सामाजिकजागतिक

काळा पैसा सफेद / पांढरा करण्यात आपण सगळे भागीदार..

भारताचा जीडीपी जेवढा आहे तेवढा खरा जीडीपी नसून त्यापेक्षा जास्त म्हणजेच साधारण  जीडीपीच्या दुप्पट जीडीपी भारताचा आहे. कारण माणसाने लपवलेला काळा पैसा त्यामध्ये मोजला जात नाही.

 लोकाला भ्रष्टाचारी म्हणण्याचा सुध्दा अधिकार आपल्याला नाही. तुम्ही विचार करा जेव्हा जमीनी ची खरेदी विक्री होते .नोंदणी प्रक्रीया मध्ये आपण विक्रि किंमत किती लावतो.

आणि खरे समोरच्या लोकांना किती देतो.. हे सर्वांनी अनुभवले असेल.. हाच तो काळा पैसा त्याची नोंद होत नाही कुठेच .आणि बाजारात फिरत राहतो.

 समजा १५०० चौ.मी चा भाव सध्या आमच्या उस्मानाबाद मध्ये थोड शहराच्या बाहेर ८००००० लाख चालू आहे.

८ लाखाची खरेदी प्रक्रिया जेव्हा चालू होते. नोंदणी जेव्हा एकाच्या नावावरून दुसऱ्याच्या नावावर होते. तेव्हा तिथे मूळ खरेदी  ४ लाखाच्या आसपास दाखवली जाते. याचा अर्थ त्या व्यक्ती ला ८ लाख दयायचे पण सरकारला सांगायच की आम्ही ती ४ लाखालाच खरेदी केली आहे.

कारण विक्री वाल्यावर ४ लाखावर जो कर सरकार कडून लावला जातो तो वाचवण्याचा प्रयत्न् तो करतो.आणि सरकारला फक्त् उरलेल्या ४ लाखावरचाच कर मिळतो..

तूमचा व्यवहार लपवणे म्हणजेच काळा पैसा निर्माण करणे.. जेवढा व्यवहार आपण लपवणार तेवढा तोटा सरकारला होणार.. आयुष्यामध्ये कधी कधी आपण जमीनीची खरेदी विक्री करतो आणि या प्रकारे सरकार ची फसवणूक आपण करत असतो. याचाच अर्थ आपण सगळे जण काळा पैसा सफेद करण्यात भागीदार आहोत..

तसेच व्यापारी आपल्याला पावती देण्याचे टाळत असतात हे तर सर्वांना माहीत आहे. जो पर्यत तुम्ही तुमची नियत साफ ठेवत नाहीत तोपर्यत भारतातील काळा पैसा बाहेर येणार नाही.

जेवढा जास्त काळा पैसा निर्माण होईल तेवढा जास्त् वेळ लागेल विकास कामे होयला..आणि निधी कमी पडेल आणि खरा जीडीपी आपला कळणार नाही..

 त्यामूळै जमीन खरेदी विक्री करताना भारताचा विचार करून, एक सामाजिक भान ठेवून व्यवहार केला पाहिजे.. नाहीतर मला ठाम पणे असे म्हणावे लागेल की काळा पैसा निर्माण करण्यात तुमचा मोलाचा वाटा आहे.भारतावर या भूमी वर तुमच प्रेम नाही, जिव्हाळा नाही, तुम्ही पण भ्रष्टाचारी आहात हे मला ठाम पणे सांगावे लागेल.     

    लेखक : राम ढेकणे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button