टेकनॉलॉजि

ChatGPT चाट जीपीटी काय आहे आणि त्याचा उपयोग कसा करायचा ?

नमस्कार मित्रांनो आमच्या  या वेबसाईट रुपी छोट्याशा ज्ञान झऱ्यात आपले सहर्ष स्वागत आहे.

         मित्रांनो बदल हा निसर्गाचा उदात्त गुणधर्म आहे. प्रत्येक क्षेत्रात काही कालावधीनंतर काही प्रमाणात का होईना बदल हा होतच असतो, मग त्यातून तंत्रज्ञानाचे क्षेत्र तरी कसे मागे राहील?

  आपल्याला कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मिळत नसेल तर पटकन कोणीतरी बोलून जातं की, “अरे गुगल कर न” अर्थात कुठल्याही अडलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे गुगल जणू असेच समीकरण झालेले आहे. गुगल साठी कुठली पर्यायी व्यवस्था निर्माण होईल, असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र प्रत्येक गोष्टीला पर्याय उपलब्ध होतोच या उक्तीनुसार गुगल साठी पर्याय म्हणून चाट जीपीटी या नावाचे सॉफ्टवेअर बाजारात आलेले आहे. आज आपण याच विषयी माहिती बघूया.

चाट जीपीटी म्हणजे काय? What is ChatGPT in marathi

         मित्रांनो आपण कुठलाही प्रश्न अडला की लगेच गुगल या सर्च इंजिनकडे धाव घेतो, आपण विचारलेल्या क्वेरी च्या आधारे गुगल आपल्याला उत्तमात उत्तम वेबसाईट्स चे पर्याय दाखवते. आणि आपण त्यापैकी कुठल्याही वेबसाईटवर जाऊन आपल्या शंकेचे निरसन करून घेतो. मात्र मानवी नियमानुसार आपण बऱ्याचदा एकापेक्षा अधिक वेबसाईटवरून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, अशावेळी दोन वेबसाईटवरील माहितीमध्ये भिन्नता आढळल्यास आपण कन्फ्युज होतो.

                यावर मात करत चाट जीपीटीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेली एक प्रणाली निर्माण केली आहे. ज्यामध्ये आपण विचारलेला प्रश्नाला चॅट जीपीटी प्रोसेस करून, सर्वोत्तम स्त्रोतांमधील माहिती संकलित करून त्यात आवश्यक तो वाक्यरचनेचा बदल करून आपल्याला अगदी जिवंत व्यक्तीने उत्तर दिल्याप्रमाणे उत्तर देते.

         मित्रांनो चाट जीपीटीचे संक्षिप्त रूप चाट जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर Chat Generative Pre Trained Transformer असे असून, या सॉफ्टवेअरची निर्मिती ओपन ए आय (OpenAI) या कृत्रिम बुद्धिमत्ता सेवा पुरविणाऱ्या कंपनीने केली आहे. चाट जीपीटी हे एक चॅटबॉट आहे. जे तुमच्याशी आभासी संभाषण करते.

चाट जीपीटी हे सॉफ्टवेअर प्रारंभी 30 नोव्हेंबर 2022 रोजी प्रकाशित करण्यात आले होते. मात्र त्याचे स्थिर प्रकाशन हे 13 फेब्रुवारी 2023 रोजी करण्यात आले आहे.

चाट जीपीटी वापरण्यासाठी तुम्हाला जरी इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता असेल, तरीही चाट जीपीटी काही इंटरनेटवरील माहिती शोधत नाही. तर चाट जीपीटीच्या विकसकांनी सार्वजनिक रित्या उपलब्ध असलेली माहिती गोळा करून चाट जीपीटी या सॉफ्टवेअर वर भरलेली आहे. त्यातील माहिती ही विविध पुस्तके, इंटरनेटवरील विविध वेबसाईटवरील मजकूर जसे की विकिपीडिया आणि इतरही अनेक स्त्रोतांपासून घेतलेली आहे.

चाट जीपीटी गुगल सोबत स्पर्धा करेल काय? Can ChatGPT compete with Google?

मित्रांनो चॅट जीपीटी सुरू झाल्यापासून बऱ्याच व्यक्तींच्या मते हे चाट जीपीटी गुगलची स्पर्धा करेल अशी चर्चा आहे, मात्र चॅट जीपीटी आणि गुगल यांची कार्यपद्धती ही पूर्णतः वेगवेगळी असल्याने सर्च इंजिनच्या कार्यात चॅट जीपीटी गुगलला मात देऊ शकत नाही.

              मात्र चॅट जी पी टी वापरकर्त्याच्या भाषेतच त्याच्या प्रश्नांची उत्तरे देत असल्याने अल्पावधीतच त्याच्या युजर ची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. जर चॅट जीपीटीने आपली पूर्ण शक्ती पणाला लावली तर प्रश्नोत्तराच्या बाबतीत मात्र चॅट जीपीटी गुगलला सरस ठरू शकेल, आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम गुगलच्या वापरकर्त्यांच्या संख्येमध्ये दिसू शकेल.

चाट जीपीटी चा भविष्यकाळ कसा असेल? What can be the future of ChatGPT?

मित्रांनो आज  मितीस चॅट जीपीटी मर्यादित वापरास उपलब्ध असले तरी देखील चाट जीपीटीच्या लॉन्चिंग नंतर अवघ्या आठवड्याभरातच त्याला मिळालेल्या प्रचंड यशाने पुढील भविष्यकाळ हा चाट जीपीटी चा राहील असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आज आपल्या प्रश्नोत्तराची धुरा गुगलवर सोडणारे आपण काही दिवसातच चाट जीपीटी च्या नावाचा उदो उदो करू लागलो तर आश्चर्य वाटायला नको.

चाट जीपीटीच्या वापरावरील मर्यादा Limitations on use of ChatGPT

         मित्रांनो कुठलेही तंत्रज्ञान आले की सोबतच त्याच्या मर्यादाही जाणवू लागतात.

         चाट जीपीटीच्या वापरामध्ये देखील काही मर्यादा आहेत. चॅट जी पी टी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित असल्याने ते खोटे मेल लिहिण्यास (ज्याला तांत्रिक भाषेत फिशिंग ई-मेल म्हटले जाते) यामध्ये सक्षम आहे. तसेच याचा वापर करून काही मालवेअर चे कोड देखील लिहिले जाऊ शकतात. जे भविष्यात डोकेदुखीचे कारण ठरू शकते.

           चॅट जी पी टी आपले पूर्वीचे शोध आणि संभाषण  लक्षात ठेवते, ज्याचा वापर आपली वैयक्तिक माहिती मिळवण्यासाठी देखील केला जाऊ शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परिणामी या सॉफ्टवेअर द्वारे सायबर सुरक्षेची देखील मोठी जोखीम निर्माण होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे.

           मित्रांनो वरील माहिती वाचल्यानंतर तुम्हालाही चाट जीपीटी वापरण्याची इच्छा नक्कीच झाली असेल, त्यासाठी तुम्ही https://chat.openai.com/chat   या लिंकचा वापर करून चाट जीपीटी चा वापर करू शकता.

          तर मित्रांनो चाट जीपीटी या विषयावरील ही माहिती आपणास कशी वाटली, हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. तसेच, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रस असणाऱ्या आपल्या इतर मित्र मैत्रिणींना देखील ही माहिती शेअर करण्यास विसरू नका.

 धन्यवाद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button