सामाजिक

Follow Your Dreams | स्वप्नांच्या पाठीमागे जायचे की नाही..

स्वप्नांच्या पाठीमागे जायचे की नाही.

प्रत्येक जण स्वप्न बघतात ,त्या स्वप्नांना सत्यात उतरण्याचा काही प्रयत्न करतात,काही जण त्यासाठी सतत धडपड करत असतात, काही जणांना तर स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय चैन पडत नाही,काही जण असे टोमणे पण मारत असतात की उगाच स्वप्नांच्या दुनियेमध्ये का रमतोस,गपचूप धंदापाणी काहीतर कर आणि मुकाटयाने जीवन जग..

काही जण काही वर्षांनतर स्वप्न बघायचेच सोडून देतात आणि आहे त्या परिस्थितीमध्ये मी खूष आहे ,मला पैशाची गरज नाही,मला समाधानी आहे,मी जिथे आहे तिथे मी खूष आहे,मला देवाने भरपूर काही दिले ,मला आता काहीही नको,जे आहे ते माझ्यासाठी खूप आहे,असे म्हणून आपले जीवन जगत असतात.

काही जणांची मानसिकता असते की स्वप्नं वगैरे सामान्य माणसांचे पूर्ण होत नसतात,त्या मुळे ते स्वप्न बघायचेच सोडून देतात..
मी तर म्हणतो माणसांने आपल्या मर्यादेच्या पलीकडील स्वप्न बघायला पाहिजे ,आपली मर्यादा आपण ठरवली आहे आजूबाजूच्या गोष्टी बघून,वातावरण बघून.
माणसाने मरेपर्यंत स्वप्न बघायला हवे,ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला हवे,माणसांमध्ये आणि प्राण्यामध्ये हेच तर फरक आहे की आपण आपल्या स्वप्नानूसार आपल्या मध्ये बदल करू शकतो ,जगू शकतो..आणि आपण स्वप्नच बघायचे सोडले तर आपल्यात आणि प्राण्यामध्ये काय फरक.
समाधसूधारकांनी जर समाजामध्ये सुधारणा आणून नविन भारत डोळयासमोर कसा असेल याचा विचार केला नसता,तसेच त्या प्रमाणे त्यांनी स्वप्नं बघितली नसती तर आज आपण कोणत्या अवस्थेत असतो.

जे शक्य नाही असे वाटत आहे,अशे स्वप्न बघून शक्य करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे..कारण आपल्याला ते का शक्य वाटत नाही,कारण आपल्या मनावर कोणीतरी बिंबवलेले असते की आता तूझे वय झाले आहे,आता तूला शक्य नाही,या वयात आता तू करणार का,आता आहे त्यात समाधानी राहत जा..
पण जर आपण पूर्ण शक्तीने जर स्वप्नांच्या मागे धावलो तर मला वाटते प्रत्येक माणूस आपले स्वप्न पूर्ण करू शकतो..

स्वप्नाळू वृत्ती कधीच सोडू नका,जो माणूस स्वप्नच बघत नाही..तो मेल्यासारखाच असतो.
लहान पणी एक गोष्ट ऐकली असेल ना की हत्तीला एका छोटाच्या साखळी ने बांधलेले असते..तेव्हा तो कितीपण प्रयत्न करतो पण तो त्या ठिकाणाहून तो जाउ शकत नाही..कारण त्या वेळेस त्याच्या कडे ताकद नसते तेवढी पण जसा जसा तो मोठा होत जाईल तसा तसा त्याची शक्ती वाढलेली असते पण त्याच्या मनावर एवढा परिणाम होतो की त्याला वाटते की आता आपण या साखळीला तोडून जाउ शकणार नाही. शेवटी तो स्वप्न बघायचेच बंद करतो आणि ती साखळी तोडण्यांचा प्रयत्न करत नाही.

आपल्यामनावर पण असे काही जणांनी विचार बिंबवले आहेत ते म्हणजे तू फक्त नौकरी करू शकतो ,तूला व्यवसाय करता येणार नाही,तू कूठेतर एखादी सरकारी नौकरी बघ ,किंपर एखादया कंपनी मध्ये नौकरी कर…तूला व्यवसाय नाही जमणार. .आणि आपल्याच राज्यात बाहेरचे परप्रांतीय येवून आपल्याच जमीनीत राहून ,आपल्या सर्व साहित्यांचा वापर करून मोठे होत आहेत..आणि आपण मात्र चाकरी करण्यात गुंतलो आहोत.

कारण आपल्या आईवडीलांनी एकच आपल्या मनावर बिंबवलेले आहे की तू व्यवसाय करू शकत नाही..त्यामूळे तूमच्या कडे कितीही ज्ञान असू दयात या अशा विचारामूळे त्या ज्ञानाला किंमत शून्य आहे.
सर्वांनी स्वप्नांच्या पाठीमागे जायला पाहिजे,प्रत्येकाने स्वप्न बघितले पाहिजे,काही जणांचे स्वप्न लवकर पूर्ण होतील ,काही जणांना उशिर लागेल ,काही जणांनाचे स्वप्न पूर्ण होणारच नाहीत पण मी स्वप्न बघितले आणि ते पूर्ण करण्यासाठी लागेलेले प्रयत्नामध्ये माणसांला समाधान मिळून जाते.

आज आपल्याच जवळच्या माणसांनी निर्माण केलेले चूकीचे विचार तोडून स्वप्नांच्या मागे धावण्याची गरज आहे..खूप काही नविन गोष्टी तूम्हाला शिकायला मिळतील जर तूम्ही स्वप्नांच्या पाठीमागे धावत असाल तर नाहीतर शेवटी जे स्वप्न बघत नाहीत ते मेलेल्या माणसांसारखे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button