सतत अभ्यास करत असताना कधी कधी विचार येतो की आपण पण चार पैसे कमवण्यासाठी बाहेर पडायला पाहिजे.
आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे, पण घर सुटत नसल्यामुळे मी आसपासच कुठे नौकरी मिळते का ते बघत असतो.
कधी मग शिक्षकाची नौकरी तर कधी स्वत:चा उदयोग सुरु करण्याचा प्रयत्न करत असतो. मग काही कारणास्तव त्या नौकरीचा मी त्याग करतो, तो मी उदयोग मी सोडुन देतो.
जेव्हा मी अशा नौकरी उस्मानाबाद/धाराशिव मध्ये शोधण्यांचा प्रयत्न करतो
तेव्हा मला प्रत्येक वेळेस एकच अनुभव येतो तो म्हणजे माझी त्या ठिकाणी निवड होते.
पण पगाराबद्दल जर तूम्हाला सांगितले तर तूम्हाला हसू येईल, कोणत्याही संस्थेत जा, कोणत्याही कंपनी मध्ये जा.
कोणत्याही उदयोगामध्ये जा आमच्या शहरात सुरुवातीला एवढी कमी पगार देतात की आपल्याला कधी कधी असा प्रश्न पडतो की आपण याचा पगाराच्या लेवल चे आहोत का ?
सुरुवातीचा पगार किती असावा ?
हे महागाईवर अवलंबून असायला हवे, तरीही सुरुवातीचा पगार कमीत कमीत एखादयाच्या किमान गरजा भागवण्याऱ्या असाव्या.
सरकारी नौकरी मध्ये किमान वेतन कायदा अस्तित्वात आहे.
त्यामुळे प्रत्येक सरकारी कर्मचारी सदस्यांना कमीत कमीत १८००० रुपये महिना पगार असतो म्हणजे असतो, शिपाईचा पगार कमीत कमीत १८००० रूपये आहे..
खासगी मध्ये हा किमान वेतन कायदा का लागू नाही..
ब्रिटीश आणि या खासगी वाल्यामध्ये काय फरक आहे वेतनाच्या बाबतीत, खासगी कंपन्या असतील, तसेच खासगी शाळा असतील यांनी किमान वेतन म्हणजे त्या माणसाच्या मुलभूत गोष्टीचा लाभ त्या माणसाला घेता यावा एवढा तरी पगार असणे गरजेचे आहे..
खासगी मध्ये दिवसाच्या ८ ते ९ घंटे दयायचे आणि पगार केवढा तुंटपुंजा.. कसे जगायचे त्या व्यक्तीनी, किमान अन्न ,वस्त्र, विज, पाणी, घरपट्टी आणि घर नसेल तर घरभाडे या सर्वगोष्टीला लागणारा खर्च निघण्याएवढी तरी पगार असायला हवा..
एखादा व्यक्ती चे शिक्षण असो वा नसो कमीत कमीत या मूलभूत गोष्टी वर खर्च करण्या इतपत पगार असणे गरजेचे आहे..
सोशल मिडिया वरती आमच्या परम मित्राने एका शाळेची जाहिरात मला पाठवली मग काय ?
असेही सरकार जागा काढत नसल्यामूळे मी पण जरा वेगळे काहीतरी करावे. आणि चार पैसे पण येतील या हिशोबाने त्या ठिकाणी मूलाखती साठी गेलो , परिसर चांगला होता, समोर मुलाखत घेणाऱ्या व्यक्ती सुध्दा खूप प्रेमळ आणि मदत करणाऱ्या होत्या.
माझा डेमो झाला काही मिनिंटांचा ,त्यांच्या तील एकजण म्हणाले की ठिक आहे.
मुलांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल म्हणून त्यांनी मला तूम्ही उदया पासून या , आमच्या शाळेत जॉईन व्हा.
असे त्या म्हणाल्या ,आणि आमची पगारा बद्दल चर्चा झाली.. मग काय त्यांनी जी पगार सांगतिली ती एकून मी निराश झालो.
अजून थोडा वेळ चर्चा केल्यानंतर त्यांना सांगितले की मी ज्या ठिकाणाहून तूमच्या शाळेत येण्यासाठी मला पेट्रोल चा खर्च होईल मग त्यांनी पण काही रक्कम वाढवली..
मला दु:ख झाले तरिही मी मॅडम ला नाही म्हंटलो नाही कारण त्यांना मला दु:खवायचे नव्हते,
पण घरी आल्यावर घरच्यांना सांगितले अशी अशी शाळा आहे.
आणि त्या शाळेवर मी उदयापासून शिकवायला जाणार आहे, हे एकून घरच्यांना बरे वाटले पण पगार विचारल्यावर परत नाराजी की ,तेवढयात ताई आली.
आणि म्हंटली की जो दररोज कामाला जातो ,कष्ट करून खातो तो ,मजूरी करतो तो सुध्दा आरामात चार पैसे बाजूला सारून जगतो. किमान त्याच्या एवढी तरी पगार असायला हवी..तूझ्या शिक्षणाचा उपयोग काय, वडिलांचे पण हेच मत आले .
किमान तूझ्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी जेवढे पैसे लागतील तेवढी पगार कमीत कमीत असावी..
हे सर्व एकून मला मॅडम ला नकार कळवावा लागला…तात्पर्य हेच आहे की…
शिक्षण असुन तेवढी क्षमता असुन ,काम करण्याची वृत्ती असून ,मिळेल ते काम करयाची आमची तयारी असून सूध्दा ,आम्हाला अशी कमी पगार का ?
आम्हाला अशी कमी पगार का ?
हा प्रश्न नेहमी माझ्या मनात येतो, मग याच्यावर मला वाटते सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज आलेली आहे.
खासगी संस्थेमध्ये सुध्दा कमीत कमीत किमान वेतन कायदा लागू करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जर एखादया व्यक्ती तूमच्या कडे ९ घंटे आयुष्यामधील देत असेल.
तर कमीत कमी त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी लागणारा पैसा त्याच्याजवळ असण्यासाठी तेवढा पगार असणे गरजेचे आहे..
लेखक : राम ढेकणे