व्यवसाय

दागिने व्यवसाय सुरू करण्यासाठीची प्रक्रिया Process to start jewelry business

नमस्कार मित्रानो,

आजच्या लेखामध्ये एका नव्या विषयाने आम्ही आपले स्वागत करत आहोत. मित्रहो, भारतामध्ये दागिने शतकानुशतके महिलांसाठी प्रतिष्ठतेचा विषय बनून बसले आहेत. भारतामध्ये दागिने हा प्रत्येक कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग असतो. दागिने हे स्टेटस सिम्बॉल म्हणून देखील परिधान केले जातात आणि लग्नकार्य आणि सण-वार इत्यादी शुभ प्रसंगी देखील परिधान केले जातात. अशा प्रकारे भारतात दागिने व्यवसाय सर्वाधिक भरभराट झालेले आणि वाढतच जाणारे क्षेत्र आहे जे भारताच्या जीडीपीमध्ये तब्बल 6-7 टक्क्यांपर्यंत योगदान देते. भारताच्या देशांतर्गत विविध रत्ने व दागिने या उद्योगाचे इसवीसन 2013 मध्ये अंदाजे बाजार मूल्य सुमारे 251,000 कोटी रुपये इतके होते आणि त्यावेळी त्याची 500,000 कोटी रुपयापर्यंत वाढण्याची क्षमता व्यक्त केली होती. भारत देशात दागिने स्टेटस सिम्बॉल म्हणून वापरत असल्याने रत्न जवाहिर आणि दागिने हा व्यवसाय अतिशय झपाट्याने वाढीचा व्यवसाय आहे. हा बाजार तब्बल 19.55 टक्के वाढची क्षमता ठेवतो

दागिने व्यवसाय सुरू करण्यासाठीची प्रक्रिया (Precess to start jewelary business)

मित्रहो, भारतामध्ये तुम्ही रिटेल ज्वेलरी शॉप्स, ऑनलाइन ज्वेलरी रिटेल, गोल्ड ट्रेडिंग, गोल्ड इम्पोर्टर्स आणि ज्वेलरी मॅन्युफॅक्चरर्स इत्यादी प्रकारच्या व्यवसायाद्वारे दागिन्यांच्या व्यवसायात प्रवेश करू शकता. मात्र या लेखात, आपण प्रामुख्याने किरकोळ म्हणजेच रिटेल दागिन्यांच्या दुकानाबद्दल चर्चा करणार आहोत. कारण भारतात किरकोळ दागिन्यांचीच दुकाने जास्त लोकप्रिय आहेत आणि संशोधनात असे दिसून आले आहे की भारतीय ग्राहक ब्रँडेड दुकानातून दागिने खरेदी करण्यावर इतके लक्ष केंद्रित करताना दिसत नाहीत.

भारतामध्ये किरकोळ दागिन्यांचा व्यवसाय सुरू करण्याकरिता तुम्हास खालील सर्व स्टेप्स फॉलो कराव्या लागतील जेणेकरून तुम्ही या व्यवसायात उत्तम नाव कमवू शकाल.

दागिने व्यवसायाची नोंदणी करणे (Registration of jewelery business)

दागिन्यांचा किरकोळ व्यवसाय सुरू करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी एक ब्रँड नाव शोधणे, तुमच्या व्यवसायासाठी ट्रेडमार्क मिळवणे, तुमच्या व्यवसायासाठी वेबसाइट तयार करणे आणि तुमचा व्यवसाय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा भागीदारी आणि LLP(लिमिटेड) म्हणून नोंदणीकृत करणे.  तुम्ही तुमचा व्यवसाय एकट्याच्या मालकीचा किंवा भागीदारीत फर्म म्हणून देखील सुरू करू शकता. तुम्ही हे देखील लक्षात घ्यावे की नोंदणी आणि परवाने राज्यानुसार बदलत असतात, म्हणूनच संबंधित राज्याचे नियम वाचून आणि तपासूनच व्यवसाय सुरू करावा. जेणेकरून पुढे जाऊन व्यवसाय वाढताना काही अडचणी येणार नाहीत.

दागिने व्यवसायाची जीएसटी अंतर्गत नोंदणी करणे (Registration of jewellery business under GST)

मित्रहो, 2017 पासून भारतातील प्रत्येकच राज्यामध्ये नवीन GST नोंदणी करणे कंपल्सरी केले आहे  जेणेकरून व्यवसायिक कर बुडवू शकणार नाही, तसेच सरकार सहजरित्या GST कर वसूल करू शकेल. म्हणूनच, सर्व दागिन्यांच्या व्यवसायांना देखील स्थानिक राज्य कर विभागाकडून GST नोंदणी करून घेणे आवश्यक असणार आहे.

दागिन्यांचा व्यवसाय करण्यासाठी BIS प्रमाणपत्र मिळवणे (Getting BIS certificate for jewellery business)

बीआयएस प्रमाणपत्र ग्राहकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करत असते कारण बीआयएस प्रमाणपत्र ग्राहकांना हमी देते की दागिने शुद्ध आणि उत्तम आहेत, तसेच त्यामध्ये कोणतीही भेसळ केलेली नाही. BIS प्रमाणपत्र हे भारतातील गुणवत्तेचे एक चिन्ह आहे. BIS प्रमाणपत्राचा मुख्य उद्देश जनतेचे अशुद्ध आणि निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांपासून संरक्षण करणे आणि निर्मात्यांना शुद्धता आणि सूक्ष्मतेचे मानके राखणे अनिवार्य करणे हा आहे. BIS चा फुल फॉर्म ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड्स (Buero of indian standards) असा होतो.

दागिने व्यवसायाच्या व्यवहारांकरिता बँक खाते (Bank account for jewelery transactions)

मित्रानो आपल्याला माहीतच आहे की व्यवसायाचे खाते हे नेहमी चालू खाते या प्रकारातले असते. तसेच हे खाते व्यवसाय मालकाच्या किंवा दुकानाच्या नावावर असले पाहिजे जेणेकरुन तो दुकानाच्या जीवावर कर्जासाठी अर्ज करू शकेल आणि व्यवसायासाठी बँक स्टेटमेंट देखील मिळवू शकेल. बँकांकडे व्यवसाय मालकासाठी विविध कर्ज योजना आधीच तयार असतात ज्याचा ते लाभ घेऊ शकतात. स्वतंत्र बँक खाते असल्‍याने हिशोब आणि खरेदी विक्रीच्या नोंदी ठेवण्‍यात देखील मदत होते.

दागिने व्यवसायाकरिता कर्मचारी लोकांची भरती (Staff for jewellery business)

मित्रहो, दागिने व्यवसाय जोखमीचा आहे हे आपण सर्वच जण जाणता, त्यासाठी कर्मचारी वर्ग हा अत्यंत विश्वासू असावा लागतो, नीट पारखून घेतल्याशिवाय कोणालाही सहजासहजी कामावर ठेवता येत नाही. व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी आणि  ते टिकवण्यासाठी व्यवसाय मालकाने व्यावसायिक आणि योग्य प्रकारच्या लोकांचीच निवड केली पाहिजे. व्यवसाय मालकाने कर्मचार्‍यांची योग्य पडताळणी केली पाहिजे जे मालक नसताना देखील व्यवसायांची उत्तम बडदास्त ठेवतील. 

दागिन्यांच्या व्यवसायाचे जाहिरात (Advertizing of Jewelery business)

मित्रहो, तुम्ही व्यवसाय सुरू केल्यावर लगेचच ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही माध्यमांचा वापर करून जाहिराती  सुरू करणे आवश्यक आहे कारण यामुळे तुमच्या दागिन्यांच्या उत्पादनांची मागणीत वाढ निर्माण होण्यास मदत होईल. दागिन्यांची दुकाने सामान्यत: वर्तमानपत्रातील जाहिराती, टीव्ही जाहिराती, होर्डिंग्ज आणि थिएटर इ. प्रकारद्वारे प्रमोट केली जात असतात. तुम्हाला तुमच्या बजेटनुसार योग्य जाहिरात प्रकारची निवड करणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला जास्त परतावा मिळू शकेल.

दागिन्यांच्या व्यवसायासाठी व्यवसायाचे व्यवस्थापन (management for jewelery business)

मित्रानो, तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केल्यानंतर व्यवसाय सुरळीतपणे व्यवस्थापित करण्याकरिता पॉइंट ऑफ सेल आणि बिलिंग सॉफ्टवेअर, अकाउंटिंग सॉफ्टवेअर, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आणि कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सॉफ्टवेअर यासारखी विविध साधने तयार करणे आवश्यक आहे. मात्र याठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे तुमच्या ज्वेलरी शॉपसाठी सुरक्षितता देखील राखली गेली पाहिजे.

मित्रांनो ज्वेलरी व्यवसायाला नेहमीच एक विशिष्ट समुदायाचा व्यवसाय म्हणून बघितले गेले आहे. मात्र आजच्या काळामध्ये ही सर्व बंधने झुगारून प्रत्येकच समाजातील व्यक्ती हा एकमेकांचा व्यवसाय करताना दिसत आहे. यामध्ये पैशांची अधिक आवश्यकता आणि जास्त जोखीम असल्याने सहसा कोणी या व्यवसायाकडे वळताना दिसत नाही, मात्र योग्य काळजी घेऊन आणि पूर्ण माहितीनिशी हा व्यवसाय केल्यास यातूनही चांगला नफा मिळवला जाऊ शकतो. आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळविण्यात विसरू नका. तसेच गरजू व्यक्तीपर्यंत ही माहिती शेअर करून पोहोचवा.

 धन्यवाद…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button