याला किल्ल्यावर जंगली प्राण्यांची भीती वाटु शकते.
किलल्याचा ट्रॅक खूप मोठा नसल्याने साधारणतः २० ते २५ मिनिटात आपल्याला किल्याच्या पहिल्या दरवाजावर येऊन पोहचता येते.
किल्ल्यावर जाताना एका ठिकाणी एक छोटेसे पाण्याचे टाके दिसते.हया टाक्याचा आकार वगैरे पाहिल्यावर आपल्याला हे पाण्याचे टाके घोड्यांना पाणी पिण्यासाठी बनविण्यात आले असावे असे वाटते.
किल्याच्या पहिल्या दरवाजावर आल्यावर आपल्याला किल्याच्या बाजुला असलेल्या बुरूजाचा वरचा भाग ढासळलेला दिसुन येईल.
पण ह्या बुरूजाचे दगड बघुन पुर्वीच्या काळी इथे एक भक्कम स्थितीतील बुरूज असावा असा अंदाज वर्तविण्यात येतो.
किल्याच्या पहिल्या दरवाजाच्या समोरच काही दगडी शिळांचे अवशेष पडलेले दिसून येतात हयाच दगडी शिळांचा वापर करून हा दरवाजा बांधण्यात आला असावा.
किल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारातुन पुढे चालत आल्यावर थोड्याच अंतरावर आपल्याला गडावर असलेली एक प्राचीन गुहा दिसुन येते.
ही गुहा नैसर्गिक आहे की मानवनिर्मित आहे याबाबद संभ्रम पाहावयास मिळतो.कारण कित्येक लोकांचे असे म्हणने आहे की ही एक पाण्याची गुहा आहे.
पण ह्या गुहेच्या आत गेल्यावर आपल्याला असे लक्षात येते की हे एक भुयार आहे कारण ह्या गुहेतुन जितक्या आतील भागात आपण जातो तितक्या आत आपल्याला मध्ये जाण्यासाठी अजुन मार्ग दिसुन येतो.
ह्या गुहेविषयी असे देखील सांगितले जाते की ह्या गुहेत कोळया राहतात अणि ह्या भुयाराच्या आत असंख्य प्रमाणात कोळया आहेत.
येथील स्थानिक लोकांकडून असे सांगितले जाते की किल्याच्या आजुबाजुला घनदाट जंगल आहे त्यामुळे एखादा जंगली प्राणी देखील यात लपुन बसलेला राहु शकतो म्हणून ह्या भुयारात जाताना आपण खुप काळजी घ्यायला हवी.
गुहेच्या आत गेल्यावर समोरच आपल्याला एक मुख्य भुयारी मार्ग दिसुन येतो.हया भुयारी मार्गातुन पाहिजे तितक्या आत आपल्याला जाता येते.
त्याच्याच बाजूला आत जाण्यासाठी अजुन एक छोटासा भुयारी मार्ग आहे.हा मार्ग नैसर्गिक आहे किंवा मानवनिर्मित हे आपणास सांगता येत नाही कारण चौकोनी आकाराचे हे भुयार आहे.
गुहेच्या आत पाहिल्यावर दुरपर्यत आपणास आत जाण्यासाठी मार्ग दिसुन येतो.
ह्या किल्ल्यावर असलेल्या भयानक जंगल तसेच येथे असलेल्या खोल भुयारा मुळे असे सांगितले जाते की इथे येताना आपण एकटे येणे टाळावे.
कारण किलल्याकडे येण्याच्या मार्गात दोन्ही बाजुंनी घनदाट जंगल आहे त्यामुळे इथे हिंस्त्र प्राणी असण्याची भीती आहे.
अणि पावसाळा वगळता इतर वेळी ह्या किल्ल्यावर कोणीही जास्त जात नाही.
किल्याच्या चहुबाजुला कातळकडा तसेच दगडाची तटबंदी असल्याचे आपणास पाहावयास मिळते.किल्यात पहिल्या दरवाजाच्या शेजारी पहारेकरींची देवळी आपणास पाहावयास मिळते.
किल्ल्यावर असलेल्या गुहेपासुन थोडे पुढे आल्यावर आपल्याला दगडी बांधकामाचे अवशेष दिसुन येईल.
ह्या दगडी बांधकामाच्या समोरील बाजूस अखंड काताळात कोरण्यात आलेल्या दगड तासुन तयार करण्यात आलेल्या कातळकडा पाहावयास मिळतात.
ह्या कातळकडाच्या पायरया अखंड काताळात खोदलेल्या आपणास दिसून येतात.इतर किल्ल्यांवर पाहिल्यास आपल्याला असे दिसुन येते की छोटछोटे तोडीचे दगड एकत्र करून पायरया बांधलेल्या आहे.
पण केंजळगड किल्ल्यावरील तासलेला पाषाण याचे अनावश्यक भाग बाजुला करून ह्या पाषाणातुन पायरया तयार करण्यात आलेल्या आहेत.
हा दगड फोडुन हया पायरया बनविण्यात आल्या असल्याने ह्या पायरींना कातळकडा असे म्हटले जाते.
ही कातळ कडा चढुन वर गेल्यावर आपल्याला किल्ल्यावर पाण्याचे टाके पाहायला मिळतात.
वर किल्ल्यावर गेल्यावर आपल्याला जागोजागी चुन्याचे घाणे दिसुन येतात.पुर्वीच्या किल्याच्या बांधकामासाठी आवश्यक असलेले मिश्रण तयार करण्यासाठी ह्या चुन्याच्या घाण्याचा वापर केला जात असे.
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचा एक झरा पाहावयास मिळतो हा एक नैसर्गिक झरा आहे यातुन आपणास अत्यंत शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळेल.
किल्ल्यावर पण ह्या व्यतिरिक्त खाण्याची राहण्याची सोय करण्यात आली नाहीये म्हणून इथे येताना आपण आपल्या जेवणाची सोय करून यायला हवे.
केंजळगड ह्या किल्ल्यावर आपणास एक कोठार देखील दिसुन येते.हया कोठाराचे बांधकाम वरतुन विटा अणि खालून दगड असे करण्यात आले आहे.
कोठाराचे वरील छत नाहीसे झाले आहे पण बाकी दगडाचे विटांचे बांधकाम आजही सुस्थितीत असल्याचे दिसून येते.
पण हे कोठार धान्याचे आहे की दारूगोळयाचे हे आपणास निश्चित सांगता येत नाही पण कोठाराची रचना पाहुन हे कोठार दारू गोळयाचे असल्याचा अंदाज वर्तविण्यात येतो.
किल्ल्यावर आपल्याला भग्न अवस्थेत असलेले वाड्यांचे अवशेष देखील दिसुन येतात.किल्ल्यावर चुन्याचे एकुण दोन घाणे आहेत.
किल्ल्यावर प्राचीन काळातील बांधण्यात आलेले केळंजाई देवीचे एक मंदिर देखील आहे.हे मंदिर पुर्णतः उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येते.
म्हणुन येथील स्थानिक नागरिकांना किल्ल्याच्या पायथ्याशी केळंजाई देवीचे नवीन मंदिर बांधले आहे.
जेव्हा शिवरायांनी १६७४ मध्ये केंजळगड हा किल्ला जिंकून घेतला होता तेव्हा त्यांनी ह्या किल्याला मनमोहन गड असे नाव दिले होते.
कारण ह्या किल्ल्याचा आजुबाजुला असलेला परिसर पाहिल्यावर आपले मन मोहीत होते.
किल्ल्याचा इतिहास –
केंजळगड हा किल्ला बाराव्या शतकात शिलाहार राजा भोज यांनी बांधला होता.
यानंतर १६४८ सालात केंजळगड हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला.हया किल्यावर बराच काळ आदीलशहाचे वर्चस्व होते.
२४ एप्रिल १६७४ साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुक्काम चिपळुन मध्ये होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या काही मावळ्यांना ह्या भागात हा किल्ला जिंकून घेण्यासाठी पाठवले होते.
अशा प्रकारे आदिलशहाच्या ताब्यात असलेला हा केंजळगड किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला होता.बराच काळ ह्या किल्ल्यावर मराठयांचे वर्चस्व होते.
पण १६८९ साली औरंगजेबाने अत्यंत क्रुरपणे संभाजी महाराज यांची हत्या केली होती.यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराज यांची हत्या केल्यानंतर स्वराज्यातील जेवढेही महत्वाचे किल्ले आहेत त्यापैकी बहुतांश किल्ले जिंकून घेतले.
अणि त्यानंतर १७०१ साली औरंगजेबाने केंजळगड हा किल्ला देखील जिंकुन घेतला होता.पण फक्त एक वर्षाच्या कालावधीत मराठ्यांनी हा किल्ला जिंकून पुन्हा आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला होता.
किल्ल्याचे वैशिष्ट्य –
केंजळगड किल्याच्या आजुबाजुच्या परिसरात असलेले सर्व किल्ले आपल्याला केंजळगड किल्ल्यावरून पाहावयास मिळतात.