जागतिकशासकीयशिक्षणशेतीसामाजिक

आपलेच दात आपलेच ओठ

आपले आयुष्य किती वर्षाचे असेल ते आपल्याला साधारण माहित आहे की सरासरी ७८ ते ८० वर्ष आपण जगत असतो. काही जण लवकर या जगाचा निरोप घेतात तो भाग वेगळा. पण जसे आपले काही प्रमाणात आयुष्य आपल्या हाती आहे त्या प्रमाणे एखादया झाडाने किती वर्ष जगावे हे आपण ठरवायचे का ?

समजा एखादयाने काही वर्षापूर्वी एखादे झाड लावले आणि आता त्या व्यक्तीला वाटले की हे झाड तोडायला पाहिजे कारण याची अडचण होत आहे. म्हणून, हा अधिकार आपल्याला कोणी दिला की एखादया झाडाने किती वर्ष जगायचे ते ठरवण्याचा? काही झाडे आपण आपल्या खाजगी जागे मध्ये लावतो त्याची काळजी घेतो, आणि आता आपल्याला असे वाटले की आपण आता या जागी दुसरे झाड लावले पाहिजे. किंवा त्या झाडाचा आपल्याला त्रास होत असेल म्हणून तोडत असू पण तो तोडण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला..?

आपल्याला जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे हे मान्य आहे पण याचा अर्थ असा होत नाही की आपण निसर्गामधील काही गोष्टी वर अन्याय करण्याचे स्वातंत्र्य आहे. 

झाडांना त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाहीत, आपल्या सारखे बोलता येत नाही, आपल्या सारखे एका ठिकाणाहून दूस-या ठिकाणी जाता येत नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की आपण त्याचा वापर आपल्या मर्जींनुसार करणार..

आपल्या विकासासाठी आपण त्यांच्या स्वातंत्र्यावर का गदा आणत आहोत, याचा आपण विचार केला पाहिजे.

काही जण मांस खातात काही जण खात नाही पण झाड तोडणे हे एक प्रकारे एका सजीवाची हत्याच झाली ना..काही जण मानतात की आम्ही मांस वगैरे खात नाही. आम्ही हिंसा करत नाही, कोणाचा जीव आम्ही घेत नाही. पण आजूबाजूचे झाडे जे सजीव आहेत त्यांची आपण बिनधास्त हत्या करतो तेव्हा ‍हिंसा केली तर चालेल म्हणजे कुठे कूठे हिंसा केली तर चालेल आणि कुठे कुठे हिंसा केली न पाहिजे असे कसे चालणार..

आपल्या राज्य सरकारने १९६६ ला कायदा केला आहे आणि त्यानुसार झाडे तोडण्यास परवाणगी कधी दिली जाते ते 

१. जर झाड वाळलेले असेल आणि त्याची आता वाढ होत नसेल तर. 

२. त्या झाडामुळे तूमच्या जीवाला धोका जाणवत असेल, पावसाळयात ते झाड तूमच्या घरावर पडण्याची शक्यता असेल. 

३. झाडामुळे जर तूमचे पीक येत नसेल तर

सागाचे झाड असेल, चंदन असेल, जांभूळ, आंबा, फणस, चिंच, बीजा, अंजन, हिरडा, अशा अनेक झाडांना तोडण्यास बंदी घालण्यात आली आहे.

विकास करण्याच्या नावाखाली जर झाडांची कत्तल आपणच करणार असाल तर एक दिवस फक्त आजूबाजूला इमारती, रस्ते, कार, इलेक्ट्रॉनीक वस्तू च आपल्या आसपास असतील आणि आपल्याला श्वास घेण सुध्दा मुश्कील पडेल..

काही जणांचा असा विचार आहे की आम्ही येथे एक झाड तोडले म्हणून काय झाले आम्ही काही वर्षापासून हजारो झाडे लावले आहेत. अशा लोकांना मला एवढेच सांगणे आहे की तूम्ही झाडे लावलीत त्या साठी तूमचे खरच अभिनंदन आणि अशीच झाडे लावत रहा. पण याचा अर्थ असा होत नाही की मी जन्म दिला म्हणून मीच मारणार. तुम्हाला जन्मला घालण्याचा अधिकार देवाने दिला आहे पण मारण्याचा अधिकार नाही. अजून हजार झाडे तूम्ही लावा पण एकही झाड आपण सर्वांनी न तोडायला पाहिजे. कारण एक झाड लगेच काही दिवसात मोठे होत नाही काही सेकदांत झाड तोडले जाते पण मोठे होण्यासाठी त्याला खूप दिवस लागतात..

नाहीतर वरील शिर्षकाप्रमाणे मला असेच म्हणावे लागेल की आपलेच दात आपलेच ओठ. म्हणजे आपणच लावायच आणि आपणचं त्याला संपून टाकायचं.

मी माझे वैयक्तिक मत मांडण्याचा प्रयत्न करत आहे. कोणाचे मन, भावना दुखवल्या जात असतील तर मला माफ करावे..मी तूमची क्षमा मागत आहे.

लेखक : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button