नवीन पोस्ट्स

Inauguration of the first 🚩temple in Abu Dhabi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अबुधाबी च्या पहिल्या हिंदू मंदिराचे (Inauguration of the first temple in Abu Dhabi)लोकार्पण केले. हे मंदिर मानवतेच्या सामायिक वारशाचे प्रतीक आहे आणि ते संयुक्त अरब अमिरातीने उभारून मानवी इतिहासाचा एक नवीन सुवर्ण अध्याय लिहिला अशी कृतज्ञता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केली.

बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने बांधलेल्या मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी अबुधाबी मधील भव्य मंदिर प्रत्यक्षात आणल्याबद्दल युएइचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद जायद अल नह्यान यांचे आभार मानले. राष्ट्राध्यक्षांनी आखाती देशात राहणाऱ्या भारतीयांसह 140 कोटी भारतीयांची मन जिंकली असे ते म्हणाले. यूएई चे सहिष्णुता मंत्री शेख नह्यान बिन मुबारक नह्यान आणि सर्व धर्मातील आत्यात्मिक नेत्यांचा समावेश असलेल्या एका मेळाव्याला संबोधित करताना मोदी म्हणाले मला आशा आहे की बीएफ मंदिर संपूर्ण जगासाठी जातीय सलोखा आणि जागतिक एकतेचे प्रतीक बनेल. आम्हाला विविधतेत द्वेष दिसत नाही आम्ही विविधतेला आमचे वैशिष्ट्य मानतो या मंदिरात आपल्याला प्रत्येक पावलावर विविध श्रद्धांची झलक पाहायला मिळेल.

Rohit-Jadeja hits century for England | रोहित जडेजाचा इंग्लंडला शतकी तडाखा

आतापर्यंत बुर्ज खलिफा फ्युचर म्युझियम शेख जायेद मशीद आणि इतर हायटेक इमारतींसाठी ओळखल्या जाणाऱ्या आता आपल्या ओळखीत आणखी एक संस्कृतिक अध्याय जोडला आहे. यामुळे युएइमध्ये येणाऱ्या लोकांची संख्याही वाढेल आणि दोन्ही देशांमधील लोकांशी संपर्क वाढेल असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी गेल्या महिन्यात अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचेही स्मरण केले. आज अबुधाबी मधील आलेल्या आनंदाच्या लाटेमुळे अयोध्येतील आमचा अपार आनंद आणखी वाढला आहे.
हे माझे भाग्य आहे की मी प्रथम आयोध्यातील भव्य श्रीराम मंदिराचा आणि नंतर अबुधाबीतील(Inauguration of the first temple in Abu Dhabi) या मंदिराचा साक्षीदार झालो असे ते म्हणाले गेल्या महिन्यातच आयोध्येत भव्य राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले. रामलल्ला त्यांच्या भवनात विराजमान झाले आहेत संपूर्ण भारत आणि प्रत्येक भारतीय अजूनही त्या प्रेमाच्या भावनेत मग्न आहे.हा केवळ भारताचा अमृत कालच नाही तर हा आपल्या श्रद्धा आणि संस्कृतीचा ही अमृत काल आहे असे ते म्हणाले.

एल आयसी सरल पेंशन योजनेविषयी माहिती Lic Saral Pension Plan Scheme Information in Marathi

Shree Ram Mandir abu dhabi
Shree Ram Mandir abu dhabi

दरम्यान, मोदी यांच्या या यूएई दौऱ्यावेळी त्यांनी यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी द्विपक्षीय बैठकी घेतली. दोन्ही नेत्यांनी देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक सखोल, विस्तारित आणि मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण झाली. मोदी हे दुबई येथे होणाऱ्या वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट २०२४ मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button