सामाजिक

आध्यात्मिक ज्ञान कधी घ्यावे लहाणपणापासून की वृध्दकाळापासून / उतारवयापासून    

संध्याकाळचे ५ चा वेळ झाली हाती, सूर्यदेवतेचे दर्शन नाही झाल. प्रचंड ढगाळ वातावरण, थंडी जाणवत होती. वारा सुटला होता, पाउस संत गतीने पडत होता. नेहमी प्रमाणे महाराजांचे प्रवचन चालू झाले. एकतास वेळ निघून गेला ते कळालेच नाही. एवढे मग्न् होउन महाराजांचे प्रवचन ऐकले. नेहमी प्रमाणे महाराजांनी तिन चार विषयाला हात घातला. आज सगळ प्रवचन कर्म या विषयाच्या भोवती होते. तसेच त्यांच्या विचारानुसार भगवत गीतेचा आधार घेउन त्यांनी वेडयासारखे कोणत्याही विषयाच्या मागे धावू नका. पैशाच्या मागे धावू नका, पैसा तुमच्या कडे आला पाहिजे. यामध्ये पण माझे आणि त्यांचे मतभेद आहेच. पण तो विषय नंतर घेउ.

प्रवचन संपल्यावर आम्ही सगळे अभ्यासिके मध्ये गेलो. एक सफरचंद टेबला वरती होता त्याचा स्वाद घेत आमचा म्हणजे बूबा, वकील साहेब, प्रमोद, अमित, संतोष, प्रसाद, सुहास, गौरव, सुशिल, शुभम आणि सुशिल चा भाउ. या सर्वांबर चर्चा चालू झाली की आध्यात्मिक ज्ञान हे कधी घेतले ‍पाहिजे ? 

पहिल्यांदा मी माझा विषय मांडला की आध्यात्मिक ज्ञान हे लहानपणापासून घ्यायला हवे. त्याच्या शिवाय तुम्ही उच्च ध्येय गाटू शकत नाही. बाकी विचारवंतापैकी एक जणांने मत मांडले की अगोदर पायावर उभा रहायचे आणि नंतर आध्यात्मिक मार्ग निवडायचा. कारण पायावर उभे राहताना, अभ्यास करताना आध्यात्मिक ज्ञान कशाला घ्यायचे, वेळ वाया जाईल. थोडेसे स्मित हास्य करत मी म्हणालो आध्यात्म काय असते हे तुम्हाला कळालेच नाही.. देवाचे नाव घेणे म्हणजे आध्यात्म हे तुमच्या डोकयातून काढून टाका..

आघ्यात्मिक शिकवण काय आहे, आध्यात्मिक शिकवण देणा-या पुस्तकामध्ये काय दिले आहे. याचा निट अभ्यास करा मग समजेल तुम्हाल आध्यात्मिक ज्ञान आत्मसात करण्याचा फायदा. आध्यात्मिक ज्ञान घेतल्या वर तुमचे ध्येय कसे प्राप्त करायचे ?याची शिकवण म्हणजे आध्यात्मिक ज्ञान होय. तुम्ही तुमचे जीवन जगत असताना कोणत्या चूका करू नये, काय करावे, काय करू नये. लवकरात लवकर घ्येय प्राप्त करण्‍यासाठी काय करावे, मन कशे शांत ठेवावे, एकाग्र मन कसे करावे,कोणत्या वातावरणात आपण रहावे, आपल्या बौध्दीक क्षमतेचा विकास कसा करावा, कोणत्या गोष्टी ला किती महत्व दयावे.

राग, लोभ, वासना, अहंकार याच्या वर विजय कसा मिळवायचा, संकटावर विजय कसा मिळवायचा, जीवनात प्रगती कशा प्रकारे करायची. अभ्यास करताना एखादया विषयाचे चिंतन कशा प्रकारे करायचे. या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी देवाचे नामस्मरण, यासारख्या अनेक गोष्टीचा अभ्यास म्हणजे अध्यात्मिक ज्ञान प्राप्त करणे होय. 

चला तर आमचे मित्र सांगतात तसे आपण जर उतारवयामध्ये या विषयामध्ये रूची दाखवली तर काय होईल.

तेव्हा आपल्याला एकच गोष्ट कामाला येईल ते म्हणजे देवाचे नामस्मरण करणे. कारण इतर दिलेल्या ज्ञानाचे आपल्याला त्यावेळेस काहीच उपयोग होणार नाही. पण तेवढयापुरते आध्यात्मिक ज्ञान नाही. आपण जीवन जगत असताना येणा-या संकटावर विजय कसा मिळावयचा हे त्यामध्ये सांगितलेले आहे, शत्रु निर्माण झाले तर त्या बरोबर कसा व्यवहार करायचा ? हे त्यामध्ये आहे, म्हणजे जीवन जगत असताना व आपले ध्येय प्राप्त करताना. आपले खरे ध्येय काय आहे हे जाणीव करून घ्येण्यासाठी आपल्याला तरूण वयामध्ये याची ओळख होउन, यामधील सर्व गोष्टीचे आकलन करणे गरजेचे आहे.

उतारवयामध्ये या गोष्टी समजून तरी तूम्ही त्याचा उपयोग कुठे करणार. आता पासून जर आध्यात्मिक ज्ञानाचा जीवनामध्ये आमल केला तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. याच्या एकाने चार पायऱ्यामधून आपल्याला जायचे आहे  याची जाणीव करून दिली. पहिला म्हणजे ब्रम्हचर्याश्रम, दुसरा गृहस्थाश्रम, तिसरा वानप्रस्थ, चौथा संन्यास. पण मी माझ्या मतावर ठाम  राहिलो. तुम्ही लवकरात लवकरात आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करा  आणि आपले ध्येय काय आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा.                   

लेखक : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button