सामाजिकमनोरंजनशिक्षण

जिद्दीचा कथा प्रवास

“हे बघ, समाज माध्यमांवर माझ्या कथेचे किती कौतुक झाले आहे, किती छान छान प्रतिक्रियासुद्धा आल्या आहेत.”, ती मोठ्या उत्साहाने मैत्रीणीला दाखवत होती. मैत्रिणीने मात्र “काही खरे नसते बघ या आभासी जगतात, तू उगाच हवेत जाऊ नकोस.”, अशी काहीशी तिच्या उत्साहावर पाणी फिरवणारी प्रतिक्रिया दिली. तसे तिचे लिखाण छान चालले होते. स्वतः पुरते लिहिण्यापासून सुरू झालेला प्रवास आधी मैत्रिणींना, मग घरच्यांना आणि मग बाहेरच्यांना दाखविण्या पर्यंत म्हणजे समाजमाध्यमांवर लिहिण्या पर्यंत बहरत गेला. इतरांसाठी ती इतरांमधलीच एक अशी असली तरी तिला ती लाखांमधली एक अशीच वाटत होती. निदान आजूबाजूच्यांना वाटणारे तिचे कौतुक तरी हेच सांगत होते. पण म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी, तशी तिची ही मैत्रीण होती आणि म्हणूनच त्या मैत्रिणीच्या मते समाज माध्यमांतून होणाऱ्या कौतुकाला फारसे महत्व नव्हते.

रयतेचा राजा, रयतेला आईप्रमाणे प्रेम देणारा राजा शिवाजी

“तू एखाद्या स्पर्धेमध्ये का भाग घेत नाहीस? नाही म्हणजे अधिकारी व्यक्तींकडून लिखाण तपासले जाईल, मान्यवरांचे मार्गदर्शन मिळेल आणि आपण नक्की पाण्यात कुठे उभे आहोत हे देखील कळेल.” “तू एखाद्या स्पर्धेत का भाग घेत नाहीस?” या वाक्याने तिला नवी चेतना दिली. आता ती अशा स्पर्धेच्या शोधात होती आणि देवाने तिची हाक ऐकली देखील. एका वर्तमानपत्राने एका ज्येष्ठ साहित्यिकाच्या जयंती निमित्त लघुकथा स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेसाठी कथा पाठवायला एक महिन्याचा कालावधी होता. विषयाचे बंधन नव्हते ही तिच्यासाठी जमेची बाजू होती, तर शब्द संख्येचा नियम तिच्या नियमित लिखाणाशी साधर्म्य साधत होता.

आता एका स्पर्धेसाठीचा प्रवास सुरू झाला. तिने तिच्याच लिहिलेल्या कथा चाळल्या. आईला जशी आपली सारीच मुले प्रिय असतात, तसे लेखकाला आपले सारेच लिखाण प्रिय असते. कितीही डावे उजवे केले तरी त्यातले श्रेष्ठ असे शोधणे सोपे नसते. पण तिने तो अवघड टप्पा पार केलाच. यावेळी तिने समाज माध्यमांनी दिलेला कौल आधार म्हणून घेतला आणि सर्वाधिक पसंती – प्रतिसाद मिळालेली कथा स्पर्धेसाठी निवडली. काम इतके सोपे नव्हते. स्पर्धेत यश मिळविण्याचे आव्हान स्वीकारले होते, तेव्हा मेहनत तर घ्यावीच लागणार होती. शिवाय महिना भराचा कालावधी होताच हाती. तिने कथा आधी वाचून काढली. स्पर्धेचा महत्वाचा निकष म्हणजे शब्द संख्या. त्या निकषात कथा बसते की नाही हे तपासून पाहिले. व्याकरण, शुद्धलेखन हे सगळे सोपस्कार करून घेतले. आता दिवस रात्र ती कथा तिच्या भोवती पिंगा घालत होती. शेवट तर छान आहे का? कथेचा वेग कसा आहे? शब्द संख्या सांभाळताना कथा कुठे रेंगाळत तर नाही ना? पात्रांच्या नावांपासून ते निवडी पर्यंत सर्व तपासून पाहिले. तिच्या लेखी सर्व जुळून आले होते. मनात उगाच नकारात्मक प्रतिक्रिया नको म्हणून तिने तिचा स्पर्धेतील हा सहभाग मैत्रिणी पासून लपवूनच ठेवला होता. आता मग कोणाला ऐकवू कथा? माणसाचा पहिला गुरू त्याची आई, म्हणून तिने आईलाच कथा ऐकवायचे ठरवले.

“हं ऐकवा कथा.”, आईने फोडणी देतादेताच तिच्याकडे कान दिले.

“असे नाही आई, जरा हातातली कामे बाजूला ठेवून इकडे लक्ष दे. मी तुझी लाडाची ना?”

“बरं बाई बसते तुझ्या समोर”, फोडणी कोशिंबीरीत सोडून हात पुसत आई तिच्या समोर बसली.

ती सुद्धा जणू व्यासपीठावरून कथा सादर करत आहे अशा आविर्भावात कथा सांगू लागली. आईने अगदी तल्लीन होऊन कथा ऐकली.

“ए छान आहे गं कथा. अगदी नेहमी लिहितेस तशी.” “आई नेहमीसारखी की नेहमीपेक्षाही भारी?”

“हो बाई, नेहमीपेक्षाही भारी.”

आईने तिच्या परिने प्रतिसाद दिला पण तिचे एवढ्याने समाधान होणार नव्हते. तिने महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रमुखांना कथा दाखवली. त्यांनी कौतुकाची थाप हातात दोन श्रीखंडाच्या गोळ्या ठेवत दिली. आणखीही दोन तीन जणांना कथा दाखवून तिने तिची खात्री करून घेतली. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तीन एक आठवडे कधी निघून गेले कळालेच नाहीत. स्पर्धेसाठी कथा ईमेलद्वारे किंवा पोस्टाने पाठवायची होती. तिने दोन तीन पांढरे शुभ्र कागद हाताशी घेतले आणि तिच्या नक्षीदार हस्ताक्षरात कथा लिहून काढली. हस्ताक्षराचा काही परिणाम परीक्षकांवर होईल असा तिने विचार केला. तिने ती कथा व्यवस्थित पोस्टाने पाठवून दिली. आता प्रतीक्षा निकालाची होती. पण त्याला दोन एक महिन्यांचा कालावधी होता.

एकतर माणसांना तूम्ही व्यसनी बनवतात आणि घाणीचे साम्राज्य तयार करतात..

वर्तमानपत्राच्या वार्षिक महोत्सवात निकाल जाहीर होणार होता. मधल्या काळात तिचा अभ्यास आणि लिखाण असे चालूच होते. मैत्रिणीचे टीकास्त्रही संगती होतेच. ती मात्र मनोमन म्हणत होती, “एकदा स्पर्धा जिंकू देत, मग सांगते तुला.” आणि मनोमनच स्पर्धेच्या निकालासाठी गणरायाकडे प्रार्थना करत होती. शेवटी स्पर्धेच्या निकालाचा दिवस आलाच. छानपैकी आवरून कोणालाही न सांगताच ती एकटी कार्यक्रमाला गेली. जाताना तिला देवापुढे हात जोडताना आईने मात्र पाहिले होते आणि जागेवरूनच आशीर्वादही दिले होते. वार्षिक महोत्सव असल्याने अनेक मान्यवरांची भाषणे चालू होती. तिला मात्र आज या कशाचेच गमक नव्हते. तिचे कान आसूसले होते ते स्पर्धेचा निकाल ऐकण्यासाठी. परीक्षकांनी सुरूवातीला आपले मनोगत मांडले, लेखकांसाठी मार्गदर्शन केले आणि मग निकाल वाचून दाखविला. तिचे नाव निकालात कुठेच नव्हते. ती हिरमूसली आणि आल्या पावली परतली. तिचा निकाल जेवताना आईने तिच्या चेहऱ्यावरून ओळखला आणि आता जरा अभ्यासावर लक्ष केंद्रित करा असा अनाहूत सल्ला दिला. तिने हार मानली नाही, अभ्यास आणि लिहिण्याचा अभ्यास चालूच ठेवला. महाविद्यालयाचा वर्धापन दिवस होता. त्या दिवशी वार्षिक अंकाचे प्रकाशन होणार होते. खरे तर अशा कार्यक्रमांत तिला फारसा रस नसतो, पण उपस्थिती अनिवार्य असल्याने तिला जावेच लागले. कार्यक्रम संपला तसे सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक अंक वाटण्यात आला. तिच्याही हातात अंक आला, तो ती उघडून पाहण्या आधीच मित्र मैत्रिणी येऊन तिचे अभिनंदन करू लागले. तिला काहीच कळेना. तिने अनुक्रमणिका तपासली तेव्हा कळाले, मराठी विभागाच्या प्रमुखांनी तिची कथा महाविद्यालयाच्या वार्षिक अंकामध्ये प्रकाशित केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button