सामाजिक

Thoughts of Swami Vivekananda… स्वामी विवेकानंदांचे विचार

३१ जूलै ला स्वामी विवेकानंदांचे विचार ( Thoughts of Swami Vivekananda )मांडण्यासाठी व भगवत गीतेबदृल प्रवचन करण्यासाठी औरंगाबाद मधील रामकृष्ण आश्रम चे प्रमुख महाराज आले होते. त्याबरोबर त्यांच्या बरोबर सामाजिक कार्यात पुर्णपणे वाहून घेतलेले माननीय डॉ.जिंतूरकर सर आले होते. त्यांनी आम्हाला आमंत्रित केले राष्ट्रीय यूवक संमेलन मध्ये हजर राहण्यासाठी.

काही दिवसात आम्ही एक दिवस अगोदर औरंगाबाद येथे गेलो,आणि शहरातील मूख्य पर्यटन स्थळांना भेटी दिल्या.दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय यूवक संमेलनामध्ये हजेरी लावली. राष्ट्रीय यूवक संमेलन पार पडले रामकृष्ण आश्रम ,औरंगाबाद मध्ये..मग या ठिकाणी मला आपले आमदार यांच्या शैलीत वर्णन करावेसे आवडेल.काय ते आश्रम, काय ती स्व्च्छता, काय तो मंदिराचा कळस , काय ती शिस्त, काय तो नीटनीटकेपणा, काय ते महाराज, काय तो प्रसन्न परिसर, काय ती झाडी , सर्व कस कस एकदम ओके..

आध्यात्म किती महत्वाचे होते व स्वामी विवेकानंदांचे विचार ( Thoughts of Swami Vivekananda )

सकाळी ९ वाजेच्या दरम्यान चालू झालेले संमेलन ६च्या आसपास संपले. संमेलनामध्ये वेगवेगळया ठिकाणाहून मान्यवर बोलवले होते. सर्वं मान्यवरांनी प्राचीन भारता पासून  आध्यात्म किती महत्वाचे होते.

आणि पूढे पण याचा वापर आपल्याला आपल्या भारताचा विकास करायचा असेल तर याच्याशिवाय पर्याय नाही, हे सांगण्यांचा प्रयत्न केला.

यामध्ये तरूण भारतीयांनी काय भुमिका घेतली पाहीजे, कोणत्या मार्गाने गेले पाहिजे.

आणि स्वामी विवेकानंदांचे विचार ( Thoughts of Swami Vivekananda )आपल्या भारतासाठी कशे महत्वाचे आहेत या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या प्रशांत सरांनी खूप मोलांचा संदेश दिला.

त्यांनी असे म्हंटले की जे पण आता पर्यंत महान व्यक्ती होउन गेले त्यांनी तीन गोष्टी अमलात आणल्या.त्या अशा

  1. स्वार्थीवृत्ती नसणे
  2. ढोंगी पणा नसणे
  3. आळशी नसणे तसेच प्रामाणिक पणा असणे

या तिन गोष्टीला सोडून अजून एक महत्वाची बाब म्हणजे स्वच्छता..

जर तूम्हाला पण मोठे व्हायचे असेल, काही तरी समाजासाठी करायचे असेल .आपल्या भारत भूमी साठी काही तरी करण्याची तूमच्या ईच्छा असेल तर या तीन गोष्टी तसेच स्वच्छता तूमच्यात असणे गरजेचे आहे.

नागपूर मठाचे मुख्य स्वामी यांनी सुध्दा आम्हाला मार्गदर्शन केले.

त्या मध्ये त्यांनी स्वामी विवेकानंद किती महान होते आणि त्यांचे विचारांचा अमल आजही मोठे मोठे व्यक्ती करताना दिसत आहेत.

गुरु आणि शिष्य यांच्या नात्याबद्दल त्यांनी आम्हाला सांगितले. रामकृष्णांनी मुद्दामुन स्वामी विवेकांनदाच्या ज्ञानावर हलकासा पडदा टाकला आणि त्यांना पूर्णपणे ध्यानयुक्त जीवन जगण्यापेक्षा लोकांची सेवा करण्यास सांगतिले.स्वामींजीना ईश्वर कोण आहे हे जाणून घ्यायचे होते लवकर आणि सतत ध्यान करत स्वामी बसत असे.पण गुरु रामकृष्ण यांच्या मुळे ते लोकांना जागृत करण्यासाठी ,समाजसेवा करण्यासाठी ,ईश्वरी ज्ञान सगळया जगाला कळावे याच्यासाठी ते आयुष्यभर कार्य करत राहिले..

ब्रिटीश लोकांनी आपला आत्मविश्वास घालवला

काही विचारांवर नाटकसुध्दा दाखवण्यात आले, आपल्या शक्तींची आपल्याला जाणीव नाही,ब्रिटीश लोकांनी आपला आत्मविश्वास घालवला ,आपल्या संस्कृती विषयी वाईट गोष्टी बद्दल त्यांनी प्रकाश टाकत असताना .

त्यांनी आपल्या मनातील आपल्या संसकृती बद्दलचा आदर कमी केला.

तरीही आपली संस्कृती टिकली. आता गरज आहे आपण सिंह आहे हे दाखवून दयायची.

काही परकीय आक्रमणामुळे आपण आपला आत्मविश्वास गमावून बसलो आहोत..आता आपल्यातलेच काही लोक स्वत:ला शेळी समजत आहेत.

खरे ते आहेत सिंह पण मनावर त्यांच्या एवढा परिणाम झाला आहे की ते स्वत: ला शेळीच समजत आहेत..गरज आहे त्या सर्वांना तूम्ही सिंह आहात हे जाणीव करून देण्याची..

दुपारच्या सत्राच्या अगोदर छोटासा कार्यक्रम पण घेण्यात आला प्रभातफेरी काढण्यात आली.

पूर्ण मंदीराच्या आसपास असलेल्या जागेमध्ये प्रभातफेरी आणि त्यासोबत घोषणा देण्यात आल्या.

Graduate Aptitude Test in Engineering | GATE 2023 Admit Card आले आहे, सविस्तर माहिती वाचा..

वंदे मातरम ,भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय,मॉ शारदा देवी की जय, जय भवानी ,जय शिवाजी अशा घोषणा देउन स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करण्यात आले..

वैयक्तिक ध्येय तर सर्वांचे असतेच पण ध्येयामागील ध्येय ठेवणे गरजेचे आहे.

ध्येयामागील ध्येय म्हणजे आपण जगत असताना आपल्या समाजाचा, आपल्या आजूबाजूच्या परिसरांचा विचार करणे ,गोरगरींब लोकांना मदत करणे,आपल्या देशातील गरीबी कशी दूर होईल याचा विचार करणे.

आपल्या लोकांना आध्यात्मिक ज्ञानाची ओळख करून देणे.

आपला देश कसा प्रगती करेल याचा विचार करणे हे आपल्या युवकांचे कार्य येणाऱ्या २५ वर्षामध्ये असायला हवे..

भरपूर काही गोष्टी या संमेलनामध्ये शिकायला भेटल्या.पण सगळयात गोष्टी एका लेखात सांगणे शक्य नाही.अशीच चर्चा करूया नंतर च्या लेखामध्ये.

तो पर्यंत तूम्ही स्वामी विवेकांनदाचे विचार काय होते हे जाणीव घेण्यासाठी त्यांचे पत्र असतील.

त्यांचे जे लिखान आहे ते आवश्य वाचावे ही नम्र विनंती.

माझी कन्या भाग्यश्री योजना विषयी माहिती Majhi kanya Bhagyashri Yojana Information in Marathi

लेखक : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button