नवीन पोस्ट्सनोकरी

तरूणांच्या भावनांशी खेळणाऱ्या कंपन्या

तरूणांच्या भावनांशी खेळणाऱ्या कंपन्या चा विषय असा काढला कि नेहमीप्रमाणे सकाळी क्लास करून अभ्यासाठी आश्रम मध्ये जाउन बसलो. वर्तमानपत्र वाचून, राज्यघटनेचा अभ्यास चालू केला, राज्य निवडणूक आयोगाबद्दल वाचन करत असताना माझा शेजारी, माझा मित्र आला. आमच्यात पुणे महानगरपालिकेच्या जाहिराबद्दल चर्चा झाली.

टक्केवारी वाले अधिकारी – corrupt officials

त्याचे म्हणणे होते की आपल्याला अर्ज करता येत नाही, टंकलेखन चे प्रमाणपत्र लागेल जे की आपल्याला कडे नाहीत, मग काय जाउदे आपण जिल्हा परिषद ‍ जाहिरातीची वाट बघू, ‍ किंवा तलाठी येईल या आशेवरीती हा विषय संपवला..

मग काही वेळात माझ्या लक्षात आले की काल मी एक जाहिरात वाचली वर्तमानपत्रामध्ये , त्या जाहिरात मध्ये वेतन बद्दल उल्लेख केलता आणि अजून एक गोष्ट त्यांनी नमुद केलती की ही नौकरी तूम्हाला आम्ही कायमस्वरूपी या तत्वावर आम्ही तूम्हाला घेणार आहोत..

मग काय मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होउ लागले की आपले वय वाढत आहे आणि ह्या जाहिरातीमुळे आपल आयुष्य बदलू शकते, ते पण धाराशिव ठिकाणी नौकरी मिळणे आणि  ते पण आपल्या घरी राहून ,माझा आनंद गगणात मावेना सा झाला होता..

धाराशिव ठिकाणी नौकरी

 1. खूप दिवस झाले  पुस्तक आणि मी हेच समीकरण ठरलेल.. मग विचार आला की आता यातून आपली सुटका होणार.
 2. पैसे कमवण्याची सूरूवात याच्यापेक्षा कोणती असूच शकत नाही असा आत्मविश्वास निर्माण झाला.
 3. त्या जाहिराती मध्ये नमुद केलेले नव्हते की या या शाखेचा पदवीधर लागेल, तेथे फक्त नमुद केलते की पदवीधरांसाठी सुवर्ण संधी.
 4. या जाहिरातीला बळी पडून आणि त्यांनी नमुद केलेल्या पगारीला बळी पडून ,मनामध्ये स्वप्नांचे गाठोडे बांधून, भविष्य सुखकर होईल.
 5. या आशेने, मुलाखत देण्याची ईच्छा मनात निर्माण झाली, कारण २ ते ३ वर्ष एकही सरळ सेवा नावांची परिक्षा दिली नव्हती, राज्यसेवेसाठी अभ्यास कमी पडत होता.
 6. या सर्व कारणांमुळे मनात कधी कधी नौकरी करण्याचे विचार येतात, आणि भविष्याची चिंता असल्या जाहिरातीला बळी पडते..
 7. मग काय ही वर्तमानपत्रातील जाहिरात मी माझ्या मित्राला अमित ला दाखवली की पगार या शब्दापुढे असलेले आकडे बघून अमित या माझ्या मित्राने सुध्दा माझ्यासारखेच त्याला पण वाटले असेल म्हणून त्याने  माझ्या बरोबर येण्याचा निर्णय घेतला..
 8. अभ्यास करित असलेल्या सुदर्शन आणि संतोष तसेच शुभम या मित्राला सांगितले की मी अशा अशा ठिकाणी मुलाखती साठी जात आहे.
 9. पण ते तिघेही तयार झाले नाही पण मजाक मध्ये एक जण बोलून गेला की कंपनी वाले गायब करतील. चांगली कंपनी आहे का ते बघा.
 10. नाहीतर किडनी काढून घेतील..मजाक मजाक मध्ये आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि आम्ही आलो कागदपत्रेघेण्यासाठी आमच्या घरी आलो.

चांगली कंपनी आहे का ते बघा

 1. माझा बायोडाटा/रिझुम ,फोटो ,आधार कार्ड घेतले तसेच इतर कागदपत्रे घेतली,आईने विचारले धही साखर देउ का, चहा पिउन जा.
 2. पण माझ्या मनात फक्त मुलाखत होती. मी नाही म्हणालो  आणि निघालो आमच्या सुझूकी या गाडीला घेउन मुलाखत देण्यासाठी, ५ वाजले होते तरीही त्यांनी आम्हाला बोलवून घेतले ,गणेश नगर मध्ये आम्ही आलोत.
 3. त्यांना कॉल केला पत्ता विचारण्यासाठी ,पत्ता विचारत विचारत आम्ही एका ठिकाणी पोहचलो तेथे छोटासा बोर्ड लागला होता.
 4. समोरच एक टाय घातलेले एक व्यक्ती आम्हाला त्यांच्या कडे बोलवू लागला..
 5. आणि आम्ही एका घरामध्ये शिरलो ,आजूबाजूला बघितल तर कंपनीच्या माहितीचे काहीच दिसले नाही.
 6. समोर एक टेबल त्याच्यावर दोनचार वस्तू आणि टेबलाच्या समोर एक खास व्यक्तीला बसायला खूर्ची आणि आमच्या सारख्या व्यक्तींना बसायला तीन खूर्च्या ठेवल्या होत्या..
 7. मग त्यांनी आमचा बायोडाटा चेक केला आणि काही वेळात तूम्हाल मॅम बोलवतील म्हणून तो आत मध्ये गेला..

भावनेशी या अशा प्रकारे कंपन्या खेळतात

 1. तेवढयात आतल्या रूम मध्ये बसलेल्या मॅडम नी आम्हाला आत बोलवले..
 2. आणि दोघेही मुलाखत दयायला आत मघ्ये गेलो..तर त्यांनी आमची थोडी फार चौकशी केली आणि त्यांच्या कंपनी बद्दल आम्हाला सांगतिले
 3. आणि उदया आमचे काम तूम्हाल दाखवले जाईल आणा नंतरच तूमचा उदया ठीक पाच वाजता परत मूलाखत होईल आणि त्यांनतर तूम्हाल कळवले जाईल..
 4. त्यांचे काही ही काम असले असते ते आम्ही केलेच असते ,पण बोलता बोलता त्यांनी आमच्या सगळया स्वप्नावर पाणी फेरले..
 5. तूम्ही उदयापासून जर आमच्या कंपनीत जॉइन झाला तर त्या दिवसापासून पूढील ९ महिने तूम्हाला आम्ही ट्रेन करणार
 6. आणि त्या ट्रेनींग मध्ये तूम्हाल सकाळी ९.३० पासून रात्री ६.३० पर्यंत आम्हाला वेळ दयावा लागेल..
 7. आणि ट्रेनिंगच्या दरम्यान आम्ही तूम्हाला ७००० रूपये मासिक पगार देउ तसेच आमच्या कंपनी कडून राहण्याची सोय केली जाईल..
 8. आणि पूढील ९ महिने कालावधी नंतर तूम्हाला आम्ही सहाय्यक मॅनेजर पदावर नियुक्त करू तेव्हा तूमची मूळ पगार तूम्हाला मिळेल..
 9. अजून भरपूर बोलणे झाले आणि  आम्ही त्यांचा निरोप घेतला ..बाहेर पडलो
 10. आणि काही अंतर कापल्या नंतर मोठ मोठयाने आमच्या नशीबावर आम्ही हसू लागलो…‍किती स्वप्न बघितले होते एकाच क्षणात चूर झाले.
 11. किती आशेने गेलतो मुलाखत देण्यासाठी ..आमच्या भावनेशी या अशा कंपनी खेळतात,त्यांना पण माहिती आहे बेराजगारी खूप वाढली आहे ..

जाहिरातीवर पगार एक दाखवायचा आणि प्रत्येक्षात एक

 1. मग काय जाहिरातीवर पगार एक दाखवायचा आणि प्रत्यक्षात मात्र हातात  चार अंकी पगार ठेवायची .
 2. ब्रिटीश आणि यांच्या मध्ये काय फरक आहे ..वेठबिगारी यालाच तर म्हणतात..
 3. कमी पगारीवर जास्त काम करून घेणे.शेवटी आमच्या पैकी कोणी कोणी यांना बळी पडणारच..
 4. अशा कंपन्यांवर आवर घातला पाहिजे , तरूणांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार या कंपनींना कोणी दिला..७००० हजार पगार सुरूवातीला मिळेल..
 5. एवढे लिहायला काय झालते..म्हणजे मोठया पगारीचे आमीश दाखवायचे ,८ ते ९ महिने काम करून घ्यायचे ..
 6. तो पण कंटाळून शेवटच्या काही दिवसात काम सोडुन जातो..मग काय अजून दुसरा बकरा पकडायचा..
 7. आणि तरूणांच्या भावनांशी खेळायचे..

IPL Auction 2024 Live Updates : पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, डॅरेल मिशेलला धोनीच्या संघाने 14 कोटींमध्ये खरेदी केले..

लेखक : राम ढेकणे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button