मनोरंजन

The Sweetness of Bengal Hemant Kumar (part-1) | बंगाली मिठाईची मिठास – हेमंत कुमार

गायक संगीतकार म्हणून हेमंत कुमार(The Sweetness of Bengal Hemant Kumar) यांचा दर्जा वरचा होता. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये काही संगीतकार गायकही होते.सी रामचंद्र हे स्वतःच्या आवाजाच्या प्रेमात होते. पण अर्थातच त्यांची काही गाणी इतरांनी गायली असती तर जास्त चांगलं झालं असतं असं वाटत राहतं. विशेषतः तलत मेहमुद यांनी गायली असती तर.
सी रामचंद्र संगीतकार म्हणून अर्थात महान होते.

मदन मोहनने सुरुवात गायक म्हणून केली. पण त्याला स्वतःच्या गळ्याच्या मर्यादा ठाऊक होत्या. त्यामुळे तो गायक व्हायच्या भानगडीत पडला नाही. त्याने आपलं संगीत लतादीदींच्या स्वर्गीय आवाजाच्या चरणी वाहिलं .
रवीला गायक व्हायचं होतं. पण महमद रफीने त्याला शहाणं केलं. आणि तो संगीतकार झाला .
मन्ना डेनी काही सिनेमांना संगीत दिलं. पण त्यांचा खरा पिंड हा गायकाचा.
बर्मन दादा बंगालीत मोठे गायक होते. पण त्यांना ठाऊक होतं की आपला आवाज हा हिरो साठी नाही. त्यामुळे त्यांनी हिंदीत, प्रसंगाला हातभार लावणारी चार दोन गाणी गायली.

पण हेमंत कुमार हे दादा गायक होते. किंबहुना हेमंत कुमारची गाणी म्हटल्यावर आपल्याला फक्त त्यांनी संगीत दिलेली गाणी आठवतात असं नाही. त्यांनी इतरांकडे गायलेली गाणीही आठवतात. त्यांनी त्यांची बहुसंख्य गाणी स्वतःच्या चित्रपटात गायली. पण स्वतः गायक असले तरी रफी,किशोर , तलत यांना सुद्धा गणी दिली. खामोशीच्या वेळी राजेश खन्नाने त्यांना सांगितल. “दादा हमारा गाना किशोर से गवाईये.” तो सिनेमा सुरू झाला तेंव्हा राजेश खन्ना हा मोठा नट नव्हता. तो 1969 चा चित्रपट आहे. त्यांना राजेश खन्ना खूप आवडायचा . राजेश खन्ना त्यावेळेला कलकत्त्यात रहायचा. तो हेमंत कुमारना सांगायचा,” दादा हमारे घर नही आना. सिगरेट दारू सब यहा होता है. आपके सामने वो अच्छा नही लगता.” खामोशी मध्ये राजेश खन्नाचं त्यांनी ऐकलं आणि किशोरला , वो शाम कुछ अजीब थी, हे गाणं दिलं. ते गाणं तुफान गाजलं.

Golden Voice of Hemant Kumar

हेमंत कुमार यांचा जन्म 1920 सालचा. घरची परिस्थिती बेताची होती. हेमंत दादांचा कल संगीताकडे होता. त्यांच्या वडिलांना असं वाटायचं की हेमंतदानी शिकावं. मोठं व्हावं. तेराव्या वर्षी हेमंतदांनी रेडिओवर गाणं गायलं. ते हुशार विद्यार्थी होते. मॅट्रिकला त्या काळात ते पहिल्या वर्गात पास झाले .पुढे इंजिनिअरिंगच्या चार वर्षाच्या डिप्लोमा कोर्सला गेले. संगीत त्यांना त्यांच्याकडे खेचत होते. वडिलांच्या मनाविरुद्ध त्यांनी इंजिनिअरिंग सोडलं. त्यावेळेला त्यांची तिसरी रेकॉर्ड बाजारात आली. पोट भरण्यासाठी त्यांनी गाण्याच्या शिकवण्या केल्या. ते स्वतः लांब चालत जाऊन संगीत शिक्षकांकडून संगीताचे धडे घेत. 1940 नंतर त्यांनी हळूहळू बंगालीत त्यांचं बस्तान बसवलं.

IPL will be played in India | आयपीएल भारतामध्येच रंगणार

श्रीमंतांच्या दिवाणखान्यातून त्यांनी रवींद्र संगीत, सामान्य माणसाच्या ओठावर आणलं.1951 साली फिल्मिस्तानच्या शशधर मुखर्जी यांनी त्यांना पंधराशे रुपये महिना पगारावर फिल्मिस्तान मध्ये आणलं . आनंदमठ हा सिनेमा दिला. शशधर मुखर्जी यांना लताचा आवाज फारसा आवडायचा नाही. जगात काही विचित्र माणसं असतात, त्याचा हा दाखला आहे. पण वंदे मातरम या गाण्यासाठी हेमंतदानी मुखर्जी ना सांगितलं “मला लता हवी ” मुखर्जी चक्क हो म्हणाले. हेमंतदादा त्यावेळी लतादीदींना ओळखत सुद्धा नव्हते. ते तिच्या थेट घरी गेले. त्यांनी लतादिदीना स्वतःची ओळख करून दिली. आणि गाणी गायची विनंती केली. लता फिल्मिस्तान मध्ये आली. वंदे मातरम या गाण्याचे 35 रिटेक मुखर्जी यांनी घेतले .पण लता गातच राहिली. हेमंतदादा म्हणतात, ” वंदे मातरम मी लहानपणापासून अनेकदा ऐकले पण लताने गायल्यावर मला त्या गीताचा नीट अर्थ उमगला.,” तिथून लता मंगेशकर हेमंत कुमार ही जोडी जमली ती शेवटपर्यंत. पुढे 40 सिनेमात त्यांनी लता कडून 139 गाणी गाऊन घेतली. त्यात 105 सोलो आहेत.

महिला उदयोगिनी योजनेविषयी माहीती Mahila Udyogini Scheme Information In Marathi

फिल्मिस्तानच्या शशधर मुखर्जीची संगीताबद्दलची मत ठाम असत. पण ओ पी नय्यर म्हणत “शशधर मुखर्जीना प्रेक्षकांची नाडी अचूक कळत असे.”

त्यांची पद्धत अशी होती. संगीतकाराने गाणं तयार करायचं. त्यावेळी फिल्मिस्तानसाठी अनेक संगीतकार काम करत. ते आराम खुर्चीवर बसत. त्यांना संगीतकार आपापल्या चाली ऐकवत. काही वेळा ते झोपी सुद्धा जात. संगीतकारांच काम साडीच्या दुकानदारासारखं होतं. म्हणजे तो न थकता महिलांना साड्या दाखवतो आणि विकत घेणाऱ्या महिलेला साडी पसंत पडली की तो स्वतःच्या पाठीवर थाप मारून घेतो. मुखर्जी महिलांपेक्षा जास्त चोखंदळ होते. एका सिनेमाच्या वेळी हेमंत कुमार(The Sweetness of Bengal Hemant Kumar) त्यांना एक महिनाभर, चाली ऐकवत होते. शेवटी त्यांना एक चाल पसंत पडली. पण ती चाल काय होती! गाणंच सांगतो.
” न ये चांद होगा
ना तारे रहेंगे
मगर हम हमेशा
तुम्हारे रहेंगे “.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button