आरोग्य

आयूष्य असते तरी काय ?

प्रत्येकाला कधी कधी ना हा प्रश्न पडलाच असेल की आयुष्य आहे तरी काय ?

आपल्याला या जीवनात येउन काय करायचे असत…? आपल्या आयुष्याचे ध्येय काय आहे ? आपला जन्म का झाला आहे ? आपला मृत्यू झाल्यावर आपण कुठे जातो ? आपले जीवन या पृथ्वी पुरतेच मर्यादेत आहे का की अजून काही असते जीवनात ? आपल्याला देवाने निर्माण केले असेल तर मग काही तरी कार्य करण्यासाठीच आपली निर्मिती झाली असेल. आपला निर्माता कुठे असेल ?

का फक्त ५० ते ६० वर्ष या पृथ्वी वर जगण्यासाठीच आपला जन्म झाला आहे का ? आयुष्य असते तरी काय…?

वयाची २८ वर्ष पूर्ण झाली तरीही मला माझे ध्येय मला समजले नाही. मी या भौतिक जीवनातील ध्येयाबद्दल नाही बोलत. आपले खरे ध्येय काय आहे हे मला समजले नाही. आणि कोणाला समजले असेल तर ते माझ्या पर्यंत आले नाही. मला सतत हा प्रश्न पडत राहतो की आपल्या जन्मामागे नक्की काय हेतू असेल..? का आपली निर्मिती झाली आहे.

काही तरी यामागे कारण असेल ना, का उगाच आपला जन्म झाला आहे. का विशिष्ट असा हेतू या मागे नक्कीच असेल असे मला कधी कधी वाटते.

आयुष्य म्हणजे जन्म घ्यायचा, आई-वडील लहानापासून तूम्ही मोठे होई पर्यंत काळजी घेतील. त्याच्या नंतर तूम्ही पैसे मिळवण्यासाठी काहीतरी कार्य करणार. तसेच काही जणांना कार्य  करताना आनंद पण मिळत असेल ते  कार्य ते करणार,आणि शेवटी मृत्यू हे अस आयुष्य जगायचा असते का ?

काही जण आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगतील, प्रत्येक क्षणाला हसत खेळत जगतील. आणि एक दिवस आपला निरोप घेतील. त्यांच्या असंख्य आठवणी आपल्या बरोबर जोडल्या जातील. म्हणजे या जीवनात आपण प्रवेश करायचा, जेवढा आनंद लूटता येईल तेवढा आनंद घ्यायचा, आणि हे जीवन सोडून जायचे. हाच हेतू आहे का आपल्या जन्माचा ?

लोक काही आहे अशे असतात या जीवनात प्रवेश करतील, एखाद्या कार्यात झोकून देतील, नवे नवे शोध लावतील, आपली प्रगती होईल. त्यांना काही पैसे जास्त प्रमाणात मिळतील. ते  पूर्ण पृथ्वीतील गोष्टीचा स्वाद घेतील. खूप आरामदायी जीवन जगतील, खूप जणांना त्यांच्या पासून प्रेरणा मिळेल. त्यांचा कार्याचा गौरव होईल, आणि एक दिवस ते पण या पृथ्वी चा निरोप घेतील.

काही जण तीन वेळेचे जेवण मिळवण्यासाठी दररोज कष्ट करतील, एका शहरात राहून पूर्ण आयुष्य ते आनंदाने घालवतील.

काही जण समाधानी राहून येणाऱ्या संकटांना तोंड देत आपले आयुष्य जगतील..

अरे पण खर आयुष्य म्हणजे आहे तरी काय ? 

तूमचा जन्म झाला आहे याचा अर्थ तूम्ही मरणार हे तर सर्वांनाच माहित आहे. या प्रवासामध्ये तूम्हाला प्रत्येक अवस्थेमधून तर जावेच लागते. हे तर आजूबाजूच्या सर्वं आपल्या मनुष्य जातीच्या आयुष्याकडे बघून आपण म्हणू शकतो. आणि जात असताना तूम्हाला भरपूर गोष्टीचा अनुभव येत राहील. या आयुष्यामध्ये आपले ध्येय काय आहे हे कधी आपल्याला माहीत होणार का आपले कोणतेच ध्येय नाही.

का आपला जन्म फक्त या पृथ्वी चा स्वाद घेण्यासाठी झाला आहे का..जेवढा आनंद घेता येईल तेवढा आनंद आपल्याला घ्यायचा आहे का.

मी पाहिलेले लोकांचे जीवन

१. काही लोक खूप पैसे कमवतात, कष्ट करतात, खूप चैन करतात, प्रत्येक क्षण आयुष्याचा आनंदाने जगतात.

२. खूप मेहनत घेतात, सतत तणावाखाली जगतात, पैसे पण कमवतात, पण सतत तणाव.

३. कमी पैसे कमवतात, समाधानी राहतात.

४. काही कमी पैसे कमवतात, दु:खी राहतात.

५. लागेल तेवढा पैसे कमवतात, समाधानी, आनंदी राहतात.

६. खूप पैसे कमवतात आणि समाजसेवा पण करतात.

अशा वेगवेगळे लोकांचे जीवन मी पाहिलेले आहे. प्रत्येक जण या आयुष्यातील ध्येय प्राप्त करण्यात व्यस्त आहे. पण हे भौतिक जीवनामधील घ्येयच आपले खरे ध्येय आहे का ?

काही लोकांचे जीवन समाजकार्य करण्यात जाते, मग हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे का ?

काही लोकांचे जीवन देवांचे नाव घेण्यात जाते. मग हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे का ?

काही लोकांचे जीवन मोक्ष मिळवण्यासाठी जाते. मग हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे का ? का या पृथ्वीवर जीवंत राहण्यासाठी चार पैसे कमवणे, चार गोष्टी खरेदी करणे, माणसं आपलीशी करणे, समाजात प्रतिष्ठा निर्माण होईल. अशा प्रकारे काम करणे, हसत खेळत राहणे, मौज करणे, सेवा करणे, देवाचे नाव घेणे, प्रगती करणे भौतिक जीवनात. हे म्हणजे आयुष्य असते का ?

आयुष्य असते तरी काय हे जर तूम्हाला समजले तर मला नक्की सांगा…

लेखक : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button