देवाच्या या रूपाला पण स्वीकारा
देवाच्या या रूपाला पण स्वीकारा… समाज सुधारकांनी दलित असतील ,अनुसूचित जमाती ,अनुसूचित जाती असतील यांच्या साठी खूप मोलाचे काम करून ठेवले . त्यांना त्यांचा अधिकार मिळवून दिला.समानतेची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण केली .आतापर्यंत आपला समाज स्त्री ला दुय्यम समजत होता, त्यामध्ये समाज सुधारकांमुळे मोलाचा बदल झाला.आणि प्रत्येक समाजातील स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरषाच्या खांदयाला खांदा लागून काम करू लागली.जसे पूरूषाला स्वातंत्र्य आहे तसेच स्त्री ला स्वातंत्र्य असायला पाहिजे हे लोकांना कळू लागले आणि लोकांनी त्यामध्ये बदल करायला सूरूवात केली ..
माझी कन्या भाग्यश्री योजना विषयी माहिती Majhi kanya Bhagyashri Yojana Information in Marathi
आणि आज तुम्ही बघत आहात जागतिक पातळी पर्यंत स्त्रीया पोहाचल्या आहेत..
तृतीयपंथी हे सुध्दा लिंग देवाने निर्माण केले आहे
आपण समाजामध्ये दोन वर्गांसाठी खूप काही केले ,जसे आपल्याला बदल गरजेचा वाटला त्याप्रमाणे आपण बदल करत गेलो..पण तिसऱ्या वर्गाकडे आपण दुर्लिक्षत केले.आपण पूरष आणि स्त्री चा सन्मान करतो. देवांने फक्त स्त्री आणि पुरूष हे दोन लिंग निर्माण केले नाही तर त्याबरोबर तृतीयपंथी हे सुध्दा लिंग देवाने निर्माण केले आहे..
ये चल निकाल पैसे..जल्दीसे निकाल नही तो में तुझे दिखाउ क्या..
२०११ च्या आसपास मी रेल्वेचा प्रवास करून मी माझ्या कॉलेज ला जात असे,तेव्हा मी अनेक घटना मी डोळयांनी स्वत: अनुभवल्या..रेल्वेचा प्रवास म्हणजे प्रचंड गर्दी .प्रवास चालू झाल्यावर रेल्वेमध्ये अचानक काही जणांचा आवाज ऐकू आला ,ये चल निकाल पैसे,टाळयांचा आवाज ऐकू आला….ये चल निकाल पैसे ,जल्दीसे निकाल नही तो में तुझे दिखाउ क्या,आवाज पुरूषासारखा पण स्त्री सारखे वस्त्र परिधान केलेला धड तो पुरूष पण वाटत नव्हता आणि धड ती स्त्री पण वाटत नव्हती कपडयावरून..
असा आवाज ऐकू आल्यावर काहीजण घाबरले आणि पटकन पैसे देउ लागले ,बघता बघता काय सर्वांनी जवळपास पैसे दिले ,एक गोष्ट नमुद करावशी वाटली की कोणाकडे चिल्लर नसेल तर ते फक्त दहा रूपये काढून घेत आणा बाकीचे पैसे परत करत असे..
या वरून त्यांना असे दर्शवायचे असेल की आम्ही गरजे पुरते पैसे मागत आहोत,आम्हाला जगण्यापुरते पैसे आवश्यक आहेत.
काही दिवसांनी असाच प्रवास करत असताना काही जण अशा प्रकारे रेल्वे मध्ये १० रूपये मागत होते,
पण प्रत्येक वेळेस सगळेजण घाबरतील आणि पैसे देतील असे नाही त्या वेळेस त्यांना पैसे भेटले नाही.
पण इतक्या खालच्या पातळीवर लोकांनी शिव्या दिल्या ,मारहाण केली ,रक्त येई पर्यंत मारहाण केली….
शेवटी त्यांना दुसऱ्या डब्यांमध्ये जाण्यास भाग पाडले..
कधी रेल्वे तर कधी ब्रिज खाली उभारून चार पैसे गौळा करावे लागतात..
मधल्या काळात करोना आला ,रेल्वे बंद होत्या ,बस ही बंद, माणसे रस्त्यावर नव्हती ,सगळी कडे सुकसुकाट होता, खूप जणांचे खाण्याचे हाल झाले ,काही जणांना सरकारची मदत भेटली ,काही जणांना नाही भेटू शकली..
काही जणांना नाही भेटली त्या मध्ये हे होते तृतीयपंथी..मग काय काही जण गावकडे आलेले,आता रेल्वे तर बंद होती.
मग खाण्यापुरते पैसे कशे गोळा करायचे ,मग काय त्यांनी शहरातून गेलेल्या ब्रिज खाली उभारण्यास सुरवात केली..
काळपरवाचीच गोष्ट आहे आमचे भाउजी आपल्या दोन लेकरांना आणि बायकोला घेउन ब्रिज च्या खालून जात होते,७-८ जणांचा समुह ब्रिज खाली उभा राहिला होता.
भाउजींची गाडी थांबवली आणि भाउजीला पैसे मागू लागले, भाउजींनी पैसे दिले.
या घटना सांगायच हाच उद्देश की आपण या वर्गाला दुर्लक्षित केले आहे त्यामुळे त्यांना कधी रेल्वे ,तर कधी ब्रिज खाली उभारून चार पैसे गौळा करावे लागतात..
देवाच्या या रूपाला आपण योग्य सन्मान दिला पाहिजे.
मुलगा होणार का स्त्री होणार का तृतीयपंथी होणार हे आपल्या हातात नाही ..
देवाच्या या रूपाला आपण योग्य सन्मान दिला पाहिजे..त्यांना जगण्याचा अधिकार तर आपण दिला आहे.
पण त्यांना नौकरी वर ठेवण्याचे काम आपल्या ला करायचे आहे.
त्यांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला त्यांना जसे आपण शिक्षण घेतो तसेच त्यांनाही शिक्षण घेता आले पाहिजे.
तारूण्य, तंबाखू आणि अर्थव्यवस्था
आपल्या लेकारांना आपण त्यांचा आदर करायला शिकवले पाहिजे.
त्यांच्या पण हाताला काम मिळाले तर त्यांना रेल्वे चा सहारा घ्यायची गरज पडणार नाही,सरकार,तसेच कायदयांने त्यांना अधिकार मिळत आहे.
पण समाजाने त्यांन स्वीकारले पाहिजे,त्यांच्या कडे बघण्यांच्या दृष्टिकोनात बदल केला पाहिजे ..
अशी काही घटना मी ऐकल्या आहेत की त्यांना जन्म देणारे सुध्दा समाज काय म्हणेन म्हणून त्यांना संभाळत सुध्दा नाहीत, ही खूप खेदजनक घटना आहे..
आईवडीलांनीच जर पाठीवरचा हात काढला तर अशा तृतीयपंथीयांनी समाजाकडून तर काय अपेक्षा ठेवायची…
ज्या रूपात देवांने मूल दिले आहे त्या रूपात स्वीकार करणे हे आपली जबाबदारी आहे
आणि त्यांचा भेदभाव होणार नाही याची काळजी घेणे ही सुध्दा आपली जबाबदारी आहे..
आपल्या भारतात एखाद्या पुरूष,आणि स्त्री ज्या उंची पर्यंत प्रगती करतात त्या उंची पर्यंत प्रगती करण्याचा अधिकार ,संधी दयायला पाहिजे.
परत एकदा सांगतो देवाच्या या रूपाला पण स्वीकारा..
लेखक : राम ढेकणे