नवीन पोस्ट्स

मसाला व्यवसाय: Masala Business Idea

नमस्कार मित्रांनो, भारतीय मसाले हे भारतासह जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या स्वयंपाकी वस्तूंपैकी एक आहेत. अगदी इतिहासात देखील युरोपीय व्यापारी भारतात मसाल्याच्याच व्यापाराच्या निमित्ताने आले होते.  भारतीय मसाला मार्केट दरवर्षाला ₹४० हजार कोटींपेक्षा देखील अधिक वाढत आहे. म्हणूनच जर तुम्ही भारतामध्ये मसाला व्यवसाय कसा सुरू करण्याचा  व मसाला व्यवसायातून नफा कमावण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. आजच्या भागामध्ये आपण मसाला व्यवसायातील सर्व बारकाव्यांसह नफा तोटा खर्च उत्पन्न इ. बाबींबद्दल इत्यंभूत माहिती बघुयात.

 
मसाला व्यवसायाची गणिते Statistics of Masala business

भारतामध्ये मसाला उद्योगाचे नफ्याच्या/मार्जिनच्या प्रमाणानुसार साधारणपणे खालील तीन प्रकार पडतात

  1. मसाला उत्पादन व्यवसाय –  60% – 70% नफा मार्जिन
  2. मसाला घाऊक विक्री व्यवसाय –  40% – 50% नफा मार्जिन
    3.मसाला रिटेलिंग व्यवसाय-  20% – 30% नफा मार्जिन

 म्हणून, इथे एक गोष्ट स्पष्ट होते की मसाला व्यवसाय हा नक्कीच  सर्वात फायदेशीर  व्यवसायांपैकी एक आहे ज्यामध्ये  आपण कमी गुंतवणूकीतून आणि  कमी  वेळेत चांगले उत्पन्न निश्चितच मिळवू शकतो.

मसाला व्यवसाय कसा करायचा पहाण्यासाठी

येथे क्लिक करा

मसाला व्यवसायातील नफा-तोट्याचे गणित Profit loss in masala business

 मित्रानो, आपण मसाला व्यवसाय वर नमूद प्रकारांपैकी कुठल्या प्रकारचा करत आहात यावर याचे नफ्याचे गणितं बदलतात. मसाला व्यवसायामध्ये सरासरी अंदाजित नफा 40%-50% इतक्या प्रमाणात आहे. 
 समजा, जर तुमची दररोज अपेक्षित विक्री 100 kg असेल आणि  त्याचा  नफा 40% असेल व खरेदी केलेल्या वस्तूंची किंमत रु.100/kg असेल तर, 100 किलो x रु. 100 + 40% नफा मार्जिन म्हणजेच तुम्हाला रु. 14,000 दररोजचे मिळतील.
 नफा मार्जिन जोडल्यानंतर विक्री केलेल्या मालाची किंमत प्रति किलोला रु. 140 इतकी होईल. पैकी तुमचा खर्च वजा जाता तुम्हाला रु. 4,000 इतका निव्वळ नफा मिळेल, आणि याप्रकारेच तुम्ही उत्पादनाच्या प्रमाणावर भरघोस नफा मिळवू शकाल. त्यानुसार तुमचा महिन्याचा मसाला व्यवसायातील निव्वळ नफा रु. 1,20,000 इतका असेल.

मसाला व्यवसायाकरिता आवश्यक गुंतवणूक Investment required to start a new masala business

मित्रानो, प्रथमतः, बेसिक व्यवसाय सुरू करण्याकरिता, तुम्हाला काही पैसा नक्कीच गुंतवावा लागणार आहे. जो एकतर तुमच्याकडे आधीच वैयक्तिक बचतीच्या स्वरूपात असू शकतो किंवा तुम्ही बाहेरूनही कर्ज अथवा उसनवारीच्या माध्यमातून हा पैसा उभारू शकता. तुम्ही खालील स्त्रोतांकडून पैसा उभारू शकता.

  1. गुंतवणूकदार
    2.उद्योग भांडवलदार
    3.व्यवसायिक बँक कर्ज
  2. व्यवसाय उष्मायन निधी
    5.NBFC च्या सरकारी योजनांमधून स्टार्टअप कॅपिटल

मित्रहो, मसाला व्यवसायासाठी   किमान खेळते भांडवल  रु. १ लाख ते रु. 5 लाखरुपयांपर्यंत  आणि किमान  निश्चित किंवा फिक्स भांडवल  रु. 6 लाख ते रु. 10 लाख.  गरजेचे असते.
 
पैशांची आवश्यकता ही मुख्यतः तुमच्या व्यवसायाच्या प्रमाणात अवलंबून असते. व्यवसाय सुरू करताना तुमची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे  तुमच्या ब्रँडची ओळख संरक्षित करणे  आणि तुमच्या व्यवसायाची सरकार दरबारी नोंदणी करणे होय. या होष्टी लक्षात घेता,  कंपनी नोंदणी  आणि ट्रेडमार्क नोंदणीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करणे आजकाल अगदीच सोपे झाले आहे. 

मसाला व्यवसायकरिता जागेची आवश्यकता Space required for Masala business

वरील गोष्टींचा प्रारंभिक गुंतवणूक म्हणून जर विचार केला तर मसाला व्यवसायासाठी किमान जागा ७०० चौरस फूट आवश्यक असते.
 जर तुम्ही जमीन भाड्याने घेत असाल तर त्यासाठी प्रत्येक महिन्यासाठी किमान  रु. 15,000 (अंदाजित) भाडे आकारले जाईल. परंतु, जर तुम्ही स्वतःची जागा विकत घेण्याचा विचार करत असाल तर शहरानुसार जागेचे दर हे वेगवेगळे असतील. म्हणून या निर्णयासाठी प्रॉपर्टी डीलरचा सल्ला घेणे उचित ठरेल.

आवश्यक जागेचे व्यवसायानुसार वर्गीकरण
1.किरकोळ मसाला व्यवसाय –  700 ते 1000 चौ.फू 
2.घाऊक मसाला व्यवसाय –  200 ते 300 चौरस फूट ऑफिससाठी  आणि 1000 चौरस फूट गोडाउन साठी
3.मसाला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट – किमान  2000 चौरस फूट 
मोठया प्रमाणावर व्यवसाय करताना नेहमी व्यवसाय सल्लागाराचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा, तसेच योग्य इंजिनियर कडून पूर्ण प्लांटची लेआऊट तयार करून घ्यावी.
तसेच, मसाला व्यवसाय खाद्य व्यवसायात मोडत असल्याने व्यवसाय सुरू करताना तुम्हाला काही अनिवार्य परवानग्या घेणे बंधनकारक असेल.

मसाला व्यवसायासाठी आवश्यक मनुष्यबळ Manpower required for Masala business

मित्रहो, व्यवसाय सुरू करण्याकरिता तुम्हाला  सुरुवातीस 10 ते 12 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल.
 यानुसार तुम्हाला सुरुवातीला सुमारे रु. 1,70,000 मनुष्यबळावर गुंतवणे क्रमप्राप्त राहील.

नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न FAQ

प्रश्न 1:दररोज 100 किलो मसाले विकण्यासाठी काय करावे?

उत्तर: आपण दररोज 100 किलोपेक्षा जास्त मसाले सहज विकू शकता. त्यासाठी तुम्हाला बाजारातून डीलरशिप शोधावी लागेल आणि ती मिळवावी लागेल. उदाहरण सांगायचे झाल्यास तुम्ही भारतात कोठेही व्यापार करत असाल अन, (जेथे मसाले विकणारी हजारो दुकाने आणि किराणा दुकाने आहेत.) जर तेथे तुम्हाला  दररोज 10 किलो मसाल्याच्या 30 दुकानांमधून डीलरशिप मिळाली तर तुम्ही  दररोज 300 किलो मसाल्याची विक्री अगदी आरामात करू शकता . तसेच, जवळपासची गावे, सोसायट्या आणि सुपरमार्केट यांना देखील लक्ष्य करावे लागेल. याशिवाय, ब्रँड जागरूकता निर्माण करण्याकरिता तुम्ही काही कार्यक्रम आयोजित करून तुमची विक्री वाढवू शकता.

प्रश्न 2: वर्षानुवर्षे मसाल्यांच्या मागणीमध्ये वाढ कशामुळे झाली आहे?

उत्तर: वाढते  शहरीकरण,  उत्पन्नामधील सुधारणा  आणि  वाढती आर्थिक स्थिरता या गोष्टीमुळे प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांची मागणी वाढत चालली आहे. शिवाय, भारतीय संस्कृती आणि पाककृतींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भारतीय खाद्यपदार्थांच्या विशेष निर्मितीसाठी मसाल्यांच्या मागणीत वाढ झालेली दिसून येते.

प्रश्न 3: जागतिक स्तरावर मसाला उद्योग किती फायदेशीर आहे?
उत्तर: 2020 या आर्थिक वर्षात जागतिक मसाला उद्योगाचे सरासरी मूल्य 15.44 अब्ज अमेरिकी डॉलर इतके होते. एका अंदाजानुसार, 2027-28 या आर्थिक वर्षामध्ये ते सुमारे 22.46 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर 2021 ते 2027 मध्ये मसाला व्यवसायात 6.3% CAGR ची वाढ होणार

मसाला व्यवसाय कसा करायचा पहाण्यासाठी

येथे क्लिक करा

प्रश्न 4: मसाला व्यवसायातील नफा वाढवण्याचे 5 मार्ग कोणते सांगता येतील? 
i) लोणचे, चटण्या आणि स्नॅक्स बनवण्यासाठी हे मसाला औद्योगिक युनिटला विकू विकणे.
ii)केवळ देशांतर्गत बाजारपेठच नाही तर विदेशी बाजारपेठही चांगल्या दर्जाच्या मसाला उत्पादनांसाठी नेहमीच खुली आहे. म्हणून, आपण मसाले निर्यातही करू .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button