सामाजिक

उत्सवाचे 10 दिवस खरेच मन भरून येईल असे आहेत पण….

हे दहा दिवस खरच खूप आनंदायी असतात. असे वाटते की दु:ख नाहीच कोणाच्या आयुष्यात.

या दहा दिवसामध्ये सर्वजणांच्या आयुष्यात नकळत हास्य खूळते, न कळतच नुसते तूम्ही चौकातून एखादी फेरी मारून आलात तरीही तूमचे मन आनंदायी होते.

खरच श्री गणेश या आपल्या देवाच्या आगमनात आणि या उत्सवात मनापासून समाविष्ट होतात. कोणाला सांगावे लागत नाही की तू गणपत्ती बप्पा मोरया म्हण, आजूबाजूला वाजणारे सुरेल गीत ऐकून, आपल्याला नकळत सगळे गाणी, घोषणा, जयजयकार करण्यासाठी रचलेले कडवे हे आपल्याला तोंडपाठ झाली आहेत.

एखादया व्यक्तीने गणपत्ती बप्पा  म्हटलं की आपल्या तोंडामधून लगेच मोरया असा शब्द बाहेर पडतो. कारण आपण लहान पणापासून हा उस्तव साजरा करत आलेलो आहोत.

आज नेहमीचा अभ्यास करून घरी आलो, काही खरेदी करण्यासाठी मी आमचे वडील आणि भाच्ची बाहेर पडलो. घरापासून ते ज्या ठिकाणी आम्हाला जायचे हाते त्या ठिकाणापर्यंत वाटेतील चौका चौका मधील आपले दैवत गणपती चे दर्शन आम्ही घेत गेलो.

ज्यांनी पण या सर्वांचे नियोजन केले आहे त्या सर्वांचे खरच मनापासून मी आभार मानतो. आणि त्या सर्वांचे सुध्दा आभार मानतो की ज्यांनी दहा दिवस चालणारा हा आपला उत्सव जीवंत ठेवला आणि येणारी पिढी पण याच मार्गाने जाउन, आपला हा उत्सव न चूकता साजरा करेल.

खूप ठिकाणी आकर्षण गणराय आम्हाला बघायला मिळाले. काही गणपतीला तर अतिशय सुंदर असे सजवले आहे. त्यांच्या आजूबाजूला रोशनाई मुळे तर तो परिसर खरच खूप सुंदर दिसत आहे.

तरी गणपती येउन एक ते दोन दिवस झाले आहेत अजून काही जण त्या सौदर्यांमध्ये भर टाकतील.

लाखो रूपये खर्च करून हा उत्सव आपण साजरा करतो, लोकसुध्दा पैशांचा विचार न करता सरळ सरळ देणगी देतात. पण कोणी ५० रूपये, कोणी १०० रूपये तर काही जण तर ५०० रूपये, काही जण १०००, २०००, ३०००, रूपये सुध्दा देणगी देतात.

आम्ही जेव्हा दर्शन घेण्यासाठी गेलो तर सर्व गोष्टी मनाला पटणाऱ्या होत्या. सगळया बाबतीत मी सकारात्मक होतो पण एक गोष्ट माझ्या या आनंदाच्या दिवसात मला निदर्शनात आली ती म्हणजे रोशनाई करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बांबू रस्त्यात खड्डा करून लावले होते. काही अंतर पार केले की दोन्ही बाजुंनी खडडे करून बांबू लावले आहेत.

एक तर रस्ता किती तरी वर्षांतून होतो, आमच्या गल्लीत तर ३० वर्षापासून आम्ही राहतो. रस्ता आता तयार झाला आहे. या उदाहरणावरून समजून घ्या की एकतर चांगला रस्ता होत नाही आणि त्यामध्ये या बांबू मुळे पडलेले खड्डे आणि हे जर खड्डे बूजवले नाहीत मग तर काही महिन्यातच आहे तो रस्ता पण राहणार नाही.

आता या खड्डयाची जबाबदारी जर प्रत्येक मंडळांनी जर घेतली असेल तर खूपच आनंदाची ही बाब असेल. पण मंडळांनी जबाबदारी घेतली असेल आणि त्यांनी जर ती पूर्ण केली नाही तर आपली गैरसौय होणार यात काय शंका नाही.

दहा दिवस बप्पा येउन खरच खूप आनंद देउन जातात पण या बांबूच्या जागी जर आपण दुसरी व्यवस्था केली तर आपले काही नुकसान होणार नाही. आपला रोड खराब होणार नाही.

रोशनाई करण्यासाठी, विजेच्या दिवेची कमान करण्यासाठी आपण दुसऱ्या पर्यायाचा वापर केला तर आपला रस्ता चांगला राहील. आणि या दहा दिवसाचा आनंद पुरेपुर घेता येईल. नाहीतर मनात नेहमी खंत राहील त्या रस्त्याने जाताना की, बप्पा येतात आणि त्यांच्या नियोजनात मंडळे खड्डे करतात. आणि त्याचा ताप त्यांच्या सहीत आपल्याला सर्वांना भोगाव लागत आहे असा डाग उगाच का लावून आपण घ्यायचा.

याचा विचार आपण करायला पाहिजे, रस्ते खराब करून सण साजरे करण्यात काय अर्थ याला दुसरा पर्याय आपण शोधलाच पाहिजे. कारण रस्ते बनवण्यात आपल्याच खिशातील पैसाचा वापर होतो. आणि आपण त्याचेच नुकसान करत आहोत.

या लेखातून कोणाचे मन दुखवत असेल तर मला माफ करा. तसा कोणताही माझा हेतू नाही.

 परत एकदा श्री गणेश चतूर्थी च्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा.. गणपती बप्पा मोरया, एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार.

 लेखक : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button