भ्रमंती

पासपोर्ट चे प्रकार (Types of Passport)

नमस्कार मित्रांनो,

       मित्रांनो लहानपणी आकाशात घिरट्या घालणारे विमान बघून प्रत्येकालाच त्यात बसण्याची इच्छा होई. त्यावेळी आपण सर्वांनीच विमानावर असणाऱ्या कविताही तालासुरात गायलेल्या आहेत.

आजकाल बरेचसे लोक शिक्षण, नोकरी अथवा आरोग्याच्या कारणास्तव परदेश भ्रमण करत असतात. परदेशी जाण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे पासपोर्ट होय. पासपोर्ट म्हणजे दुसरे तिसरे काही नसून परदेशात आपल्याला भारतीय नागरिकत्वाचे ओळखपत्र म्हणून वापरता येणारा दस्तऐवज आहे.

आजच्या लेखामध्ये आपण पासपोर्ट म्हणजे काय? आणि भारतीय पासपोर्ट चे विविध प्रकार कोणते? असतात याबद्दल माहिती जाणून घेऊयात…

पासपोर्ट म्हणजे काय? What is Passport?

पासपोर्ट म्हणजेच भारत सरकार द्वारा जारी केलेले असे एक कायदेशीर दस्तऐवज आहे जे परदेशी जाण्यासाठी सर्वप्रथम गरजेचे असते. पासपोर्टच्या माध्यमातून असे प्रमाणित केले जाते की पासपोर्ट धारक हा जन्म तत्वाद्वारे व नैतिकतेने भारतीय नागरिक आहे. पासपोर्ट कायदा 1967 नुसार असे प्रमाणित केले जाते की केंद्रीय पासपोर्ट संस्थेनुसार पासपोर्ट सुविधा सर्व नागरिकांना पुरवली जाते. भारत देशात 93 पेक्षा जास्त ठिकाणाहून पासपोर्ट वितरित केला जातो.

पासपोर्ट चे प्रकार Types of Passport

1. सामान्य पासपोर्ट (प्रकार पी पासपोर्ट)

मित्रांनो पासपोर्टचा पहिला प्रकार म्हणजेच सामान्य-पी पासपोर्ट. हा पासपोर्ट नेव्ही ब्ल्यू रंगाचा असून हा बहुसंख्य भारतीयांकडे असणारा पासपोर्ट प्रकार आहे. हा पासपोर्ट नियमित परदेशात जाणाऱ्या भारतीय नागरिकांना दिला जातो, जे व्यवसायासाठी, शिक्षणासाठी, नोकरीनिमित्त किंवा सहलीसाठी परदेशात सतत जात असतात. या सामान्य-पी पासपोर्टचा प्रमुख उद्देश असा की भारतातील सामान्य लोक व भारतातील सरकारी अधिकारी यांच्यामधील फरक ओळखण्यासाठी हा पासपोर्ट मदत करतो. त्याचबरोबर  सामान्य-पी पासपोर्टचा निळा रंग हा प्रवाशांची अधिकृतता तपासण्यासाठी मदत करतो. या पासपोर्टवर प्रवाशाची सर्व प्राथमिक माहिती असते, जसे की प्रवाशाचे नाव, जन्मतारीख, व प्रवाशाचे छायाचित्र इत्यादी बाबी असतात. सामान्य-पी पासपोर्ट मध्ये इमिग्रेशन साठी आवश्यक ते सर्व ओळख तपशील समाविष्ट असतात. सर्वसाधारणपणे बघायचे झाले तर हा पासपोर्ट अशा भारतीय नागरिकांना दिला जातो जे अल्पशा सुट्टीसाठी परदेशात जाऊ इच्छितात तसेच व्यावसायिक लोक जे सतत परदेशात ये जा करत असतात.

2.अधिकृत/राजनैतिक पासपोर्ट

 पासपोर्टचा दुसरा प्रकार म्हणजेच अधिकृत किंवा राजनैतिक पासपोर्ट. मित्रांनो या पासपोर्टचे नाव ऐकूनच तुम्हाला समजलं असेल की हा पासपोर्ट कोणत्या व्यक्तींसाठी असतो, या पासपोर्टच्या नावाप्रमाणेच हा उच्चपदस्थ सरकारी व्यक्तींसाठी वापरला जाणारा पासपोर्ट आहे. हा पासपोर्ट अशा व्यक्तींना दिला जातो की जे सरकारी कामकाजासाठी परदेशात जातात. यामध्ये सरकारी अधिकारी व भारत सरकारच्या उच्चभ्रू लोकांचा समावेश असतो. या पासपोर्टचा रंग हा चॉकलेटी/मरून असतो. हा पासपोर्ट भारतीय पोलीस सेवा विभाग तसेच भारतीय प्रशासकीय विभागामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी वापरला जातो. सामान्य पासपोर्ट धारकांपेक्षा त्यांना खूपच चांगल्या प्रकारची वागणूक व आदर पूर्ण वातावरणात प्रवास करता येतो. चॉकलेटी पासपोर्ट धारकांना परदेशी प्रवासासाठी व्हीसा आवश्यक नसतो. सरकारी अधिकारी व उच्चपदस्थ व्यक्तींना कितीही काळ परदेशात कोणत्याही व्हिसा विना राहण्याची परवानगी असते. जसे सामान्य-पी पासपोर्टसाठी इमिग्रेशन ची अर्थात देशात प्रवेशाची प्रक्रिया खूपच रेंगाळते, या विपरीत मात्र चॉकलेटी पासपोर्ट धारकांसाठी ही प्रक्रिया खूपच वेगाने पूर्ण होते.

3. पांढरा/सफेद पासपोर्ट

मित्रानो, पासपोर्ट चा तिसरा प्रकार म्हणजेच पांढरा पासपोर्ट होय. भारतातला सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणजेच पांढरा पासपोर्ट. पांढरा पासपोर्ट हा फक्त आणि फक्त भारत सरकारच्या सेवेत असणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनाच दिला जातो.  सरकारची खाजगी व गुप्त कामे पार पाडण्यासाठी परदेशात जाणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हा पासपोर्ट असतो. जे सरकारी अधिकारी काही अधिकृत हेतूने परदेशात प्रवास करू इच्छितात त्यांच्यासाठी इमिग्रेशन अधिकारी व सीमा शुल्क सरकारी अधिकारी हे त्याच पद्धतीची उच्चपदस्थ वागणूक प्रदान करत असतात.

हेही वाचा : पासपोर्ट कसा काढायचा ? (How to apply for Passport )

4. केशरी पासपोर्ट

    भारत सरकारने 2018 पासून भारतीय पासपोर्ट मध्ये एक अमुलाग्र बदल केला, ज्यामध्ये भारत सरकारने केसरी रंगाचे पासपोर्ट सुरू केले. तसेच सर्व प्रकारच्या भारतीय पासपोर्ट मध्ये पत्ता असणारे पान छापण्याचे बंद केले आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड अर्थात ECR नागरिकांसाठी हा पासपोर्ट बंधनकारक केला आहे. स्टॅम्प वर आधारलेला हा पासपोर्ट चालू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अशिक्षित नागरिकांना सुरक्षा प्रदान करणे आहे. या पासपोर्ट द्वारे प्रदेशात नोकरी शोधू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी त्या देशात शोषण होऊ नये म्हणून हा पासपोर्ट फायदेशीर ठरतो.

       मित्रांनो पासपोर्ट हा एक अतिशय विस्तीर्ण विषय आहे, आजच्या भागामध्ये आपण यातील पासपोर्ट चे प्रकार या विषयावर माहिती बघितली. पासपोर्ट या विषयावर आपल्याला अजूनही काही माहिती हवी असल्यास आपण आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील ही माहिती नक्कीच शेअर करा.

 धन्यवाद……

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button