टेकनॉलॉजिशिक्षण

कोणत्याही क्षेत्रात जावा इंजिनीअर/अभियंते दिसणारच..

आज १५ सप्टेंबर आहे आणि आज इंजिनीअरिंग दिवस म्हणून साजरा केला जातो.

हा जो इंजिनीअरिंग चा प्राणी तूम्हाला पृथ्वी च्या कोणत्याही भागात जावा ,कोणत्याही गल्लीत जावा,कोणत्याही शहरात जावा.

कोणत्याही विकसित असो अविकसित असो कोणत्याही शहरात जावा हा प्राणी तूम्हाला दिसणार म्हणजे दिसणार..

एवढे आमच्या सारखे प्राणी या पृथ्वी वर तयार झाले आहेत की तूम्ही शहरामध्ये नुसता तूम्ही एखादा दगड वरती फेकला तर कोणत्याना कोणत्या इंजिनीअरिंग वाल्याच्या डोकयामध्ये पडेल..एवढी आमची संख्या वाढली आहे..

आमची एक खासियत आहे की आम्ही एक शिक्षण घेतो पण त्या क्षेत्रात बोटावर मोजण्या इतकेच आमच्या पैकी करिअर करतात ..बाकीचे आम्ही कधी काय करणार आणि कोणत्या क्षेत्रात प्रगती करणार याचा काया भरोसा नाही..

इंजिनीअर असा प्राणी आहे का तो प्रत्येक क्षेत्रात उडी मारतो आणि जिथे त्याला वाटले की आता याक्षेत्रात आपण करिअर करू शकतो त्या क्षेत्रात तो  स्थिर होतो..

आमची एक खासीयत आहे की आमचे हे जीव चहा पासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत सगळीकडे पाहायला भेटतील..

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार सुध्दा इंजिनीअर आहेत..

इंजिनीअर चहा वाला असु शकतो, इंजिनीअर हॉटेल वाला असू शकतो ,इंजिनीअर वडापाव वाला पण असू शकतो, इंजिनीअर क्लर्क असू शकतो, व्यापारी असू शकतो.

मॅनेजर असू शकतो ,किंवा इंजिनीअर एखादा कंपनीचा मालक पण असू शकतो , इंजिनीअर शिक्षक पण असू शकतो..

म्हणजे आम्ही असे कोणतेच  क्षेत्र सोडले नाही कि तिथे आमच्या अस्तित्व नसेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचे अस्तित्व आहेच..

आमच्यातले काही जण पदवी घेतात आणि नंतर विचार करतात

आता आपण कशात करिअर करायला पाहिजे..म्हणजे आमच्या पैकी काही जण इंजिनीअर बनतात पण कार्य करायच कोणत्या क्षेत्रात ते नंतर ठरवतात..

  • काही जण सरकारी नौकरी साठी तयारी करते आणि अधिकारी होतो..काही जण कलेक्टर सुध्दा होतात..
  • काही जण इंजिनीअर पदवी घेउन घरी शेती असल्यामुळे शेतामध्ये आधुनिक पध्दतीचा वापर करून शेती करतात..
  • आणि आशे पण काय इंजिनीअर आहेत ते फक्त्‍ त्याच क्षेत्रामध्ये करिअर करून चांगल्या पगारी उचलत आहेत

 इंजिनीअर ला म्हंटले तर सगळच येते, इंजिनीअर काहीही करू शकतो ,इंजिनीअर कडे जिद्द, चिकाटी ,क्षमता, सय्यंम असल्यामुळे ते कुठेही तग धरू शकतात..

आज असे म्हणायला हरकत नाही की देशाची अर्थव्यवस्थेला हातभार हे इंजिनीअर लावतात..कारण नवीन नवीन यंत्र बाजारात आणणे,नविन नविन वस्तू बाजारात आणणे हे इंजिनीअरच करत असतो..

म्हणजे समजा अर्थव्यवस्थेला गती दयायची आहे तर इंजिनीअर अशे काही प्राडाक्ट बाजारात आणून अर्थव्यवस्थेला गती देउ शकतो..

भारताला पूढे घेउन जाण्यात आमचाच बऱ्यापैकी हात आहे ,असे मी ठाम पणे म्हणू शकतो..

तसेच आज आध्यात्मिक मार्गामध्ये सुध्दा इंजिनीअर चा प्रवेश झाला आहे..

खूप अशे आमच्या सारखे जीव आहेत ते आध्यात्मिक मार्गाने जीवनाची प्रगती करण्यासाठी तसेच हे आयुष्‍ नेमके काय असते याचा शोध घेण्यासाठी आपले योगदान देताना दिसत आहेत..

काही आमच्या सारखे जीवन सन्यास सुध्दा घेत आहेत..आयुष्यावर विचार करत आहेत..मन शांती मनन चिंता ,देव ,गुरू ,शक्ती ,मंत्र याच सुध्दा अभ्यास करून त्या क्षेत्रासुध्दा आमच्या सारख्या जीवाने उडी घेतली आहे..

आपल्या घरामधील वस्तू तूम्ही निरीक्षण करून बघा ,आम्ही नसतो तर आज तूमच्या आयुष्यात प्रगती झाली नसती..आज आमच्या मुळे तूमचे जीवन सुखी, तसेच अनेक सुविधा तूम्हाल उपभोगता येत आहेत..

घर बसल्या खूप काही गोष्टी तूम्ही करू शकता ते फक्त आमच्या सारख्या जीवामुळेच..

म्हणून  say to all engineers ,  thank you so much. तूमचा मी आभारी आहे..

अशेच इंजिनीअर बनत जावे ,अशीच लोकांच्या जीवनात प्रगती होत रहावी..

लेखक : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button